उगाच मराठी माणसांबद्दल अफवा पसरवितात...दोन मराठी मंडळी एकत्र येत नाहीत..त्यांच्या संस्थेत फाटाफूट होते...प्रभाकर पणशीकर आणि मोहन वाघांचे नाट्यक्षेत्रातले उदाहरण देतात...पण पुण्यात असा एक व्हायोलीन वादकांचा ग्रुप आहे...तो दोघांनी सुरु केला ( संजय चांदेकर आणि अभय आगाशे) आता गेली पाच वर्षे त्यात दोन नविन मराठी व्हायोलीन वादकांची (चारुशीला गोसावी आणि निलिमा राडकर) भर पडून आता ते चौघे कलावंत दरवर्षी जागतिक व्हायोलीन दिन सादरा करतात....रसिकप्रिय व्हिओलिना ! कालच त्यांचा कार्यक्रमही अप्रतिम रंगला..पुणेकरांची साथही तेवढी जोरदार होती...पावसाची साथ मिळाली तरीही..हे हे वेगळे...
बाहेर पावसाच्या सरी कोसळताना पहाताय..कावळे..फिरताहेत..कोकिळा कूजन करताहेत...आणि आतल्या तशा ओपन वाटाव्या अशा निवारा सभागृहात व्हायोलीन वादक आपली मैफल सादर करताहेत..किती वेगळा आणि आनंददायी अनुभव होता तो !
एक व्हायोलीन वाजत असले तर किती सुरेलता प्रकटते..इथे तर चार वादक एकच गाणे सादर करताहेत...फारच सुंदर..अगदी `गगन सदन` पासून सुरवात करुन..वनिता मंडळ, आकाशवाणी मुंबई केंद्राची धुन आणि या सुरांनो चंद्र व्हा..ही भेरवी आणि त्यानंतर चार वादकांची जुगलबंदीतली एकाग्रता आणि कसब... जेव्हा हे व्हायलीन वादक सुरावट आळवितात..तेव्हा रसिकांची दाद टाळ्यांच्या निनादात सहजी मिळते..
गेली दहा वर्षे हा उपक्रम संजय चांदेकर आणि अभय आगाशे....व्हिओलिना...या ग्रुपव्दारे सादर करताहेत..गेली पाच वर्षे चारुशीला गोसावी आणि निलिमा राडकर यात सहभागही झाला आणि हा सुस्वर झेंडा त्यांनी आपल्या जिद्दीने सर करत नेला आहे..आता त्याला कुठे मुळे फुटायला लागली आहे..यंदा त्याला अनाहत या ट्रस्टची साथ मिळाली.
केवळ व्हायोलीन वादन तर आहेच पण यंदा अनय गाडगीळ आणि विनित तिकोनकर या वादकांच्या सहाय्याने केलेली फ्यूजनची कमालही तेवढीच दाद देण्यासारखी होती..
गाणी किती आणि कोणती यापेक्षाही हा सारा दोन तासांचा अनुभव संगीत सुरात न्हाऊन निघालेला होता..हे महत्वाचे..आज मालिकांच्या आणि पावसाच्या नादात घरातून बाहेर येऊन या वादाकांची वादनशैली अनुभवण्य़ाची गरज पुणेकरांन वाटली.. त्यातच निवारा सारख्या तशा मोकळ्या जागेच्या सभागृहात.. ( कारण इथे डास घोंघावत होते..पावसाचे किडे फिरत होते...त्यातही भर म्ङमून तिनदा प्रकाशही गायब झाला.)
रविराज गोसावी आणि मनोज चांदेकर यांच्या तबला साथीतून नाद घुमत होता...स्वरांना लयदार करीत होता. अविनाश तिकोनकर यांची साथ आणि विनित तिकोनकर यांची पखवाजची साथ रंगत अधिक वाढवित होती... निवेदिकेच्या नवख्या शब्दामधून सतत एफ टी आयच्या रेडीओची जाहिरात होत होती..मधूनच श्रोत्यांना दाते संबोधून निधी देण्याची विनंती केली जात होती. दाते उस्फूर्तपणे देणग्या जाहिर करत होत्या..सारे सुरु होते या व्हायोलीन वादनाच्या मैफलीत...
वन्समोअर घेत आणि टाळत ही हिदी-मराठी गितांची आणि त्यातही नाट्यसंगीताची बरसात श्रोते मनसोक्त अनुभवित होते...
एक सातत्याने केला जाणार उपक्रम असाच सुरु रहावा आणि ह्या व्हायोलीन वादकांनी नवीन सुरावटीतून या वाद्याचे वेगळेपण कायम ठेऊन रसिकांचे मनोरंजन आणि महती वाढवित ठेवावी...
सुभाष इनामदार,पुणे