संगीताचा शरीरावर आणि मनावर होणार परिणाम सांगणारा अनोखा कार्यक्रम
पुणे- भारतीय संगीताद्वारे शरीरावर व मनावर कसे परिणाम होतात. कोणता स्वर आपल्या कोणत्या अवयवावर कसा परिणाम करतो .भारतीय शास्त्रीय संगीतातील राग व वेगवेगळे मानवी आजार यांचा परस्परांशी कसा संबंध आहे. कोणत्या रागामुळे कोणता रोग बरा होण्यास मदत होते. संगीतामुळे मेदूवर चांगला परिणाम कसा होतो.. संगीताचा मानवी मनावर होणार परिणाम अशा अनेक गोष्टींचा परामर्श घेणारा कार्यक्रम म्हणजे `आरोग्य संगीत`.`
सारे काही संगीताच्या ,गाण्याच्या आणि वाद्यवृदांद्वारे सांगणारा हा अनोखा कार्यक्रम. कोणत्या रोगावर कोणत्या रागातील कोणते गाणे ऐकायला पाहिजे हे सारे प्रत्यक्ष दाखवून देणारा हा कर्यक्रम आहे. गाण्यांबरोबरच बासरी व व्हयोलीन या वाद्यांवरील काही गाणी, धून, फ्यूजन आणि जुगलबंदाही यात सादर होणार आहे.
कोल्हापूरच्या `फायटो फार्मा आर्ट सर्कल` आयोजित आणि `संस्कार जीवनगाणे` प्रस्तुत `आरोग्य संगीत` या कार्यक्रमाची मूळ संकल्पना श्री. दिनेश गुणे यांची आहे. निवेदनाची बाजू श्री. मंगेश वाघमारे व सौ. केतकी कौजलगी यांनी सांभाळली आहे.. पुण्यात सांस्कृतिक पुणेच्या सहकार्याने होणारा हा कार्यक्रम शनिवार १९ मे २०१२ला संध्याकाळी सहा वाजता पत्रकार संघाच्या सभागृहात सादर होईल.
यात मी मराठी आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचा उपविजेता प्रल्हाद जाधव आणि सारेगम फेम वृंदा कुबेर यांचा प्रमुख गायक म्हणून सहभाग असून सचिन जगताप (बासरी), केदार गुळवणी (व्हायोलीन), स्वप्नील साळोखे( ढोलक आणि ढोलकी) तर शिवाजी सुतार (की बोर्ड) सचिन पन्हाळकर( तालवाद्ये) या वादक कलावंताचा सहभाग असणार आहे.
हा कार्यक्रम सर्व रसिकांना खुला आहे.