subhash inamdar

subhash inamdar

Tuesday, November 27, 2018

शब्द स्वरातून उमगलेले..रमाकांत परांजपे

 शब्द स्वरातून उमगलेले..रमाकांत परांजपे



सर्व लोकप्रिय गायक ,वादकाना आपल्या व्हायोलिन साथीने मनमुराद आनंद देणारे रमाकांत परांजपे यांनी आपल्या साथीने सनई, सरोद, दिलरूबा,बासरी, सारंगी यांचा भास कसा घडवला याचे प्रत्यक्ष दर्शन पुणेकर रसिकांना घडविले.

नोव्हेंबर २४ला 'मुक्तसंध्या'मध्ये जेष्ठ व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे यांचे व्हायोलिन वादन आणि गप्पा मनसोक्त ऐकता आल्या.संवादक आहेत अरुण नुलकर
यांनी त्यांना बोलते केले..














चतुरंग प्रतिष्ठान आयोजित एक संध्याकाळ एक कलाकार मध्ये रमाकांत परांजपे यांनी आपण आजोबा नरहरबुवा पाटणकर यांच्याकडून संगीताचे बाळकडू घेतले. आरंभी तबला मग पेटी आणि शालेय वयातच व्हायोलिनकडे कसे आकर्षित झालो याची आठवणही त्यांनी सांगितली.

त्यांच्याच शब्दा नेमके सांगायचे म्हणजे..




आरंभी गोपल गायन समाजात गायन. पेटी वडीलांनी शिकविली. रामभाऊ आठवले यांचेकडे तबल्याचे धडे गिरविले. नूमवि शाळेत स्नेहसंमेलनात एका मुलाचे व्हायोलिन पाहिले. ते आवडले. म्हणून वडिलांकडे हट्ट केला . मला हे शिकायचे आहे. घरात धुळखात पडलेले दुरुस्त करून भास्करराव चिरमुले यांचेकडे सारेगमपासून शिकलो. संगीताची पार्श्वभूमि   तयार असल्याने ते शिकायला वेळ लागला नाही.





व्हायेलिनमध्ये सूर शोधावा लागतो..खरे तर ही तारेवरची कसरत आहे. सूऱ शोधावा वागतो.  कुठे बोट ठोवायचे ते कानानी ठरवायचे आसते. किंचित जरी इतर ठिकाणी बोट गेले की सूर बेसूर होतो. त्यासाठी कानही तयार लागतात.

हे वाद्य आपल्याकडे अतिप्राचिन काळीही होते. अगदी रावणाच्या काळातही त्याला रावणहत्ता म्हणत असत. भरताच्या नाट्यशास्त्रात याचा उल्लेख आहे. सारी तांत्रीक माहितीही ते इथे सविस्तरपणे देत होते. ते इतर देशात फिरत युरोपमध्ये गेले. आणि आजचा आकर्षक आकार युरोपमध्ये  तयार झाला.  हे वाद्य आकाराने छान. सुटसुटीत.त्यात आवाजाचे माधुर्य आहे. हे विश्ववाद्य आहे असे समजतात. जगात त्यांच्या संगीतात वेगवेगळ्या प्रकारे या वाद्याचा उपयोग केला जातो. या वाद्याविशयी मला माझे गुरुजी शंकरराव बिनिवाले यांनी सारे काही शिकविले. ते इटलीला जावून पाश्चात्य संगीत शिकून आलेले होते.



कुठल्याही कार्यक्रात रंमाकांत परांजपे यांचा सूर योग्य समजला जातो. त्यांचा होकार मिळाल्यवरच इतर वादक त्याचे अनुकरण करतात. अरूण नूलकर यांनी परांजपे यांचेबाबत आपली टिपणी केली.

यावेळी परांजपे यांच्या स्वरलिपीचेही वेगळेपण रसिकांना उमगले.आणि व्हायोलिनवरच्या त्यांच्या अभ्यासाविषयीही शब्दातून आणि स्वरातून काही ऐकता आले.


केवळ गाणेच नाही तर गाण्यातली जोडाक्षरेही व्हायोलिनमधून आपण  हुबेहुब काढायचा कसा प्रयत्न कसा करतो ते पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा हे गीतरामायणातले गाणे वाजवून रसिकांना त्यांनी दाखवून दिले.


गेली ५८ वर्षे ते व्हायोलिन वादनाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवून आहेत. आपण कसे घडलो..या वादनात कसा अभ्यास केला. याविषयी ते मनमोकळे बोलले. अरूण नूलकर यांनी प्रश्न विचारून त्यांच्या कलेचे यथोचित दर्शन घडविले.



