subhash inamdar

subhash inamdar

Friday, December 23, 2011

खरी कला आणि खरा कलाकार

नटसम्राटाचे चिंतन....



`कलायात्री` हा संस्कार भारतीनं
केलेला फार मोलाचा उपक्रम आहे...


कलेच्या माध्यमातून प्रत्येक कलाकाराच्या
कलाजीवनांत खोलवर शिरुन विचार व्हावा.
करायचे ठरविले तर ते जरुर करता येईल.
वास्तविक कलाकार हा गौरवार्थी शब्द आहे.


खरा `कलाकार` म्हणजे कोण ?
तर `तो` एखाद्या कलेनं भारलेला आहे.
त्या कलेचा त्याने ध्यास घेतलेला आहे तो !
जो आपल्या कलेद्वारे आपले म्हणणे प्रभावीपणे,
परिणामकारकरित्या मांडू शकतो तो !
अंगभूत प्रतिभेचे दर्शन जो घडवू शकतो , तो !
त्याला कालाकार म्हणता येईल.

कला म्हणजे काय ?
याची व्याख्या सांगणं फार अवघड आहे.
मलाही खरं तर ते निटसं सांगता येणारं नाही.
चित्रकला पाहिली तर भिंती, पाट्या रंगविणा-या पासून
पिकासो सारख्या जगद्विख्यात चित्ररकारापर्यंत सारे कलाकारच आहेत.
मॉडर्न आर्टही त्यातच येते.

मग ख-या प्रतिभावंताचे जी कला अंगीकारली, त्यात प्रगती करावी
त्या कलेमध्ये रमून जावे. सामाजबांधिलकीची जाण ठेवून स्वतःच्या बुध्दीला पटेल तेच करावं,
ती खरी कला आणि ते खरा कलाकार !

तर, प्रामाणिकपणे स्वतःचा शोध घ्यावा. कलात्मक आनंद मिळवावा.
त्यात्तली आद्भूतता अनुभवावी, आणि निर्मिती करावी...




-डॉ. श्रीराम लागू.

कलायात्री...दैनंदिनी २०१२ मधून साभार
संस्कार भारती,(पश्चिम प्रांत)

वेळेचे भान अन् रसिकांची सल

वाढलेल्या पुणे महानगरात संध्याकाळी-रात्री ८ नंतर रिक्षा मिळणे ही एक कठीण आणि धावपळीची गोष्ट आहे. पैसा तर जातोच पण अनेकविध संवादांची देवाण घेवाण होते. याचा फटका बसतो तो पुण्यात दररोज होणा-या विविध कार्यक्रमांना. मनात इच्छा भरपूर असते पण परत घरी जायचे कसे हा प्रश्न कार्यक्रमातही सतावतो. याची दखल वाहन सेवेनी आणि कार्यक्रमांच्या आयोजकांनी घ्यावी यासाठी लेखन प्रपंच.....




शहर वाढले. पसरले. अगदी नको तेवढ्या प्रमाणात विस्तारलेही. पण अनेकविध कार्यक्रमांच्या दृष्टीने सारे जणू एकवटले गेले ते पुणे शहराच्या महत्वाच्या भागात. पुण्यातल्या कार्यक्रम स्थळांचा विचार केला तर....

एस. एम. जोशी सभागृह,
निवारा वृध्दाश्रम,
पत्रकार संघाचे सभागृह,
लोकमान्य सभागृह, नारायण पेठ,
भरत नाट्य मंदीर, सदाशिव पेठ,
भारत इतिहास संशोधन मंडळ, सदाशिव पेठ,
बालशिक्षण संस्थेचे, मयूर कॉलीनीतले सभागृह,

याशिवाय बालगंधर्व रंगमंदिर आमि य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह आहेतच....

पण प्रत्येक ठिकाणापासून घरी परतणा-या रसिकांची, वाचकांची, श्रोत्यांची निरासा होते, जेव्हा कार्यक्रम संपवून ते घरी जायला निघतात.
रिक्षावाल्यांशी सुसंवाद घडून त्यांची घरी जाण्याची सोय होण्यासाठी खदी कधी तर रक्तही आटवावे लागते....मिलाली बुवा एकदा रिक्षा....असे हुश्श...व्हायला होते..पण बरेचवेळा जायची मोठी पंचाईत. आठ-साडेआठनंतर होते. कधातरी सुखद अनुभवही येतो..पण तो विरळाच...
बर- सार्वजनिक वाहने सेवा तरी धड आहे....वेळेवर आहे..की सगळ्या रुटला जाणा-या बसेस आहेत...विसरा ते सारे... इतर साधनेही तशी दुबळीच...
मात्र थोडा दिलासा यात संयोजक आणि कार्यक्रमाचे आयोजकच देऊ शकतील. जर त्यांनी ठरविले की कार्यक्रम वेळेत सुरू ,करून वेळत संपवायचा.... तरच.
अनुभव असा की ५ ची वेळ असली तर समजावे ५.३० शिवाय जाण्यात काही अर्थ नाही.
सहाचा असेल तर साडेसहा धरुन चाला..
तीच गोष्ट वेळत सुटण्याची... तिकडेही कानाडोळा होतो..कलावंताच्या आणी रसिकांच्या आग्रहामुळेही कार्यक्रम लांबतो....आणि कधी कधी संयोजकांच्या हाताबाहेरही जातो...
संयोजक मंडळी याबाबत वेळेचे बंधन पाळले..तर रिक्षाही किंवा इतर सुविधा घरी जाणा-यांना सहजपण मिळतील.
खरं म्हणजे येणारा प्रेक्षक अनेक आवडत्या मालिका टाळून ...तकर कुणी घरचे अर्धवट टाकून....तर इतर मोहातून वेळ काढून खास कार्यक्रमांसाठी गर्धी करतात..तो तन्मयतेने ऐकतात...
मात्र वेळेचे गणीत आणि नाघण्याची वेळ जुळली की सारे कसे सुरळीत..होईल...
पाहू या या आमच्या विचाराची दिशा कोण पकडतो ते...मात्र काळाप्रमाणे फार लांबलेला कार्यक्रम कंटाळवाणा ठरतो..तर वेळेत सुरु झालेला कार्यक्रम आयत्यावेळी गुंडाळाव लागतो...
काय आमचे हे टिपण दखल घेण्यासारखे वाटते काय...?
असल्यास प्रतिक्रिया कळवा..मी ते संयोजकांपर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न करेन..




सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276