subhash inamdar

subhash inamdar

Tuesday, April 3, 2012

अजुनही काम करण्याची जिद्द असणारे डॉ. लागू

मसालात तिन दिग्गज एकत्र

मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीत स्वतःचे श्रेष्ठत्व सिध्द करणारे तीन दिग्गज कलाकार मसाला चित्रपटाच्या बॅनवर झळकणार आहेत. डॉ..श्रीराम लागू, डॉ. मोहन आगाशे आणि दिलिप प्रभावळकर.

२० एप्रिलपासून महाराष्ट्रात प्रदर्शीत होणा-या मसाला या प्रविण मसालेवाल्यांची निर्मिती असलेल्या आणि संदेश कुलकर्णी यांनी प्रथमच दिग्दर्शन शक्षेत्रात पाऊल टाकलेल्या चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीसाठी आयोजित केलेल्या संवादाच्या निमित्ताने एकत्र एकाच व्यासपीठावर झळकले.

ह्या तिन्ही थोर कलाकारांनी चित्रपटात असणं हेच आमच्या दृष्टीने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श भारावलेला आणि मोहारलेला आहे. त्यांच्या असण्यानं आम्ही पुवकित झालोय असं गिरीश कुलकर्णी यांना वाटतं.


नाटक, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या भूमिकांची वजने सांभाळणारे हे तिन्ही कलाकार कुठल्याही भूमिकेत कसे वावरतात. त्याचा आभ्यास ते कसा करतात. हे सांगताना या चित्रपटात डॉ. लागूंनी अत्तरवाल्या दुकानदाराची भूमिका वठविली आहे. ते ज्या पध्दतीने भूमिकेचे आकलन करुन घेतात..ते आजही अनेक नट गंभीरपणे घेत नाहीत असे डॉ. आगाशे यांना वाटते.

स्वतः डॉ. लागू पॉल मुनीच्या अभिनयाने भारावलेले आहेत. मराठीत गजानन जाहगिरदार यांचेही ते नाव घेतात. कुठलिही भूमिका करताना त्या भूमिकेचे तुम्ही घटक बनता. तुम्ही ती व्यक्तिरेखा बनता. तुम्ही कोण हे विसरुन त्या व्यक्तित्वात स्वतःला पाहता. यातही एक छोटी भूमिका केली आहे. अजूनही मी माझे आतले मन जेव्हा एखाद्या भूमिकेत काम कर असा कौल देते तेव्हा मी ती स्वीकारतो. आजही आपण भूमिका करतो आणि पुढेही करणार असेच त्यांनी सांगितले.


डॉक्टरांच्या सोबत आपले नाव झळकणे आणि ते भूमिका करताना अनुभवणे हा एक चांगला अनुभव या निमित्ताने आपण घेतल्याचे मोहता या भूमिकेतू मसाला मध्ये झळकणारे डॉ. आगाशे अभिमानाने सांगतात.


दिलिप प्रभावळकर एका संशोधकाची भूमिका करताहेत. चित्रपट आनंदासाठी तयार केला आहे. जीवनाक़डे आनंदी पाहण्य़ाची वृत्ती त्यांच्याकडून प्रेक्षकांना मिळणार आहे. वेगळ्या भूमिकेचा हा रोल आहे. आम्ही तिघे या निमित्ताने प्रथमच एकत्र आलो आहोत. असेही प्रभावळकर सांगतात.

अशा कलावंतांचा स्पर्श लाभून आम्हीला प्रेरणा मिळाली. त्यांचा आशीर्वाद यानिमित्ताने मिळाल्याचे भाग्य शब्दातून उमेश कुलकर्णी प्रकट करतात.

subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276



`मसाला’ चित्रपटात डॉ. लागू `इद्रीस भाई’ नावाच्या एका `अत्तरवाल्याच्या’ भूमिकेत दिसणार आहेत. डॉ. लागू यांच्या या भूमिकेबाबत बोलताना गिरीश कुलकर्णी म्हणाले, की जेव्हा त्यांना आम्ही मसालातील या भूमिकेबाबत विचारले तेव्हा त्यांनी लगेच होकार तर दिलाच शिवाय या भूमिकेबाबत कमालीची उत्सुकता दर्शविली.
ज्या दिवशी त्यांचे चित्रीकरण होते त्यादिवशी या वयातही त्यांचा उत्साह पाहून सर्वजण आचंबित झाले होते. दिग्दर्शक संदेश कुलकर्णी यांनी त्यांना त्यांची भूमिका समजावून सांगितल्यानंतर त्यांचे समाधान होईपर्यंत त्यांनी शॉट्स दिले. त्यांची कामाची शिस्त आणि कामावर असलेली निष्ठा खूपच प्रेरणा देणारी होती. त्यामुळे सेटवरील त्यांची उपस्थिती ही आमच्या दृष्टीने अतिशय प्रसन्नदायी ठरली.
`मसाला’मध्ये गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, हृषीकेश जोशी, ज्योती सुभाष, श्रीकांत यादव, प्रवीण तरडे, नेहा शितोळे, शशांक शेंडे आदी कलाकारांसोबत डॉ. लागूचे दर्शन चित्रपट रसिकांना घडणार आहे.
मसाल्याची सिनेमॅटोग्राफी राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर एच.एम. रामचंद्र यांची असून संकलक अभिजीत देशपांडे यांचे तर संगीत आनंद मोडक यांनी दिले आहे.