-पतंजली मादुस्कर
राग गायनाचे विविध प्रकारांची ओळख आज शास्त्रीय संगीताच्या परिक्षांपुरर्ती राहिली आहे. या सीडीच्या निमित्ताने राग गायनाच्या विविध शैलीदार परंपराचे दर्शन घडले आहे. हे लोप पावत चाललेले रागप्रकार कलाकार प्रत्यक्षपणे आपल्या गायनातून सादर करतील आशी अपेक्षा आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक पतंजली मादुस्कर यांनी केली.
यशकमल प्रस्तुत, स्वरगंगा निर्मित-डॉ. नीता भाभे यांच्या देती साद-स्वर नाद या सीडीचे प्रकाशन मादुस्कर यांच्या हस्ते शनिवारी ( २७ ऑगस्ट), गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झाले त्यावेळी ते बोलत होते. शास्त्रीय संगीत सादर करण्यासाठी विविध रागांची निर्मिती झाली. ते सादर करण्यासाठी विविध फॉर्म तयार झाले. त्यातलीच राग गायनाची ही पारंपारिक परंपरा आज काळाबरोबर नष्ट होत चालाली आहे. निता भाभे यांच्या या सीडीद्वारे पुन्हा एकदा त्याला नव्याने उजाळा मिळाला असल्याचा उल्लेख मादुस्करांनी आवर्जून केला.
याचवेळी ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका रेवा नातू यांना कै. नानासाहेब आपटे स्मृती ललकार पुरस्कार ज्येष्ठ संगीततज्ञ सुनिताबाई खाडिलकर यांच्या हस्ते दिला गेला. यावेळी रेवा नातू यांच्या संगीत कारकीर्दीला भरघोस यश लाभावे अशी इच्छा प्रकट करताना खाडिलकरांनी अखंड संगीतात वाहून घेतलेल्या निता भाभे यांचे संगीतविषयक विचार आणि राग गानप्रकारांची माहिती असणारी सीडी निर्माण झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि संगीत शिकणा-यांसाठी ती अत्यंत उपयुक्त असून यामुळे विद्यार्थी आपल्या अभ्यासात याचा उपयोग नक्कीच करतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
याप्रसंगी नुकतेच ९७ वर्षात पदार्पण करणारे दाजीकाका गाडगीळ समारंभाला कलावंताना शाबासकी देण्यासाठी उपस्थित होते.
डॉ, नीता भाभेयांच्यासह त्यांच्या शिष्या संगीता कुलकर्णी, विनिता सुमंत, स्नेहल खानवेलकर यांनी अष्टपदी, कैवाड प्रबंध, चतरंग आणि चतरंगमधील भैरवीतून रागांच्या विविध अंगाचे ,त्यांच्या मधुरतेचे दर्शन घडविले. त्यांच्या या अभ्यासपूर्ण रागप्रकारांच्या सादरीकरणात विनित तिकोनकर, अभिजित जायदे (तबला), अविनाश तिकोनकर( पखवाज) आणि संवादिनीची साथ जयंत साने यांनी केली.
सुभाष इनामदार, पुणे
मोबा. – ९५५२५९६२७६
E_mail- subhashinamdar@gmail.com