subhash inamdar

subhash inamdar

Saturday, July 29, 2017

अनवट रागातून नटवलेली दहा रागांची अभिनव मैफल


रेवा नातू यांच्या शास्त्रीय संगीतातील अभ्यासपूर्णतेचे दर्शन

अभिजित नातू यांच्या अभिनव संकल्पनेतून साकार झालेला  दहा रागांवर आधारित आणि दहा वेगवेगळ्या तालात सादर झालेला कार्यक्रम पुण्यातील भारती निवासच्या सभागृहात उत्तरोत्तर रंगत तर गेलाच पण त्यात रेवा नातू यांच्या अभ्यासपूर्ण गायकीचे दर्शन यातून पुणेकरांना घडले. प्रत्येक रागाचे दर्शन अवघ्या दहा मिनिटात दाखविताना रागाचे पूर्ण आकलन करून ते या मोजक्या वेळात मांडणे केवळ अशक्य..पण ते रेवा नातू यांनी घडविले..आणि आपल्या जोडीच्या साथीदारांनाही त्यांच्या वादनातून त्यांंचेही कलादर्शन करण्याची संधी दिली.. चारूशीला गोसावी..व्हायोलीन आणि लिलाधर चक्रदेव ..हार्मोनियम यांनीही साथ करताना आपल्या वादनातून एका रागाचे सादरीकरण केले.

आपले वडील पंडित विनायक फाटक आणि भाऊ प्रशांत फाटक यांची तबला साथ खरोखरीच सुंदर होती.. विनायक फाटक पुणे आकाशवाणीत तबला वादक म्हणून अनेक वर्षे काम केले..मात्र याही वयात त्यांच्या बोटातली नजाकत केवळ थक्क करणारी ठरते.. त्याच्या मते ही वाद्ये आपल्याशी बोलतात..मला तुमच्यात घ्या म्हणतात..म्हणून ते शक्य झाल्याचे  विनायक फाटक सांगतात..रेवा नातू यांनी तर वेगवेगळे राग घेऊन थोडक्या वेळात इतके छान आणि बहारदार गायन केले की त्याचे वर्णन मी तोकड्या शब्दाच्या आधारे करू शकणार नाही.
श्री रागापासून सुरवात करून मंगल भेरव, यमन, बागेश्री, शंकरा, हमीर, मालकंस आणि  शेवट केला तो भैरवीने..आपले संगीताचे शिक्षण रैवा नातू यांनी  पं.आगाशेबुवा , पं. शरद गोखले आणि सध्या डॉ. दिग्वीजय वैद्य  यांच्याकडून घेतले असून त्यांनी    पंडिता अश्विनी भिडे..देशपांडे यांच्या काही बंदिशी, रचना या कार्यक्रमासाठी त्यांच्या परवानगीने सादर केल्या.  अतिशय नम्र आणि सालस असे त्यांचे व्यक्तित्व असून साधेपणा हा त्यांचा स्थायीभावच आहे.
गळ्यावर विलक्षण हुकूमत..तालाचे आणि स्वरांचे उत्तम प्रभुत्व आणि रागाचे पूर्ण आकलन करून ठरलेल्या वेळेत तो राग खुलविण्याचे कसब यांतून त्यांनी ही वेगळी वाटावी आशी मैफल रंगवत रसिकांच्या मनात भरविली. आपले स्वतंत्र स्थान त्यांनी
 निर्माण केले आहे.


त्यातही चारुशीला गोसावी यांनी व्हायोलिनवर वाजविलेला राग दे आणि


लीलाधर चक्रदेव याने हार्मोनियमवर जो काही प्रतीक्षा रागाचे परिपूर्ण दर्शन घडविले तेही  तेवढेच मोहक होते.रागाबरोबरच पाडेपाच मात्रा, साडेसात मात्रा, साडेनऊ मात्रा आणि साडेअकरा मात्रांचा ठेका त्यांनी निवडला. रुपक, रूद्र, झपताल, मत्त ताल, सुनंदन, पंचम सवारी, अडा चौताल, एकताल आणि त्रिताल या तालांचे दर्शन यातून झाले.