यावेळी धाकटे बंधू विवेक परांजपे आणि मुलगा केदार परांजपे हेही खास हजर होते.
केदारने तर त्यांना काही गाण्यांसाठी मदत ही केली होती.

शब्द आणि स्वर यातून रंगलेली ही मुलाखत कायम लक्षात राहील. नेहमी वाद्यातून बोलणाऱ्या कलावंताला बोलते केले याबद्दल चतुरंग परिवाराचे आभार मानावे लागतील.

शब्द स्वरातून उमगलेले..रमाकांत परांजपे
एक झलक या लिंकमध्ये ऐका







-सुभाष इनामदार, पुणे
Subhashinamdar@gmail. com

Sunday, August 26, 2018

लता,आशा सोडून उत्कृष्ठ गायिका म्हणजे अनुराधा मराठे


माझ्याबरोबर जेवढ्या रंगमंचावर गायिका गायल्यात त्यात लता मंगेशकर आणि आशा भोसले सोडून अतिशय उत्कृष्ट गायिका म्हणजे अनुराधा मराठे..

बाळासाहेंबाकडून असा आशिर्वाद मिळणे म्हणजे त्यांंना संगातातली पद्मश्री मिळविल्यासारखेच आहे. तुम्ही उत्तम गाता. जोपर्य़त गाउ शकता तो पर्य़त .. आप गाती रहो..असा अशिर्वादही त्यांनी दिला.

ह्रदयनाथ मंगेशकर यांनी जाहीरपणे अनुराधा मराठे यांची मोकळेपणाने स्तुती केली आणि अनुराधा मराठे यांच्या गायनसेवेचे चीज झाल्याची पावती रसिकांनी टाळ्या वाजवून दिली..

निमित्त होते.. अनुराधा मराठे यांनी लिहलेल्या 'स्वरानुराधा ',
या अनुबंध प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आत्मकथनाच्या पुस्तक प्रकाशनाचे..

\




ज्येष्ठ पत्रकार, कवी विजय कुवळेकर यांनी अनुराधाबाईंच्या पुस्तकाचे अंतरंग उलगडून सांगताना त्यांचा साधेपणा. निर्मळपणा.सहजता. आजच्या समाजजिवनामध्ये विशेषकरून कलेच्या जीवनामध्ये अतिशय दुर्मिळ आहेत.जवळजवळ चाळीस वर्ष त्या सातत्याने त्या जपताहेत. संगीताचे प्रवाह बदलले. काळाचे प्रवाह बदलले. पिढ्या बदलल्या. अनुराधाबाई नवनव्या गायक गायिकांसमवेत गात राहिल्या. नवं आत्मसात करत राहिल्या. मात्र त्यांनी त्यांच्या स्वभावाचा आणि संगीताचा पोत कायम ठेवला. त्यांच्या इतकेच पुस्तक कुठलाही आविर्भाव न आणता जसे आयुष्यात प्रसंग घडत गेले तसे सहज यात टिपल्याचे म्हटले आहे.

हे आत्मचरित्र आपल्याला खूप आवडले कारण ते खूप साधे आहे. वहात्या पाण्यासारखा त्यात एक ओघ आहे..मुख्य म्हणजे त्यात कुठलाही आभिनिवेश नाही. गम आणि खुशी एकाच मापात मोजणारे हे अनुराधा मराठे यांचे वास्तव मनाला भिडून जाईल असे अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी सांगितले..

नेहा वैशंपायन यांनी शब्दांकन केलेल्या पुस्तकाच्या आजच्या विक्रीतील निम्मी रक्कम केरळच्या पुराग्रस्तांच्या निधीसाठी देणार असल्याचे अस्मिता कुलकर्णी यांनी जाहीर केले.

स्नेहल दामले यांनी प्रकाशन सोहळ्याला सहजपणे पुढे नेले.
अनिल कुलकर्णी यांनी पुस्तक करतानाचा आनंद व्यक्त केला.



गाता गाता सहज .. या कार्यक्रमातून अनुराधा मराठे यांनी रमण रणदिवे यांची रचना ज्याला संगीत दिले होते गजानन वाटवे यांनी.. जयदेव, चंद्रशेखर गाडगीळ, गिरीश जोशी या संगीतकारांच्या रचना सादर केल्या..

चाळीस वर्षांचा गाण्यांचा प्रवास त्यांनी आपल्या पुस्तकातून सहजपणे मांडला आहे.
तसा तो संवादकौशल्य असलेल्या जेष्ठ अरुण नुलकर यांनी अनुराधाबाईंच्या सहज , मृदू स्वभावापणे हलक्याफुलक्या गप्पातून उलगडत फुलवून नेला. केदार परांजपे, निनाद सोलापूरकर, उद्धध कुंभार आणि अजय धोंगडे यांनी साथसंगत केली.

