subhash inamdar

subhash inamdar

Monday, October 29, 2012

नाट्यसंपदा प्रतिष्ठानचा गानसरस्वती महोत्सव पुण्यात रंगणारनाट्यसंपदा प्रतिष्ठान, मुंबई यांनी आपल्यामार्फत पहिला शास्त्रीय संगीताचा महोत्सव तोही गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या शास्त्रीय संगीतातील योगदानानिमित्त  पुण्यात आयोजित केला आहे. दिवाळी नंतरचे दोन दिवस ही एक संगीत क्षेत्रातील मोठी आतषबाजी १७ आणि १८ नोव्हेंबर २०१२ला गणेश कला क्रिडा मंचावर पुणेकरांच्या साक्षिने होणार आहे. संबंधीची माहिती सोमवारी प्रतिष्ठानच्या वतीने दाजीशास्त्री पणशीकर, सुभाष सराफ आणि किशोरी आमोणकरांचे शिष्य रघुनंदन पणशीकर (ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि नाट्यसंपदाचे कै. प्रभाकर पणशीकर यांचे सुपूत्र) यांनी दिली.

नाट्यसंपदा प्रतिष्ठानही संस्कृत आणि संगीताचा प्रसार करण्यासाठी कटीबध्द आहे. काही कालावधीपूर्वी संस्थेनं तरुण नाटककारांसाठी नाट्यलेखन स्पर्धा जाहीर केली होती. त्यातून तीन लेखकांना पुरस्कार देण्यात आले. आता गेली सात दशके संगीत क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या नावाने हा महोत्सव आयोजिला आहे. त्यांचा सत्कारही केला जाईल. त्यांचे पट्टशिष्य रघुनंदन पणशीकर यानी १५ वर्षे शास्त्रीय संगीताची तालिम घेतली आहे. तेच आता आपल्या गुरुंचे यापध्दतीने पूजन करुन ख-या सरस्वतीमय असेलेल्या किशोरीताईंच्या स्वरांची ओंजळ रसिकांपर्यंत पोहोचवित आहेत. 

कितीही झाले तरी संगीत विद्या ही गुरु-शिष्य परंपरेतूनच वाढीला लागते. विकसित होते, असे सांगून दाजीशास्त्री पणशीकर यांनी ही एका अर्थाने गुरुंची पूजाच आम्ही करीत आहोत. त्यांचे गुरुपूजन या महोत्सवात पारंहारिक पध्दतीने केले जाणार आहे. गुरुकूल परंपरा सुरु ठेऊन त्या परंपरेचा वेध घेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

या महोत्सवातून नवीन पिढीला व्यासपिठ देण्याचे प्रतिष्ठानचे उद्दीष्ट आहे. हा दरवर्षी करायचा आहे. जुने जाणते गायक यांच्या आशीर्वादामधूनच नविन कलाकारांचे गाणे पुढे जाणार आहे, असे या प्रतिष्ठानचे विश्वस्त सुभाष सराफ यांनी स्पष्ट केले.ए. शिवमणी (ड्रम्स), 


मिलिंद रायकर 


आणि रवींद्र जारी यांची व्हायोलिन आणि सतार वादनाची जुगलबंदी, बेगम परवीन सुलताना, रघुनंदन पणशीकर आणि पं. जसराज यांच्याबरोबरच किशोरीताईंची यादगार मैफल या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. जे.बी.एल.हरमन ग्रुपने हा महोत्सव पाच वर्षे प्रस्तुत करण्याचा मनसुबा यावेळी जाहिर केला.

 
 पुण्याला संगीत महोत्सवाची मोठी परंपरा आहे. त्या वैभवशाली परंपरेत आणखी एका भव्य महोत्सवाची भर पडणार आहे.


-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276