पं. मुंकुद मराठे. गेली १६ वर्षे शास्त्रीय संगीताचे एकनिष्ठपणे अध्यापन करणारे गुरू म्हणून परिचित. कसदार व दमदार गायकीने त्यांची मैफल ऐकणा-यांच्या नेहमीच लक्षात रहाते. शास्त्रीय संगीताची गायकी ग्वाल्हेर घराण्याची. पण बनारसच्या ठुमरी आणि दादरावर वेगळी हुकमत.
त्यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा आविष्कार घडविणारी रागरंग ही सीडी तालयोगी पं, सुरेश तळवलकर यांच्या हस्ते गुरूवार ९ जूनला पुण्याच्या एस एम जोशी सभागृहात प्रकाशित होत आहे.यावेळी चित्रकार रवि परांजपे व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न.म.जोशी व आकाशवाणी पुणे केंद्रांचे संचालक पतंजली मादुस्करविशेष उपस्थित रहाणार आहेत.
यावेळी पं. मुकुंद अनंत मराठे यांची शास्त्रीय, उपशास्त्रीय रागांची मैफल आयोजित केली आहे. याला हार्मेनियमची साथ करतील डॉ. अरविंद थत्ते आणि तबल्यावर साथ करणार आहेत पं. अरविंदकुमार आझाद. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.