चैतन्य कुंटे, अनुराधा कुबेर, संगीतकार नरेंद्र भिडे, शैला दातार, सुधीर गाडगीळ आणि अनुराधा मराठे यांच्या कुटुंबीयांनी पडद्यावर त्यांच्या स्वभावातील वेगळेपण आणि गायनसेवेचे व्रत घरातल्या कुणाच्या कपाळावर आठ्या न आणता कसे जपले याचे वर्णन केले.
यावेळी त्यांना साथ केलेल्या आणि त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांनी अनुराधाबाईंच्या गुणाचे जाहीर आभार मानून त्यांच्या विसराळू पणालाही टोमणा मारत मानपत्र तबला वादक अजय धोंगडे यांच्या हस्ते दिले.

आपल्याला गायला मिळते याचा आनंद घेताना शास्त्रीय संगीत कसे मागे पडले आणि सुगम संगीताची वाटचाल कशी होत गेली याची माहिती सहजपणे कार्यक्रमातून रसिकांना उमगली.



- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

Wednesday, April 4, 2018

सात व्हायोलिन वादकांनी वाहिली गजाननबुवा जोशी यांना स्वरांजली अर्पण




पं. गजाननबुवांच्या काही रचनांचे एकत्रीतपणे  व्हायोलीनवर वादन करून  अभय आगाशे, रजत नंदनवाडकर, वसंत देव, देवेंद्र जोशी, संजय चांदेकर, निलिमा राडकर, चारुशीला गोसावी आणि पं. भालचंद्र देव यांनी रसिकांना त्यांची शैली कशी होती ते  विविध गतीतून यातून ऐकविली.



`स्वरबहार`, या संस्थेच्या वतीने गायन वादनाचार्य पं. गजाननबुवा जोशी यांच्या १०७व्या स्मृतीप्रित्यर्थ्य  पुण्यातल्या सात व्हायोलिनवादकांनी आपल्या सादरीकरणातून पं. गजाननबुवा जोशी यांना स्वरांजली अर्पण करण्यासाठी दोन दिवसांची बहारदार मैफल आयोजित केली होती.
गजाननबुवांचे शिष्य पं. भालचंद्र देव आणि त्यांच्या कन्या सौ. चारूशीला गोसावी यांनी ही मैफल   
`सांस्कृतिक पुणे`च्या सहकार्याने पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयाच्या सभागृहात  खास रसिकांसाठी आयोजित केली होती.
या आयोजनाचे हे  पंधरावे वर्ष होते.या कार्यक्रमात 



वैष्णवी काळे.... राग बागेश्री आणि धुन
 वैष्णवी काळे,


 
रजत नंदनवाडकर.. राग छायानट आणि धुन

रजत नंदनवाडकर,
 
डॉ. सौ. निलिमा राडकर.. मारूबिहाग आणि शंकराभरणम्

डॉ. सौ. निलिमा राडकर,




 
वसंत देव..राग बिहाग

वसंत देव,









 
देवेंद्र जोशी.. राग बागेश्री आणि नरवर कृष्णासमान हे नाट्यपद



देवेंद्र जोशी,  







 
अभय आगाशे.. राग रागेश्री आणि  एक हिंदी चित्रपट गित

 अभय आगाशे  यांनी आपले स्वतंत्र शास्त्रीय वादन केले.


सौ. चारुशीला गोसावी.. राग गावती आणि किरवाणी धुन


आणि पहिल्या दिवशीच्या समारोपाचे वादन सरताना पं. भालचंद्र देव यांच्या कन्या आणि शिष्या सौ. चारूशीला गोसावी यांनी राग गावती आणि त्यांनीच तयार केलेली किरवाणी धून सादर करून आपल्या उत्तम व्हायोलीनवादनाची साक्ष पटविली.
पं. गजाननबुवांच्या काही रचनांचे एकत्रीतपणे  व्हायोलीनवर वादन करून  अभय आगाशे, रजत नंदनवाडकर, वसंत देव, देवेंद्र जोशी, संजय चांदेकर, निलिमा राडकर, चारुशीला गोसावी आणि पं. भालचंद्र देव यांनी रसिकांना त्यांची शैली कशी होती ते  विविध गतीतून यातून ऐकविली.

