संगीतातील वाद्ये ज्यांच्याशी चक्क बोलतात ' अशे ज्यांचे वर्णन केलेल जाते ते ज्येष्ठ वाद्यनिर्माते युसुफभाई मिरजकर यांचे येथे अपघाती निधन झाले. ते ६४ वर्षाचे होते. आज पहाटे चालण्याच्या व्यायामासाठी बाहेर पडले असता वारजे पुलाजवळ एका कंटेनरने दिलेल्या धडकेमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.
पं. भीमसेन जोशी, किशोरीताई आमोणकर, उस्तान सुलतान खाँ, उस्ताद रईस खाँ यांच्यासारख्या अनेक दिग्गजांसाठी त्यांनी वाद्ये घडवली आणि त्यांची जपणूकही केली. संगीतक्षेत्रामध्ये त्यांना फार मोठा मान होता. पुण्यातल्या मानाच्या सवाई गंधर्व महोत्सवात त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला होता.
सतार-तंबोरा आदी तंतूवाद्ये बनवण्यात युसुफभाईंची खास ओळख होती. सतारीचे नादसूर जुळवताना जव्हारीचे सर्वात अवघड काम युसुफभाईंनी वडील इस्माईल शमशुद्दीन यांच्याकडून शिकून घेतले होते. त्यांची वाद्ये आजही जगभरात सुरेलच गातात , अशा शब्दात सतारवादक उस्मानखाँ यांनी त्यांचा गोरव केला होता.
सात पिढ्यांपासून वाद्यनिर्मितीशी जोडल्या गेलेल्या युसुफभाईंचे आजोबा शमसुद्दिन मिरजकर प्रभात सिनेमात कामासाठी म्हणून पुण्यात आले. त्यानंतर पुण्यातच आपल्या वाद्यनिर्मितीच्या ध्येयाला व्यावसायिक आकार दिला.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9632335.cms