subhash inamdar

subhash inamdar

Monday, February 26, 2018

..पण कायम रहातील संगीतकार राम कदम

केवळ ठेका पुरेसा आहे 





संगीतकार राम कदम जन्मशताब्दी..
संगीतकार राम कदम हे आज असते तर शंभर वर्षांचे असते..आज ते आपल्यात नाहीत.पण त्यांची संगीत दिलेली असंख्य गाणी आणि त्यांच्या विषयीच्या आठवणीतून दादा आजही आपल्यात आहेत..हे दाखविणारा कार्यक्रम पुण्यात नुकताच म्हणजे १७ फैब्रुवारीला झाला..त्यांच्या स्मृती घेऊनच या कार्यक्रमाविषयी काही स्मरण इथे करून देत आहे..

आपण गेल्यानंतरही आपली गाणी वाजावीत हेच संगीतकाराल हवे असते.. आपण नसताना जर आपली वाजली..तर आपण जिंकलो..आज राम कदम जिंकले… ग साजणीचा ठेका रामभाऊंनी तयार केला..आम्ही रामभाऊंच्या ठेक्यावर ढिपाडी ढिपांग.. गाणे तयार केले.हा ठेका रामभाऊंनी पुढच्या पिढीला दिला..आजचा प्रतिथयश संगीतकार सलील कुलकर्णी यांना हेच आज मुख्य महत्वाचे वाटले.
आपले स्वतःचे वेगळेपण सिध्द करत संगीतकार राम कदम हे नाव मराठी चित्रपट संगीतात त्यांनी कोरले ..लावणी,अभंग, लोकसंगीत, ग्रामीण ढंगातली आदाकारी, लोकनाट्याचा बाज, शास्त्रीय संगीताची भक्कम जाणकारी आणि आपल्यावरचा आत्मविश्वास यामुळे राम कदम हे नाव संगीतकार म्हणून मराठी रसिकांच्या मनात कायमचे कोरले गेले आहे. आजही जन्मशताब्दीच्या दिवशी ज्या अलोट संख्येने पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिक उपस्थित होता..त्यावरून हे सिध्द होत आहे.

      बुगडी माझी सांडली गं..  हा कार्यक्रम ज्या आपुलकीने सादर केला यातच ती आत्मीयता स्पष्ट होते. आमदार माधुरी कुलकर्णी यांचीही उपस्थिती कदम परिवाला उत्साह देणारी होती.






 केवळ हा आठवणींचा कार्यक्रम न होता..राम कदम यांची संपूर्ण कारकीर्द त्यांच्यासोबत काम केलेल्या आणि त्यांना जवळून ओळखणारी अशी एकविस लेखक यांनी ज्या पुस्तकातून संगीतकार पुरेपुर उभा केला आहे..त्या पुस्तकाचे नाव आहे..बुगडी माझी सांडली ग..... पुस्तकाच्या लेखिका प्रा. नीला विजय कदम...



त्या पुस्तकाचे प्रकाशन हा या जन्मशताब्दीचा मुख्य कार्यक्रम होता..विश्वकर्मा प्रकाशनाच्या वतीने ते उपस्थित सगळ्या मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.. तेही  पालखीतून पुस्तक रंगमंचावर आणले गेले..तेही राम कदम यांचे दोन नातूच्या करवी.




ख्यातनाम नृत्यांगना लिला गांधी, संगीत नियोजक इनाॅक डॅनियल, ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे, आनंद आणि शरद माडगूळकर, अंगाई खेबुडकर, प्रणीत कुलकर्णी, प्रवीण तरडे, विजय राम कदम इत्यादींच्या साक्षीने पुस्तकाचे रूप रसिक प्रक्षकांच्या नजरेस आणले गेले.





तुडुंब भरलेलं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे ,अनुराधा मराठे ,विजय कदम, उपेंद्र भट ,दयानंद घोटकर  जयश्री कुलकर्णी, मेधा चांदवडकर यांनी एकाहून एक सरस अशी राम कदम यांच्या संगीतातून बाहेर पडलेल्या बहारदार चाली तेवढ्याच ताकदीने रंगमंचावर इथे साकार झाल्या.



कुण्या गावाचं हे पाखरू..या लावणीच्या स्वरात भिजवून सोडले ते जयश्री कुलकर्णी यांनी..तर पायात आपाआप ताकद येऊन ज्येष्ठ अभिनेत्री लिला गांधी यांनी रंगमंचावर  आदाकारी करण्याची उर्मी याच ठिकाणी आली.
 
रंगत आणि कार्यक्रमाची उंची वाढविली ती उपेंद्र भट यांनी आपल्या दोन अभंगांच्या सादरीकरणाने.. छिन्नी हातोड्याचा घाव. त्यातला हात्तोड्याचा कसा उच्च्यारायचा याचे प्रात्यशिक करून दाखविले..आणि टाळ बोले चिपळीला..फारच सुरेख.



खास नोंद कराविशी वाटते..वयाच्या  पंच्च्यारत्तरीतही आपल्या टिपेच्या आवाजातील दोन गाणी सादर करून आपल्या भावना राम कदम यांच्या विषची ज्या आत्मियतेने सांगितल्या त्या अधिक मोलाच्या होत्या..



यात एक लावणी होती..राया मला पावसात नेऊ नका..दुसरे होते..इतनी शक्ति हमे दे ना दाता..
उपस्थित रसिकांची दादही तेवढीच मोलाची मिळत होती.
 राजेंद्र दूरकर ,विवेक परांजपे ,केदार परांजपे ,रमाकांत परांजपे , प्रसन्न बाम ,मिलिंद गुणे , केदार मोरे ,नितीन जाधव  अश्या दिगग्ज कलाकारांची संगीत साथ मिळालेली उत्तम साथ... कार्यक्रमाची रंगत अधिक वाढविणारी होती.





संपूर्ण कार्यक्रमाची शाब्दिक सजावट आणि सूत्रे हाती घेतली होती..ती मंगेश वाघमारे यांनी..आणि तो एका सूत्रात बांधण्याचे काम केले होते  ते प्रवीण कुलकर्णी यांनी.
राम कदम यांच्या पणतींनी केलेली आदाकारीही वाखाणण्यासारखी होती..




एकीने नृत्य केले तर














 दुसरीने गाणे सादर केले..








या कार्यक्रमाचे आयोजन करणारे विजय राम कदम आणि सौ. नीला  विजय कदम आणि सर्व कदम परिवार यांचे विशेष अभिनंदन करावे लागेल..


















त्यांनी हा सुरेल गितांचा नजराणा या रसिकांच्या साक्षिने बहाल केला..
  







कित्येक येतील..कित्येक उरतील..पण कायम रहातील हे राम कदम हे पाच अक्षरी नाव,,कोरिव लेण्यासारखे..
-सुभाष इनामदार, पुणे
 subhashinamdar@gmail.com