रविवारी पं. गजाननबुवांच्या काही आठवणी आणि त्यांच्या जुन्या कार्यक्रमातील आणि मुलाखतीतील भाग यावर आधारित चित्रफित मुद्दाम  तयार करून ती रसिकांसमोर दाखविली गेलीत्यासाठी सुभाष इनामदार यांचा सहभाग मोलाचा होता
नविन व्हायोलीन वादकांमध्ये पं. भालचंद्र  देव यांचेकडे शिकत असलेला रजत नंदनवाडकर याच्या वादनामध्ये चमक आहे..वाजविण्यीची पध्दतही अधिक आकर्षक आहे..आणि वादनातले बारकावे त्याने सहजपणे साध्य केल्याचे दिसते.



अभय आगाशे यांनी सादर केलेला राग रागेश्री आणि निलिमा राडकर यांचा मारुबिहाग अधिक पसंतीस उतरला

.

पं. भालचंद्र देव.. राग पूरिया आणि नाट्यपदे


शेवटी पं. गजाननबुवा जोशी यांचे शिष्य पं. भालचंद्र देव ( वय अवघे ८३ ) यांनी आपले बहारदार वादन करून रसिकांना मंत्रमुध्द केलेत्यांनी राग पूरिया आणि काही नाट्यपदे आपल्या वादनातून एकविली. आजही त्यांचा स्थिर हात रसिकांना मोहवून गेला.
दोनही दिवस तबला साथ केली ती रविराज गोसावी आणि मोहन पारसनिस यांनी
निवेदनाची धुरा राजय गोसावी यांनी सांभाळली.




Sunday, March 25, 2018

अभिजित पंचभाईंच्या गीतरामायणाची तपपूर्ती





भावभक्तिच्या शक्तिचे आजच्या काळातले एक वेगळे उदाहरण


रविवारची सकाळ रामजन्माचा दिवस..निवारा सभागृह  रसिकांच्या साक्षीने बारा वर्षे पूर्ण झालेल्या अभिजित पंचभाई प्रस्तुत  गीतरामायण ऐकण्यासाठी आतुर झालेला.  राजेंद्र गलगले आणि अभिजित पंचभाई …`स्वये श्री रामायण गाती…..`हे गीत सादर करते झाले आणि त्या तपपूर्ती कार्यक्रमाची  सुरवात झाली.

प्रमोद रानडे, श्रीपाद भावे आणि संगीतकार- व्हायोलीनवादक सचिन इंगळे तसेच सरहद्दचे संजय नहार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गीतरामायणाचा स्वर महोत्सव सुरु झाला..


यामागचा इतिहास सांगताना निवेदिका सौ. मीरा ठकार सांगत होत्या..
तेरा वर्षापूर्वी संतदर्शन मंडळाच्या श्रीराम साठे यांनी गीतरामायण गाण्याची स्पर्धा आयोजित केली होती. यात अनेक तरूण महाराष्ट्रातून स्पर्धक आले होते. यात अभिजित पंचभाई आणि राजेंद्र गलगले ह्या धुळ्यातून आलेल्या मुलांनी  पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवून त्यात ते यशस्वी ठरले होते..
त्यातून प्रेरणा घेऊन त्या दोघांनी श्रीराम साठे यांच्या मार्गदर्शनानी आपण यापुढे दरवर्षी रामनवमीला गीतरामायण सादर करायचे हा संकल्प केला..त्यासाठी गीतरामाणाचा अभ्यास केला..विविध मान्यवरांकडून त्यातले शब्द आणि बाबुजींच्या सोप्या वाटणा-या आणि लोकप्रिय असणा-या चाली आत्मसात केल्या . त्यातूनच  गीतरामायण ते श्रध्देने, निष्ठेने आणि एकलव्याच्या चिकाटीने अभिजित पंचभाईच्या पुढाकाराने प्रतिवर्षी पुण्यात रसिक, भक्तांच्या श्रवणार्थ त्याचे आयोजन विनामूल्य होत आहे. आपण त्यांच्या या कार्याला जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद देऊ...
त्यासाठी अभिजीत आणि राजेंद्र स्वतःच्या मिळकतीतील काही रक्कम रिकरिंगद्वारे जमा करुन रामनवमिच्या दिवशी ते गीत रामायण अतिशय सुरेल आणि तन्मयतेने सादर करुन रसिकांनाही त्यात सहभागी करुन घेतात.




