मित्रवर्य प्रकाश भोंडे,
आपल्या सत्तरीच्या निमित्ताने शनिवार
अकरा नोव्हेंबरचे स्नेहमय आमंत्रण
मिळाले आणि माझ्या
मनातील आपल्या विषयीच्या विचारांचे मंथन
सुरू झाले.. आपल्या
तरतरीत आणि लोभस
व्यक्तिमत्वाने पुण्यातील सांस्कृतिक मंच
नेहमीच उजळून निघाला आहे..
स्वरांनंद...या संगीत
क्षेत्रातल्या नवोदित कलावंतांना आपल्या
संस्थेच्या मंचावरून अनेक वार
आपली कला सादर
करता आली..करताहेत..
हौसेतून हा छंद
आपण जपला.. स्वरांनंद
उभी केलीत..जोपासली..वाढविली..आणि वेळोवेळी
नव्या विचारांचे मार्गदर्शक
मिळविलेत..त्यांची गाणी ..त्यांच्या
कविता..रसिकांना ऐकविल्यात..मोहून
तृप्त केलेत..आपल्या
सत्तरीच्या पर्दापणाबरोबरच स्वरांनंदचा सुवर्णमहोत्सव साजरा
होणार आहे..हे
आपले सौभाग्य आणि
रसिकांचे भाग्य..
ऐन उमेदिच्या काळात भरपून
मेहनत घेउन स्वरांनंदची
टूर महाराष्ट्रभर काढलित..त्यांचे नियोजन आणि
संयोजन उत्तम केलेत. नेवे
गायक..वादक..संगीतकार..कवी हेरून
त्यांच्या गीतांना आपल्या संस्थेमार्फत
मराठी रसिकांसमोर सुंरेलपणे
पोहचवलेत..आपली आवड,
मंतरेलेल्या चैत्रबनात, बाबुजी, गदिमा,
पुल, पाडगावकर, खळे
काका, यशवंत देव..अशा संगीतकारांची
गाणी नव्या पिढीकरून
घोकून घेउन रसिकांना
हा सुरेल नजराणा
अनेक ठिकाणी बहाल
केलात..
आपण केवळ स्वरांनंदचा
संसार मांडलात, थाटलात..आणि सजविलात. आपले हे
कर्तृत्व मराठी रसिक विसरू
शकणार नाही..हे
ही तितकेच खरे..
खरेतर आपण वाणिज्य
विषयाचे अध्यापक..पण बी
एम सी सी
च्या नोकरीत रस
घेऊन..मुलांना धडे
दिलेत..पण चाकरी
बजावतानाबी मनातला ताल कायम
सांभाळलात.. प्राध्यापकी करताना विद्यार्थी
घडविलेत.. त्यांना सुयोग्य मा्रगदर्शन
केलेत..
आपण
नकालाकार भोंडे यांचे नातू..त्यांची नकला करण्याची
पंरपराही आपण जपलीत..
साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या
आवाजातील नकला करण्याचे
कौशल्य आम्ही जाणून आहोत..
आपण गात नाही..काही वाद्यही
वाजवित नाहीत..पण आपण
संगीताची सेवा करणारी स्वरांनंद ही संस्था
चालविता..आधी बिज
एकले..सारखे आधी
सारे पुण्यात सादर
करायाचे मग त्यात
सुधारणा करून ते
इतर शहरात न्यायचे..
ही किमया स्वरांनंदच्या
मार्फत आपण केलीत.
आपल्या व्यवस्थापनातून..स्वरांनंदचे नाव..बोलते
केलेत..आणि अनेक
उपक्रमांना आपण आपले
मोलाचे सहकार्य करता..अनेकांचे
आपण सल्लागार बनता..त्यांचे उपक्रम अधिक
रुजावेत..त्यांची दखल घेऊन
अनेकांना ते सादर
करण्यासाठी उपकृत करता..
भोंडे कॉलनीतले आपले अस्तित्व
आज उणीपुरी सत्तर
वर्ष टिकवून ठेवलेत..आपल्या स्वभावाने अनेक
कलावंतांचे पहिले कार्यक्रम तुम्ही केलेत..त्यांना प्रथम मंच
तुम्ही दिलात..पण कुठेही
मीपणाचा वास नाही..
आमच्यासारख्या
असंख्य मित्रांचे मार्गदर्शक आहात..आपल्या प्रतिसादाने आणि
प्रोत्साहनाने आम्हालाही काही नवे
करण्याची उर्मी मिळते ती
तुमच्यामुळे..
असाच आमचा हा
मार्गदर्शक पथप्रमुख शतायुषी व्हावा..निरोगी आयुष्याची बळकट दोरी घेउन नव्या
क्षितीजाकडे झेपावत जावा..हिच
सदिच्छा..आपल्यासाराखे मित्र मिळविलेत हीच
आमची कमाई..
अशा सगळ्यांकडून आपल्याला सत्तराव्या
वाढदिवसाच्या खूप खूप
शुभकामना..
शुभंभवतू....
* मंदार जोगळेकरांच्या
ग्लोबल मराठी या वेबसाईटच्या
निमितात्ताने प्रकाश भोंडे यांनी
आचार्य अत्रे यांच्या आवाजात
केलेली ही प्रस्तावना..त्या्च्या नकलांच्या प्रदर्शनाचे
प्रतिक आहे..ती
लिंक मुद्दाम देत
आहे..**
-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276