subhash inamdar

subhash inamdar

Friday, May 20, 2011

"पांगिरा' -20 मेपासून

"आयड्रीम प्रॉडक्‍शन'चा "पांगिरा' हा  बहुचर्चित  चित्रपट येत्या 20 मेपासून महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. 

किशोर कदम, प्रशांत पाटील प्रमोद पवार, शशांक शेडे, मीता सावरकर, नंदिनी जोग यांच्यासह संगीतकार विजय नारायण उपस्थित होते.

"जोगवा'सारखा आशयघन चित्रपट बनविणाऱ्या टीमनेच "पांगिरा' हा चित्रपट बनविला आहे. प्रसिद्ध साहित्यिक विश्‍वास पाटील यांच्या "पांगिरा' या कादंबरीवर बेतलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव पाटील यांनी केले आहे. संवाद-गीते, कविता तसेच प्रस्तुतकर्ते संजय पाटील आहेत. पटकथा राजीव आणि संजय पाटील यांनी लिहिलेली आहे. उपेंद्र लिमये, किशोर कदम, प्रमोद पवार, मिता सावरकर, स्मिता तांबे आदी कलाकार या चित्रपटात काम करीत आहेत.

बदलत्या गावपांढरीची कहाणी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वेदना त्यात मांडण्यात आली आहे. चित्रपटाला विविध महोत्सव आणि स्पर्धांमध्ये चोवीस नामांकने आणि अकरा पारितोषिके मिळालेली आहेत. विश्‍वास पाटील यांनी 1980 मध्ये ही कादंबरी लिहिली होती. सोन्यासारखा घाम मातीत गाळून धरतीला हिरवा शालू नेसविणाऱ्या भूमिपुत्रांची ही उद्‌ध्वस्त जत्रा अजून किती पिढ्यांनी कोडग्या नजरेने बघायची, असा प्रश्‍न पाटील यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.

No comments:

Post a Comment