थोडक्या वेळात शास्त्रीय संगीतातील राग अवघ्या दहा मिनिटात परिपूर्णरित्या मांडण्याचा  हा प्रयत्न पुन्हा पुन्हा रसिकांनी अनुभवावा असाच होता..
..
महाराष्ट्रातील संगीत शिकविल्या जाणाऱ्या वर्गातील विद्यार्थ्याना तो ऐकविला पाहिजे. संगीत साधकांना हा कार्यक्रम एक पाठ म्हणून ऐकणे मला तरी महत्वाचे वाटते.

संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन केले ते आटोपशीर आणि त्या विषयाशी संबंधित अशा डॉ. मृणाल धोंगडे यांनी.. संगीतातील अभ्यास असलेल्या आणि कमी वेळात नेमकी माहिती देताना त्यांनी तालाचे सांगितलेले बोलही आत्ताही आठवितात..

एक अभ्यासपूर्ण असा हा अभिनव उपक्रम एका छोट्या सभागृहात झाला तरी  जाणकार रसिकांच्या साक्षीने  तो अधिक रंगतदार झाला. कारण ऐकणारे श्रोतेही तेवढेच मन लाऊन जेवढे ऐकतील आणि त्याला दाद देतील तेवढा कार्यक्रम रंगत जातो.
असा कार्यक्रम केवळ अभ्यास म्हणून केला असला तरी तो अधिकाधिक संगीत रसिकांपर्य़त पोहोचविण्याची जबाबदीरी..उत्तम रसिकांचीही आहे..हे ही लक्षात असू द्यावे.

-सुभाष इनामदार, पुणे
subhasdhinamdar@gmail.com
9552596276
Friday, June 30, 2017

वारसा संगीत नाटकांचा..

संगीत नाटकांची परंपरा सांगणारा सुरेख पट...

मराठी संगीत नाटकाची एकशे सत्तर वर्षांची परंपरा सांगणारा एक रंगमंचिय आविष्कार ललितकलादर्शची तिसरी पिढी म्हणजे बापुराव पेंढारकरांच्या नातवाने..ज्ञानेश पेंढारकर यांने नकताच भरत नाट्य मंदिरात खास पुणेकरांसाठी सादर केला.. जो वारसा त्याचे वडील भालचंद्र पेंढारकरांनी आपल्या सुविद्य पत्नीच्या साथीने पुढे नेला तो... वारसा संगीत नाटकाचा...हेच त्याचे शिर्षक होते..

भरत वाक्यापासून भैरवीपर्य़तचा हा संगीत वारसा चार तासाचा कालावधी घेऊन खास इथे केला गेल्या त्याचे कारण त्यांच्या निवेदनातूनच स्पष्ट होते..बालगंधर्व, भास्करबुवा बखले, वझे बुवा, खाडीलकर, गडकरी  ...हे सारे दिग्गज या पुण्यातले..त्यांनी हे संगीत नाटक जागतिक क्षितिजावर  फडकविले...त्यांना हा प्रयोग करून मानवंदना देण्याचा हा उद्देश होता..

नांदी, दिंडी, साकी..पासून नाट्यपदांच्या विविध छटा या बैठकीच्या पदातून इथे ऐकवित असताना..मागे पडद्यावर त्या काळचे चेहरे..पेहराव..ते नट यांचाही इतिहास दिसत होता..कांही ठिकाणी ते सारे पडद्यावर ऐकविले देखिल..

 ज्ञानेश पेंढारकरने  निलाक्षी पेंढारकर या आपल्य़ा सुविद्य पत्नीच्या सुरेल
आवाजातून  ही संगीत नाटकांची परंपरा उलगडून दाखविली..

आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जसा रसिकांचा स्पर्श झाला तसा तो पुण्यातल्या आणि मुंबईतल्या कलावंतांनीही हा प्रयोग पाहिला..अगदी अखेरपर्यत..त्यात कीर्ती, लता शिलेदार, मधुवंती दांडेकर, भास्करबुवा बखले यांंची नातसून लिखिका आणि गायिका शैला दातार, विद्याधर गोखले यांची कन्या शुभदा आणि जावई श्रीकांत दादरकर, गिरीजा काटदरे..असे कितीतरी..
रंगमंचावरही गायकात पं. राम मराठे यांची पणती आदिती मराठे यांनाही त्यात सामिल करून घेतले होते..

ज्ञानेश पेंढारकरांनी अनेक नाट्यपदे उत्तम गायलिही..पण दुरितांचे तिमिर जावो मधले..आई तुझी आठवण येते..या पदांनी रसिकांच्या मनात त्यांचे स्थान अढळ करून टाकले..

निलाक्षी पेंढारकरांनी स्वयंवर, मानापमान ते अखेरचा जोहार मायबाप..हा अभंग गाउन रसिकांना मोहात पाडले.
.
धनंजय म्हसकर यांनी कट्यार..ते मत्स्यगंधा मधील पदांना रसिकांसमोर मांडले. तर खास उल्लेख करावा लागेल  तो निमिष कैकाडी यांचा. त्यांने गायलेली सगळी पदे रसिकांनी टाळ्यांचा गजरात दाद देत ऐकली.. काहींना तर वन्समोअर घ्यावाच लागला.
तयारीचा दमदार आवाज यामुळे पुणकरांना ऐकता आला.

संकेत म्हात्रे आणि ऋग्वेदी प्रधान यांनी संवादातातून रसिकांना संगीत नाटकाचा इतिहास सांगितला..

आणि अखेरीस. या कार्यक्रमाची रंगत वाढविली किंवा ता ऐकावीसी वाटली ती उतम साथिदारांच्या संगतीमुळे. यात तबल्या धनंजय पुराणीक, हार्मोनियम लिलाधर चक्रदेव आणि ऑर्गनवर साथ करणारे पं. गोविंदराव पटवर्धन यांचे शिष्य मकरंद कुंडले..त्यांनी ऑर्गवर आपला सुरेल स्पर्श एका उत्तम नाट्यसंगीताच्या पदातून करवून दिला..

आपली संगीत नाटकांची परंपरा आता अशा बैठकीच्या कार्यक्रमातून का होईना..काळानुरुप टिकविण्याचे आणि तो वारसा पुढच्या पिढीपर्य़त नेण्याचे कसब ज्ञानेश पेंढारकर आणि निलाक्षी पेंढारकर करताहेत... यासाठी त्यांनी खास शाबासकी.
आणि ही शाब्दिक दादही...

सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276h

Monday, March 6, 2017

पाच व्हायोलीन वादकांचा सुरेल आविष्कार

ज्येष्ठ व्हायोलीन वादक पं.गजाजननबुवा जोशी यांची स्मृती पुण्यातील पाच व्हायोलीन वादकांनी आपल्या वादनातून जागी ठेवली. स्वरांवरची कमाल तयारी आणि तालाच्या संगतीने वादनातले बारकावे पुणेकर रसिकांनी रविवारी अनुभवले


`स्वरबहार` प्रस्तुत पं. भालचंद्र देव यांच्या पुढाकाराने गेली चौवीस वर्ष गजाननबुवांच्या शेलीचे स्मरण पुणेकरांच्या साक्षिने केले जाते.  

काल म्हणजे रविवारी..देवेन्द्र जोशी, अभय आगाशे्, सौ. चारूशीला गोसावी डॉ. सौ. निलिमा राडकर आणि पं.भालचंद्र देव या पाच व्हायौलिन वादकांची मैफल स्मरणात रहावी अशीच आनंद देऊन गेली..
 पं. भालचंद्र देव हे गजाननबुवांचे शिष्य..आपल्या गुरुच्या स्मरणार्थ दरवर्षी सादर होणा_या या मैफलीस पुढच्या वर्षी पंचवीस वर्षे होतील.


