subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, December 30, 2015

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..मंगेश पाडगावकर यांना समर्पित..

या जन्मावर प्रेम करावे असा आपल्या सुंदर..आयुष्यातल्या सर्व वळणार आनंदाने जगायला लागणारे ब आपल्या शब्दातून सर्वांच्या रसिकतेला सलाम करणारे ज्येष्ठ कवीवर्य मंगेश पाडगावकरांचे निधन झाले..
वाटेवरच्या प्रत्येक वळणावर पाडगावकरांची कवीता साथ करीत रसिकाच्या मनात रुंजी घालत होती..
मग ती लिज्जत पापडाच्या जाहिरातीत दरवर्षी हमखास भेटणारी असो वा श्रावणात बरसणा-या रिमझिम धारांनी तृप्त करणारी असो..

जगताना भान देणारी आणि जगायला बळ देणारी त्याची प्रतिभा सतत मराठी मनात कायम वास्तव्य करत राहिली..
केवळ कवीता करून ते थांबले नाहीती..ती रसिकाच्या मनापर्यत आपल्या शब्दांच्या भावनांनी बोलकी करत ते देशभर फिरले..त्यांच्या कवीता सादर करण्यातला वेगळेपणा शब्दातून सांगता येत नाही..तो अनुभवावाच लागेल.
शब्द त्यांच्या पुढे पुढे करत आणि त्यांना ते अगदी निवडक..वेचित मराठी मनाला संपन्न करत एकेक कवीता करत राहिले..
आता कितीही सूर लावून गायलेले गीत त्यांच्यापर्य़त पोचू शकणार नाहीत..कारण ते आपल्यातून कायमचे दूर निघून वेगळ्या प्रवासाला निघाले आहेत..


आपल्या पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा मारून त्यानी हा मृत्यूलोक सोडला. आता आपल्याला डोळ्यामधले आसू पूसून ओठांवर गाणे म्हणावे लागेल.
कारण ह्दयात दाटलेले सारे ह्दयातच राहिले आहे..आता बंद पापण्यांनी अश्रूत भिजवून त्यांची आठवण उरली आहे.
पाठीवर मायेने फिरणारा त्यांचा हात केवळ थरथरला नाही तो आता  उरलाच नाही ..असे झाले आहे.
आता अवती भवती न पाहता आकाशी पाहण्याचे आपल्या नशीबी असणार आहे.
तुमचे चित्र समोरून जाताना पाहण्याचे फक्त उरले आहे..
त्यांच्या शब्दात सांगायचे म्हणजे तू कुठेही जा...चंद्र माझा साथ आहे...गीत माझे घेऊन जा ..त्यात माझा प्राण आहे..म्हणत पाडगावकर गेले.

अंतरी कारूण्य असताना वेदनेची फुंकर घालीत त्यांची कवीता आपल्या सोबत आहे..त्यांचा तो आवाज माध्यमाच्या चमचमत्या लखलखाटात उरला आहे..ते शब्द आता आपली साथ करणार आहे..त्यातली वेदना..प्रेम, कारूण्य..तरलता सारे तसेच आहे..पण ज्या शरीरातून ही वेदनेची फुंकर घातली गेली ते शरीर आता उरले नाही..याचा खरे दुःख आहे..
आता नवल वर्तले..अंती देवाचिये पायी
ज्योत जळून काजळी उरलीच नाही...
ते पिंपळपान आता गळून गेले..नदीच्या काठचे गाणे विरून गेले..आता केवळ उरल्या स्म-ती..वेदना आणि हूरहूर..

त्यांच्या स्मृतीला सांस्कृतिक पुणेच्या वतीने विनम्र शब्दांजली..-सुभाष इनामदार,
www.culturalpune.blogspot.com
9552596276

Wednesday, September 30, 2015

रसिक भारावले तिघींची नृत्यकला पाहून
मध्यंतरी तीन युवतींची नृत्यकला पाहण्याची संधी मिळाली..खरचं किती छान तयारी होती त्यांची.. आपल्या गुरुकडून भरतनाट्यमच्या सा-या प्राथमिक शिक्षणाच्या कला शिकल्यावर  गुरुंच्या म्हणजे नृत्यांजली संस्थेच्या प्रमुख सौ. अंजली गोखले-भाटवडेकर यांच्या परवानगीने  प्राजक्ता विवेक कुलकर्णी,चैतन्या चंद्रकांत जाधव आणि मुग्धा विजयकुमार पाध्ये यांनी पुण्याच्या बालशिक्षण मंदीरात आपला पहिला जाहिर कार्यक्रम म्हणजे अरंगेत्रम..सादर केले

आणि खरोखरीच रसिकांना नृत्यकलेतील निपुणतेचे दर्शन घडविले.

मलरी, अलारिपू, जातीस्वरम, दशावतार..आणि मध्यतरांनंतर पदम्, तिल्लीना, अभंग आणि मंगलम्..अशी एकापेक्षा एक तयार रचनेतून केलेले सादरीकरण पाहताना या कलेत किती एकाग्रचित्त झाल्या आहेत हेच स्पष्ट होत होते.

यातले तांत्रिकपण जरी फारसे समजले नाही तरी जे काही त्या सादर करीत होत्या त्याला ताल, लय आणि त्पातल्या पदन्यासाचे ते एकचित्त स्वरूप पाहताना त्यांचा अभिमान वाटतो..

