subhash inamdar

subhash inamdar

Monday, October 21, 2013

कथेत जीवन शोधतो


- गिरीष कुलकर्णी

 एखाद्या कलाकृतीचा समाजावर मोठा परिणाम होत असतो त्यामुळे
चित्रपटाच्या कथेत मी माझं जगणं शोधण्याचा प्रयत्न करत असतो, माझ्या
चित्रपटांमधून काय संदेश जातो याविषयी मी तत्पर असतो, अशी भावना
दिग्दर्शक-अभिनेता गिरीष कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 'स्व'-रूपवर्धिनी संस्थेच्या युवक विभागातर्फे घेण्यात आलेल्या मुलाखतीद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

यावेळी स. प. महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठच्या शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत नवा
विक्रम प्रस्थापित करणाऱ्या संदीप जगधने या 'स्व'-रूपवर्धिनी संस्थेच्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. 

शिल्पा पोफळे यांनी मुलाखत घेताना गिरीष कुलकर्णी यांच्या आयुष्यातील विविध पैलूं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संस्थेचे सहकार्याध्यक्ष शिरीष पटवर्धन,  पुष्पाताई नडे, विलास कुलकर्णी, प्रा. संजय तांबट, श्रीकांत यादव, मयूर कर्जतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना गिरीष कुलकर्णी म्हणाले, की शालेय जीवनपासूनच सगळ्या
कलांचा समुच्चय असलेलं क्षेत्र निवडायचं ठरवलं होतं त्यामुळे नाटकाकडे
वळायचा निर्णय घेतला. संस्कारभारतीनं मला एक स्वप्न आणि विश्वास दिला.
वाचनातून  मानवी मनाचे वेगवेगळे पैलू समोर आले, त्यांची अनुभूती
घेण्यासाठी लोकांना भेटलो आणि माणसं वाचायची, त्यांच्यावर प्रेम करायची
सवय लागली. माझ्या कथेत अनेक पात्रं दिसतात त्याचं कारण हेच आहे. वळू,
देऊळ, मसाला नवीन येणारा हायवे या चित्रपटांमध्ये तुम्हाला तुम्ही जे
जगता त्याचं प्रतिबिंब पहायला मिळेल. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश धायरकर यांनी केले तर आभार मयूर कर्जतकर यांनी मानले.