subhash inamdar

subhash inamdar

Saturday, October 5, 2013

हिंदू महिला सभेच्या नवरात्रोत्सवास आरंभ

गेली ६२ वर्षे सदाशिव पेठेतल्या शिवाजी मंदिर इथे होणारा नवरात्र महोत्सव ती सारी जागा विकासकाला दिल्याने त्यावर बहुमजली इमारत उभी रहात असल्याने पुण्यातच पण केसरी वाड्यासमोरच्या गुप्ते मंगल कार्यालयात प्रतिष्टापित झाला..हिंदू महिला सभा, पुणे यांच्या वतीने यंदाच्या म्हणजे ६३ व्या वर्षीच्या नवरात्रींचे कार्यक्रमही सुरु झाले..
पुन्हा त्या जागेत कधी सुरु होणार याची साशंकता कार्यकर्त्या महिलांच्या मनात आहे.
असो..तर आता नवरात्रीच्या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी..

हिरव्या साडीतल्या व्हायोलीनवादिका सौ. चारुशीला गोसावी यांच्या व्हायोलीन गाते तेव्हा..या कार्यक्रमाने उत्सवातील पहिल्या सुरेल आणि स्त्रीच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देणा-या या एका कलावंत , सक्षम आणि नोकरी करुन कला जपणा-या या कलावंत महिलेची स्वराशी असलेले नाते यामुळे पुन्हा उजेडात आले.
विविध हिंदी मराठी गीतांनी त्यांनी तो सादर केला..तो रंगला हे काही सांगायची गरज नाही. त्यांची वाद्यावरची हुकमत आणि त्यांना  मिळालेली मोजक्याच साथीदारांची साथ..यामुळे गाण्यांना पुन्हा होऊन जाऊ दे (वन्समोअर) ची दाद मिळाली.
हे शारदे वागेश्वरी..ने सुरवात करून..लागा चुनरीमे दाग या भैरवीने व्हायोलीन गात राहिले.. महिला आणि रसिक ते ऐकत रहाले..ते तल्लीन झाले होते..टाळ्यांना प्रकिसाद मिळत होता.
निवेदक राजय गोसावी यांनी माफक पण आवश्यक माहिती सांगून अनेकांच्या मनात गाण्याबद्दलची ओढ निर्माण केली.

अभिजित जायदे यांची तबला साथ..तर राजेंद्र साळुंखे यांची तालवाद्यातून मिळालेली रंगत यामुळे गीते मोहक होत गेली. नचिकेत संत यांच्या की-बोर्डवरच्या नजाकतीने व्हायोलीनवरच्या गीतांमधले सुरेल पीसेस मनसोक्त आणि तंतोतंत ऐकता आले.चारुशीला गोसावी यांचा सत्कार हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा हिमानी सावरकर यांच्या हस्ते केला गेला.
उद्यापासून शनिवारपर्यंत रोज कलावंत महिला, आणि विविधअंगी गुण असलेल्या स्त्रीला इथल्या स्ंस्थेत पाचारण केले गेले आहे.


पुण्याच्या शिवाजी मंदिराच्या परिसरात आत्तापर्यंत असलेल्या या संस्थेला आता नव्या दिशा आणि नवा मार्ग मिळेल..स्त्रीची प्रगती आणि स्त्रीचा विकास साधायची असेल विविध क्षेत्रात काम आणि कार्य करणा-या महिलांना नव्याने लोकांसमोर आणण्याचे काम करायला हवे..ते ही संस्था करत आहे.


- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276