 नवोदित पण व्हायेलीन वादनात तरबेज असणारे वादक शोधून त्यांना ह्या व्यासपीठावर संधी देण्याची पं. देव यांची पध्दत आहे. यंदा देवैन्द जोशी हे त्यातलेच एक नाव.

 एस एम जोशी संभागृहातल्या छोटेखानी रंगमंचावर पं. गजाननबुवा जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांच्या वादनाची ध्वनीफित ऐकवून कार्यक्रमाची सुरवात झाली..पुढे दौन अडिच तास हा व्हायोलीन वादनाचा स्वरयज्ञ सुरू झाला तोच मुळी देवेन्द्र जोशी यां व्हायोलीन वादकाच्या बागेश्री रागातल्या वादनाने.. गेली काही वर्षे वादवापासून दूर गेलेले जोशी इथे मात्र आपली नजाकत दाखवून रसिकांच्या पसंतीस उतरले.


`व्हिओलीना` या व्हायोलीन दिनाच्या निमित्ताने लक्षात राहिलेले नाव म्हणजे अभय आगाशे..त्यांनी इथे हंसध्वनीचै सूर आळवून आपली वाद्यावरची हूकमत स्पष्ट सुरांतून मनात आपली प्रतिमा नि्र्माण केली.

   सौ. चारूशीला गोसावी आणि डॉ. निलिमा राडकर या दोन तयार व्हायोलीन वादकांनी जुगलबंदीत सादर केलेला राग मधुकंस त्यांच्या साधनेची महती आपल्या वादनातून सिध्द केली. दोनही कलावंतांची स्वरतालावरची पकड ऐकताना भान हरपून जात होते.. सिध्दहस्त कलावंतांची सारी लक्षणे त्यांच्या वादनातून पुणेकर रसिकांना स्पष्ट जाणवत होती.. सौ. गौसावी यांनी बालगर्धवांच्या गोड गळ्यातून टिपलेले स्वयंवर नाटकातले नरवर कृष्णा समान..हे पद व्हायोलिनच्या सुरातून ऐकताना श्रोते  डुलत
होते. तर डॉ. राडकर यांनी काफी रागातली धूनही तेवढ्याच मनस्वीपणे सादर केली. या दोन स्त्री कलावंतांचा आविष्कार या मैफलीतला सर्वात उत्तम सादरीकरणाचा नमुनाच होता.


 
 पं. गजाननबुवांचे शिष्य अवघे ब्याऐंशी वर्षाचे वयोमान असणारे पं. भालचंद्र देव यांची आपल्या छोट्या सादरीकरणाची सुरवात राग जनसंमोहिनीने केली. तुमची बैठक पक्की असली की कलेवरची निष्ठा वादनातून जाणवते..गुंतता ह्दय हे..हे नाट्यपद आणि शेवटी सादर झालेली भैरवी.. 

पं. देव यांच्या वादनातले बारकावे दाखवत रसिकांच्या चरणी लीन होत वादन संपवतात तेव्हा टाळ्यांचा नाद होतो...पण खरा कलावंत त्यात बुडून जात नाही..तर ती रसिकतेची थाप गुरूप्रसाद म्हणून स्विकारत आपली पुढील वाटचाल करत रहातो..

सगळ्या मैफलीची तबला साथ त्या त्या कलावंतांच्या वैशीष्ठ्यानुसार रविराज गोसावी यांनी समर्पक केली.. स्वरबहारचे पडद्यामागचे सूत्रधार राजय गोसावी यांनी थोडक्या शब्दातून निवेदन करून कार्यक्रम सुविहित सादर केला..

-सुभाष इनामदार,
सांस्कृतिक पुणे
9552596276