गीतरामायण ..ग.दि.मा़डगूळकर यांनी प्रत्य़ेक गीतातून रामायणकाल तुमच्यासमोर शब्दादातून रचले आणि ते तेवढ्याच भावनोत्कट सुरावटीतून सुधीर फडके यांनी चालीचून जनतेच्या दरबारात सादर केले... सत्तर वर्षे उलटून गेली. पण ती मोहिनी मराठी मनावर राज्य करुन आहे.. वाल्मिकींचे  रामायण आपल्या जनमासात रुजविले ते गदिमांनी..तेच अधुनिक काळातले वाल्मिकी मानले जातात... गीतरामायण आपण सादर करावे असे प्रत्येक गायकाला वाटते..ते त्याच्यासाठी आव्हान असते..जो तो आपापल्यापरिने ते शिवधनुष्य पेलण्याचा, नटविण्याचा यत्न मराठी येत असलेल्या प्रत्येक रसिकांना या गीतातून भुलविण्याचा तो संकल्प करतो..


रामाची शक्ति आणि हनुमानाची भक्ति...आणि लक्ष्मण भरताचे महानपण..कैकयीचा संताप..रावणाची ताकद..आणि आणि अखेरीस होणारे रावणवधाचे वर्णन सारेच यात दिसते..जणू काही तो प्रसंग आपल्यासमोरच घडतो..इतके समर्थपणे ते  सादर होते.


यंदाचे वैषिष्ठ्य म्हणजे सोनल पेंडसे आणि त्यांच्या सहकलाकालरांनी काही गीतरामायणातल्या गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला. भक्तिभावाने आणि आपल्या दमदार आवाजाने  अभिजित पंचभाई आणि  राजेंद्र गलगले ( खास इंदौर वरून यासाठी येतो) यांनी गीतरामायणातली भावपुर्ण गीते अतिशय प्रभावीपणे सादर करुन रसिाकांची शाबासकी टाळ्यांच्या गजरात मिळविलीया कार्यक्रमात स्वरप्रिया बेहरे, माधवी तळणीकर, अमिता घुगरी आणि देवयानी सहस्त्रबुद्धे यांनी उत्तम सादरीकरण करून आपल्या तयारीची चुणूक दाखवून दिली.



शुभदा आठवले ( हार्मोनियम), आभिजित जायदे ( तबला) चारुशीला गोसावी( व्हायोलीन) ,उध्दव कुंभार (तालवाद्ये) ...या सा-याच साथसंगत करणा-या कलावंताची नावे मुद्दाम सांगायला हवी..कारण उत्तम साथीशिवाय हा कार्यक्रम रसिकाच्या ह्दयात आपले स्थान निर्माण करू शकत नाही.




आधि जाहिर झाल्याप्रमाणे प्रा. सच्चीदानंद कानेटकर निरूपणासाठी येणार होते. पण तब्येतीच्या कारणाने ये आले नाहीत.तेव्हा ही जबाबदारी मीरा ठकार यांनी स्विकारली भक्तिमय गीतरामायणातले प्रसंग आपल्या भावनेच्या ओलाव्यांतून त्यानी रसिकांसमोर मांडले. त्यांचा खास उल्लेक केला पाहिजे..त्याच्या निवेदनात आपलेपणा आणि अभिजित, राजेंद्र आणि इतक कलावांताची तळमळ सतत जाणवत होती.
यासगळ्यांच्या मागे तेवढ्याच आपुलकीने दिप्ती कुलकर्णी यांचे पाठबळ होते हेही खास सांगावेच लागेल.



गीतरामायण सादर करताना सोवळे नेसून अभिजित पंचभाई ते भक्तिभावाने सादर करतात याचे कौतूक प्रमोद रानडे यांना वाटले. बाबुजींच्या स्वरांवर आणि गदिमांच्या शब्दांवर आपण सारे प्रेम करताय. हे विलक्षण प्रतिभेचे देणे आहे. ते गीतरामायणाची सेवा करणारा अभिजित सारखा गायक आजही ते करतो आहे हे पाहून आनंद होतो.

बाबुजींनी ज्या रागांची निवड करून ह्या गीतांना अजरामर करून सोडले..त्या त्यांच्या कर्तृत्वाला तोड नाही, असे सचिन इंगळे यांना वाटते.




बारा वर्षांच्या प्रवासात अनेक टप्प्यावर यात सहभागी जालेल्या आणि आज कार्यक्रमात असलेल्या कलाकारांचा, ध्वनिव्यवस्था पाहणारे हेमंत उत्तेकर यांचाही सन्मान पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तु देऊन केला गेला.


 

स्वत्ः  कसलाही अभिनिवेश आणता निष्ठेने अभिजित तो दरवर्षा रंगतदारपणे आणि तेवढेच भावीकतेने सादर करीत असतात याला दाद ही दिलीच पाहिजे  त्यांच्या या गीतरामायणाचा रौप्यमहोत्सव होवो हिच अपेक्षा.




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com