माझ्याबरोबर जेवढ्या रंगमंचावर गायिका गायल्यात त्यात लता मंगेशकर आणि आशा भोसले सोडून अतिशय उत्कृष्ट गायिका म्हणजे अनुराधा मराठे..
बाळासाहेंबाकडून असा आशिर्वाद मिळणे म्हणजे त्यांंना संगातातली पद्मश्री मिळविल्यासारखेच आहे. तुम्ही उत्तम गाता. जोपर्य़त गाउ शकता तो पर्य़त .. आप गाती रहो..असा अशिर्वादही त्यांनी दिला.
ह्रदयनाथ मंगेशकर यांनी जाहीरपणे अनुराधा मराठे यांची मोकळेपणाने स्तुती केली आणि अनुराधा मराठे यांच्या गायनसेवेचे चीज झाल्याची पावती रसिकांनी टाळ्या वाजवून दिली..
निमित्त होते.. अनुराधा मराठे यांनी लिहलेल्या 'स्वरानुराधा ',
या अनुबंध प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आत्मकथनाच्या पुस्तक प्रकाशनाचे..
\
ज्येष्ठ पत्रकार, कवी विजय कुवळेकर यांनी अनुराधाबाईंच्या पुस्तकाचे अंतरंग उलगडून सांगताना त्यांचा साधेपणा. निर्मळपणा.सहजता. आजच्या समाजजिवनामध्ये विशेषकरून कलेच्या जीवनामध्ये अतिशय दुर्मिळ आहेत.जवळजवळ चाळीस वर्ष त्या सातत्याने त्या जपताहेत. संगीताचे प्रवाह बदलले. काळाचे प्रवाह बदलले. पिढ्या बदलल्या. अनुराधाबाई नवनव्या गायक गायिकांसमवेत गात राहिल्या. नवं आत्मसात करत राहिल्या. मात्र त्यांनी त्यांच्या स्वभावाचा आणि संगीताचा पोत कायम ठेवला. त्यांच्या इतकेच पुस्तक कुठलाही आविर्भाव न आणता जसे आयुष्यात प्रसंग घडत गेले तसे सहज यात टिपल्याचे म्हटले आहे.
हे आत्मचरित्र आपल्याला खूप आवडले कारण ते खूप साधे आहे. वहात्या पाण्यासारखा त्यात एक ओघ आहे..मुख्य म्हणजे त्यात कुठलाही आभिनिवेश नाही. गम आणि खुशी एकाच मापात मोजणारे हे अनुराधा मराठे यांचे वास्तव मनाला भिडून जाईल असे अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी सांगितले..
नेहा वैशंपायन यांनी शब्दांकन केलेल्या पुस्तकाच्या आजच्या विक्रीतील निम्मी रक्कम केरळच्या पुराग्रस्तांच्या निधीसाठी देणार असल्याचे अस्मिता कुलकर्णी यांनी जाहीर केले.
स्नेहल दामले यांनी प्रकाशन सोहळ्याला सहजपणे पुढे नेले.
गाता गाता सहज .. या कार्यक्रमातून अनुराधा मराठे यांनी रमण रणदिवे यांची रचना ज्याला संगीत दिले होते गजानन वाटवे यांनी.. जयदेव, चंद्रशेखर गाडगीळ, गिरीश जोशी या संगीतकारांच्या रचना सादर केल्या..
चाळीस वर्षांचा गाण्यांचा प्रवास त्यांनी आपल्या पुस्तकातून सहजपणे मांडला आहे.
तसा तो संवादकौशल्य असलेल्या जेष्ठ अरुण नुलकर यांनी अनुराधाबाईंच्या सहज , मृदू स्वभावापणे हलक्याफुलक्या गप्पातून उलगडत फुलवून नेला. केदार परांजपे, निनाद सोलापूरकर, उद्धध कुंभार आणि अजय धोंगडे यांनी साथसंगत केली.
चैतन्य कुंटे, अनुराधा कुबेर, संगीतकार नरेंद्र भिडे, शैला दातार, सुधीर गाडगीळ आणि अनुराधा मराठे यांच्या कुटुंबीयांनी पडद्यावर त्यांच्या स्वभावातील वेगळेपण आणि गायनसेवेचे व्रत घरातल्या कुणाच्या कपाळावर आठ्या न आणता कसे जपले याचे वर्णन केले.
यावेळी त्यांना साथ केलेल्या आणि त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांनी अनुराधाबाईंच्या गुणाचे जाहीर आभार मानून त्यांच्या विसराळू पणालाही टोमणा मारत मानपत्र तबला वादक अजय धोंगडे यांच्या हस्ते दिले.
आपल्याला गायला मिळते याचा आनंद घेताना शास्त्रीय संगीत कसे मागे पडले आणि सुगम संगीताची वाटचाल कशी होत गेली याची माहिती सहजपणे कार्यक्रमातून रसिकांना उमगली.
- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
No comments:
Post a Comment