अशा कला पारंपारिक पध्दतीने आजही सादर केल्या जातात..आणि या अधुनिक काळाचे आवरण असलेल्या
जमान्यातही पालक आपल्या कन्यकांना ती सादर करण्यासाठी परवानगी देतात याचे अधिक बरे वाटते.
तसे पाहिले तर ह्या सर्वच कला शिकण्यासाठी असणारी जिद्द आणि पराकाष्ठ्येची भक्ती यातून दिसून येते..
आपल्या गुरूवर असलेला अढळ विश्वासही याला कारणाभूत ठरतो..

यासर्वांना साथसंगत करणारी मंडळीही उत्तम होती...गायक मयुर महाजन, मृदंगवर शंकर नारायणन्, पखवाज- राजू जावळकर, व्हायोलिन- रमाकांत परांजपे, सिंथेसायझर- केदार परांजपे आणि निवेदनाची यथायोग्य बाजू सांभाळणारे रवीन्द्र खरे यांचाही उल्लेख नक्कीच करावा लागेल.

यासाठी सौ. निलिमा व विवेक कुलकर्णी, सौ. उमा व चंद्रकांत जाधव आणि सौ. सषमा व विजयकुमार पाध्ये या माता-पित्यांनाही धन्यवाद द्यावासा वाटतो..
यासाठी आर्थिक झीज तर होतेच..पण कलेतले प्राविण्य मिळविल्यावर ते अद्भूत  सादरीकरण पाहण्यातला अभिमान तिनही माता-पित्यांना धन्यतेकडे घेऊन जातो..

अतिशय मृदु आणि निगर्वी अशा गुरु सौ. अंजली भाटवडेकर यांचे गोडवे गावे तितके कमी पडतील..
त्यांनी या तीनही कलावतींना देखणे रुप प्राप्त करुन कलेतील साधना एकाग्रतेने शिकण्याची जिद्द निर्माण केली...

पुढील काळात  त्या तीनही कलावती उत्तम नृत्यकलानिपूण होतील आणि आपल्या गुरूंचे, आई-वडीलांचे आणि भारतीय संस्कृतीचॉी महती पुढे उत्तमरित्या जपतील यात शंका नाही..त्यांना खूप सा-या शुभेच्छा.-सुभाष इनामदार, पुणे

Saturday, April 18, 2015

....त्या फुलांच्या गंधकोषी

मिलिंद रथकंठीवार यांच्या ई-बुकचे प्रकाशन आणि त्यानिमित्त त्यांच्याशी संवादअक्षरधाराच्या कुसुमाग्रज कट्ट्यावर रविवारी  १८ एप्रिलला...एका नव्या लेखकाच्या नव्या कादंबरीचे ईबुक आनंदाचे पासबुक लिहिणारे साहित्यिक श्याम भुर्के यांच्या हस्ते प्रकाशन केले गेले..त्यानिमित्ताने लेखकाशी संवादाचा खास कार्यक्रम विनया देसाई यांच्या प्रश्नातून उलगडत गेला..
महाराष्ट्र बॅंकेच्या पर्वती शाखेत पैशाची देवाण घेवाण करणारा हा लेखक म्हणजे मिलिंद रथकंठीवार...अभिवाचक, गायक, चित्रकार..आणि कादंबरीकार..म्हणजे साहित्यिाकाच्या कोषात मोडणारा आसा हा हरहुन्नरी माणूस...

शब्दांचे व्यसन लागले की ते तुम्हाला त्यातच गुंगवून ठेवते..तसे त्यांचे झाले..या फुलांच्या गंधकोषी..या पुस्तकातून एक निरागस ..प्रेमाची उदबोधक कहाणी लेखकाने मांडली आहे...त्या व्यक्तिरेखेतले प्रेम खोलवर माणुसकीचा झरा दाखविणारे उक्तट ..नितांत सुंदर आमि सात्विक आहे..निर्मळतेतून ती कादंबरी फुलत जोते..अखेरीस नायिकेला आपले मरण समोर दिसत असतानाही ती आपल्यातला हा प्रमाचा झरा पाझरू देत नाही..अशी काहिशी या कादंबरीचा कथा आहे..

या कादंबरीवरुन मानिकाही बनण्याच्या मार्गावर आहे..त्यातली गीते कवी जयंत भिडे यांनी लिहली आहेत..भिडे यांच्या मते अतिशय तरल अशी ही प्रेमकहाणी लेखकाने यातून मांडली आहे..त्यातले प्रसंग अगदी खरे घडलेत असे वाटतात...म्हणूमन मला भावगीताच्या धर्तीवर आधारित गीते सुचली..


नव्याने प्रेरणा घेऊन लिहलेल्या या कादंबरीच्या प्रकाशनाकरीता  तेजल प्रकाशनाने आपले दार उघडे करुन त्यात  रथकंठीवार यांच्यासारख्या नविन लेखकाला प्रोत्साहित केले..
या निमित्ताने पुस्तकातील काही भागाचे आणि गीतांचे सादरीकरण केले गेले..हे पुस्तक वाटण्याची उस्तुकता तुमच्या प्रमाणेच मलाही आहे..हे निश्चित..
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276