subhash inamdar

subhash inamdar

Saturday, December 17, 2011

कविता माझी अवस्था- मयुरेश कुलकर्णी

`एकांतील ओळी` केपटाऊनला संशेधनसाछी वास्तव्य असलेल्या मयुरेश कुलकर्णी यांच्या चारोळीच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचा घाट पुण्यात काल्हापूरच्या मुक्ता पब्लिकेशनच्या वतीने शक्रवारी संध्याकाळी पुण्यातल्या एस एम जोशी सभागृहात घातला होता.

लग्नाच्या धामधुमीचे दिवस असल्यामुळे वाचक, रसिक मोजकेच होते. पण जे होते ते मयुरेशच्या शब्दांच्या प्रेमतच पडले....

साधी भाषा. थेट भिडणारी साधी बोली. जे सांगायचे ते मोजक्याच पण तकेवढ्याच तिडकीने सांगणा-या ओळी...अशा मस्त मजेशीर शब्दांची ओंजळ घेऊन तो सभागृहाच्या व्यासपीठावर एकटा लढत होता. प्रेक्षकही तेवढेच मश्गुल होऊन..प्रेम, वेदना, राग, हुरहुर, दुखः, एकाकीपण आणि आई-वडीलांविषयीच्या आदराच्या भावना ऐकत होते..आणि दादही देत होते.

आपण कविता करतो कारण सांगता तोच म्हणतो....

कविता माझी अवस्था
जे बोलता येत नाही
ते लिहितो मी
अशीच आहे व्यवस्था


असाच मैफलीतून एकोक चारोळी आणि कवितांची पामे उलगडत मयुरेश शब्दांवहोवर रसिकांच्या मनॉतले भावही टिपत होता जणू. पीएचडी करण्यासाठी वास्तव्य करणारा हा मयुरेश केपटावूनमध्ये बसून मराठी भाषेतल्या संवेदना तेवढ्याच उत्कटपणे चारोळींतून सागत होता...

ग्रंथासाठी लिहितो न मी
पुस्ककासाठी मी ना लिहितो
माझ्या मनातले मी
माझ्यासाठी लिहितोकवितांचा खेळ पुस्तकरुपाने मुक्ता पब्लिकेशन्सने प्रकाशित केलाय. यापूर्चाही `शोध मनाचा` हे पुस्तकही त्यांनीच त्याच्या रचनांवर भारावून जावून काढले होते. मुक्ताच्या वतीने संचालिका विजया पाटील .यांनी त्यांचे कौतूक करताना `मराठी भाषेवर तिथे राहून प्रेम करणारा मुलगा `म्हणून खास शब्दात ओळख करुन दिली. आम्ही काही पुस्तके व्यवसायाचा विचार न करता वेगळी पण तरुण, नवोदितांना संधी देण्यासाटी काढतो असेही त्या म्हणाल्या.

एकांतातल्या ओळीचे प्रकाशन मयुरेशच्या आजी श्रीमती विजया कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
एक भावपूर्ण पण मराठी भाषेवर प्रेम करणा-या उद्याच्या पिढीसाठी आणि पिढीच्या भावनांसाठी झाले ,
याचे वेगळेपण हेच सांगावे लागेल.


-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


मयुरेश कपलकर्णीचा हा ब्लॊग पहा...

(http://mayureshkulkarni.wordpress.com)