
`जेथ राघव तेथे सिता`

गजानन दिगंबर माडगूळकर. गदिमा यांच्यामागे आपल्या गाण्याची आवड बाजुला ठेऊन कुणी खंबीर साथ दिली असेल तर त्या विद्याताई माडगूळकर यांनी. पूर्वाश्रमीच्या त्या पद्मा पाटणकर. उत्तम आवाजाची देणगी असूनही आपल्या पतीचे कर्तृत्व बहरावे. त्याला आपली अबोल साथ मिळावी यासाठी माउलीने लग्नानंतर केवळ गदिमांच्या पत्नीच्या रुपात स्वतःला झिजविले. त्यांची म्हणजेच आपल्या आईच्या अबोल प्रेमाच्या आणि आईच्या आणि वडिलांच्या स्नेहमय जीवनाच्या आठवणी रंगवीत आणि त्याला गीतरामायणातील गीतांची जोड जुळवित जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ७ मार्चला पुण्यात सादर झालेला कार्यक्रम म्हणजे सौ. जयश्री कुलकर्मी यांनी सादर केलेला `जेथ राघव तेथे सिता` हा कार्यक्रम.
विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतीदिनानिमित्त हा खास कार्यक्रम केवळ
गीते. या रामाच्या आयुष्यातील प्रसंगाचे चित्रण शब्दात करणा-या थोर महाकवीचे ते महाकाव्य. त्यातून केवळ स्त्रीयांच्या विविध स्वभाव आमि भावनांचे वर्णन यथार्थ शब्दात गदिमांनी ती गीते रचली.
आणि सुधीर फडके यांच्या ध्येयवादी , श्रेष्ठ संगीतकाराने दिलेल्या चालीतून ती अजरामर झाली.
पाहुनी वेलीवरची फुले, राम जन्मला ग सखी, सावळा ग रामचंद्र, मोडू नका वचनाला नाथा, निरोप कसला, कोण तू कुठली राजकुमार, सूड घे त्यांचा लंका पती पासून, डोहाळे पुरवा रघुतीलका माझे पर्यंत सारीच गाणी आपल्या सुस्वर आवाजात मूळात बार्शीच्या पण गेली अनेक तपे पुण्यात रुळलेल्या नावाजलेल्या गायीका सौ. जयश्री कुलकर्णी यांनी हळूवारपणे आणि प्रसंगी तेवढ्याच झोकात. दमदार आणि टेचात सादर करुन रसिकांची मने जिंकून घेतली.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा खालचा सारा प्रेक्षागृह त्या गीतांना दाद देत माना आणि हाताने ताल देत डोलत होता.
राजेंद्र दूरकर (तबला), जयंत साने (हार्मानियम) आणि दर्शना जोग (सिंथेसायझर) यांनी गीताला साज उत्तम देऊन गाणी अधिक श्रवणीय केली.
मात्र वेगळेपण उमजले ते गदिमापुत्र आनंद माडगूळकर यांचे. त्यांची ओघवती भाषा. जीवंत अनुभव. त्यातून गदीमांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाची गुंफण . एवढेच नव्हे तर गीतरामायणातल्या त्या त्या गीताला पुरेसे पोषक भाष्य. सारेच अप्रतिम आणि सहज. यातून स्त्रीची वेदना, तीचे अबोल श्रम आणि आपल्या आईने गदिमांना दिलेल्या साथीचे यथार्थ दर्शन उलगडत त्यांनी या कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन बसवविले.
मध्यंतरात `नामाची आवडी` या सीडीचे प्रकाशन ज्येष्ठ्य़ पत्रकार अनंत दिक्षित यांच्या हस्ते करुन एक वेगळा आनंद रसिकांना देऊ केला. प्रा. मिलिंद जोसी यांनीही जयश्री कुलकर्णींच्या गायनातल्या तयारीचे कौतूक करुन गदिमा महती आळविली.
एक वेगळा गान-आनंदाचा सोहळा अनुभवताना रसिक यात पूर्णपणे दंग होऊन गेले. गेली अनेक वर्ष संगीत क्षेत्रात विविध गाण्यांनी रसिकांचा परिचित असलेल्या या गायिकेने स्वतःचे वेगळेपण यातून सिध्द केले.
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276