रेवा नातू यांच्या
शास्त्रीय संगीतातील अभ्यासपूर्णतेचे दर्शन
अभिजित नातू यांच्या
अभिनव संकल्पनेतून साकार
झालेला दहा
रागांवर आधारित आणि दहा
वेगवेगळ्या तालात सादर झालेला
कार्यक्रम पुण्यातील भारती निवासच्या
सभागृहात उत्तरोत्तर रंगत तर
गेलाच पण त्यात
रेवा नातू यांच्या
अभ्यासपूर्ण गायकीचे दर्शन यातून
पुणेकरांना घडले. प्रत्येक रागाचे
दर्शन अवघ्या दहा
मिनिटात दाखविताना रागाचे पूर्ण
आकलन करून ते
या मोजक्या वेळात
मांडणे केवळ अशक्य..पण ते
रेवा नातू यांनी
घडविले..आणि आपल्या
जोडीच्या साथीदारांनाही त्यांच्या वादनातून त्यांंचेही
कलादर्शन करण्याची संधी दिली..
चारूशीला गोसावी..व्हायोलीन आणि
लिलाधर चक्रदेव ..हार्मोनियम यांनीही
साथ करताना आपल्या
वादनातून एका रागाचे
सादरीकरण केले.
आपले वडील पंडित
विनायक फाटक आणि
भाऊ प्रशांत फाटक
यांची तबला साथ
खरोखरीच सुंदर होती.. विनायक
फाटक पुणे आकाशवाणीत
तबला वादक म्हणून
अनेक वर्षे काम
केले..मात्र याही
वयात त्यांच्या बोटातली
नजाकत केवळ थक्क
करणारी ठरते.. त्याच्या मते
ही वाद्ये आपल्याशी
बोलतात..मला तुमच्यात
घ्या म्हणतात..म्हणून
ते शक्य झाल्याचे विनायक
फाटक सांगतात..
रेवा नातू यांनी
तर वेगवेगळे राग
घेऊन थोडक्या वेळात
इतके छान आणि
बहारदार गायन केले
की त्याचे वर्णन
मी तोकड्या शब्दाच्या
आधारे करू शकणार
नाही.
श्री रागापासून सुरवात करून मंगल भेरव, यमन, बागेश्री, शंकरा, हमीर, मालकंस आणि शेवट केला तो भैरवीने..
आपले संगीताचे शिक्षण रैवा नातू यांनी पं.आगाशेबुवा , पं. शरद गोखले आणि सध्या डॉ. दिग्वीजय वैद्य यांच्याकडून घेतले असून त्यांनी पंडिता अश्विनी भिडे..देशपांडे यांच्या काही बंदिशी, रचना या कार्यक्रमासाठी त्यांच्या परवानगीने सादर केल्या. अतिशय नम्र आणि सालस असे त्यांचे व्यक्तित्व असून साधेपणा हा त्यांचा स्थायीभावच आहे.
गळ्यावर विलक्षण हुकूमत..तालाचे आणि स्वरांचे उत्तम प्रभुत्व आणि रागाचे पूर्ण आकलन करून ठरलेल्या वेळेत तो राग खुलविण्याचे कसब यांतून त्यांनी ही वेगळी वाटावी आशी मैफल रंगवत रसिकांच्या मनात भरविली. आपले स्वतंत्र स्थान त्यांनी
निर्माण केले आहे.
त्यातही चारुशीला गोसावी यांनी व्हायोलिनवर वाजविलेला राग देस आणि
लीलाधर चक्रदेव याने हार्मोनियमवर जो काही प्रतीक्षा रागाचे परिपूर्ण दर्शन घडविले तेही तेवढेच मोहक होते.
रागाबरोबरच
पाडेपाच मात्रा, साडेसात मात्रा,
साडेनऊ मात्रा आणि साडेअकरा
मात्रांचा ठेका त्यांनी
निवडला. रुपक, रूद्र, झपताल,
मत्त ताल, सुनंदन,
पंचम सवारी, अडा
चौताल, एकताल आणि त्रिताल
या तालांचे दर्शन
यातून झाले.
थोडक्या वेळात शास्त्रीय संगीतातील राग अवघ्या दहा मिनिटात परिपूर्णरित्या मांडण्याचा हा प्रयत्न पुन्हा पुन्हा रसिकांनी अनुभवावा असाच होता..
..
महाराष्ट्रातील
संगीत शिकविल्या जाणाऱ्या
वर्गातील विद्यार्थ्याना तो ऐकविला पाहिजे. संगीत साधकांना हा कार्यक्रम एक पाठ म्हणून ऐकणे मला तरी महत्वाचे वाटते.
संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन केले ते
आटोपशीर आणि त्या
विषयाशी संबंधित अशा डॉ.
मृणाल धोंगडे यांनी..
संगीतातील अभ्यास असलेल्या आणि
कमी वेळात नेमकी
माहिती देताना त्यांनी तालाचे
सांगितलेले बोलही आत्ताही आठवितात..
एक अभ्यासपूर्ण असा हा अभिनव उपक्रम एका छोट्या सभागृहात झाला तरी जाणकार रसिकांच्या साक्षीने तो अधिक रंगतदार झाला. कारण ऐकणारे श्रोतेही तेवढेच मन लाऊन जेवढे ऐकतील आणि त्याला दाद देतील तेवढा कार्यक्रम रंगत जातो.
असा कार्यक्रम केवळ अभ्यास म्हणून केला असला तरी तो अधिकाधिक संगीत रसिकांपर्य़त पोहोचविण्याची जबाबदीरी..उत्तम रसिकांचीही आहे..हे ही लक्षात असू द्यावे.
-सुभाष इनामदार, पुणे
subhasdhinamdar@gmail.com
9552596276