subhash inamdar

subhash inamdar

Thursday, June 21, 2012

जरा विसावू या वळणावर!

वारसा निर्माण करणारी कलावंत जोडी...

संसाराच्या सारीपटावर दोन सोंगट्या एकाच रुळावर धावताहेत...आजही रेल्वे धडधडतीच आहे..पण त्याचा फोन प्रवास आता थांबलाय! सुमारे ३८ वर्षांचा बीएसएनएल मधला नोकरीतला प्रवास आता अशोक अवचट याने थांबवला आहे.. तो होतोय निवृत्त !

...नाटकातला हा गद्य नट आणि ती संगीत कलेत निपुण आणि नाटकात सुरेल काम करणारी..दोघे पडले प्रेमात...हातात हात आले...एका छत्राखाली पती-पत्नी झाले...आता तो नोकरीतून अलिप्त झाला..आणि तिने त्याच्या या प्रवासासाठी शुभेच्छा चिंतून त्याला `जरा विसावू या वळणावर.` .हे गीत म्हणून त्याने केलेल्या कामाचे दिव्य स्वरुप दाखवून संसाराच्या सारीपटावर..झालेल्या अनेक वाद-संवादाची आठवण करून दिली..आणि पुढच्या वाटचीलीतही मी बरोबर आहे....हे सांगत `प्रेम सेवा शरण..`म्हणूत भारतीय संस्कृती प्रमाणे पुढेही एकत्र चालण्याचे वचन दिले..तेही संगीतामधून....

गेले काही दिवस भरत नाट्यमंदिराच्या बोर्डवर एका कार्यक्रमाची पाटी झळकत होती...२१ जून संध्या, ६ वाजता..सौ. सुचेता अवचट आणि अभिषेक अवचट यांचा संगीतमय कार्यक्रम `या वळणावर..`.

गुरुवारी प्रत्यक्ष तो काय आहे हे पाहल्यावर प्रचिती आली की अशोक अवचट या आमच्या मित्राच्या निवृती निमित्त त्याच्या पत्नीने म्हणजे सुचेताने त्याला ही या वळणावर ही स्वरमयी भेट देण्याचा घाट घातला आहे...किती सुंदर...

कलावंत हे दांपत्य...एक जण लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, एकच प्याला या नाटकात हजारो प्रयोग करत करत नोकरी केली. आता त्याच्या निवृत्तीची घोषणा झाली..त्याला आपल्या संगीतातून तिने हे सुरेल नजराणा बहाल केला....मानापमान, कट्यार, सुवर्णतुला, सौभद्र अशा नाटकातून तिने यापूर्वी संगीत अभिनेत्रीच्या भूमिका केल्या...स्वरराज छोटा गंधर्व आणि. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे नाच्यसंगीताची रितसर तालीम घेतली. तिचे नाट्य संगीतातले सादरी करण ऐकणे आणि यांचा मुलगा अभिषेक याने ही कला पुढे नेण्याचे दिलेले गीतांच्य़ामाध्यमातून वचन..हे सारे वेगळे आणि भारावणारे होते.

`घननिळा लडविळा `ने सुरवात करुन सुचेता अवचट...एकेक गीते सादर करत होती...फक्त अशोकने आरंभी हा कार्यक्रम का करित आहे याची माहिती दिली..आणि पुढे सारा सुरेल आविष्कार आपल्या भाऊक आणि लजिवाळ आणि धारदार तेजःपुंज आवाजॉत सादर केला तो सुचेताने..

भक्तिगीतातून सुरवात करुन, सुगम संगीत, भावसंगीत, गझल, ठुमरी, चित्रपट गीते आणि नाट्यगीतातून या वळणावर...आपल्या पतीच्या चरणी समर्पित केला....एका सुंदर कल्पनेचा हा भावाविष्कार शब्दातून सांधला तो रविंद्र खरे यांनी. आणि यासाठी तबला साथ दिली ती प्रसाद जोशी यांनी तर हार्मोनियमवर आपल्या कौशल्यमयी बोटाची किमया दाखवून कार्यक्रमाला बहार आणली ती सचिन जांभेकर यांनी...



अगा वैकुंठीच्या राणा. हो भक्तीगीत..याद पिया की आये..ही ठुमरी...प्रेम सेवा शरण म्हणत अवघा रंग एकची झाला या भैरवीने सुचेता अवचट यांनी खरच रसिकांना फुलविले..स्वरांनी तृप्त केले..
.
कलेची सेवा करीत नोकरी करणे ही काळाची गरज..पण त्यातली कलासेवा फुलवून ती जपत तो वारसा पुढे नेणारे हे अवचट दांपत्य... आपल्या अशा कार्यक्रमातून वेगळे भासविले..एक वेगळा पायंडा पाडत एक आदर्शही घालून दिला...त्यांच्या या शुभघडीला आमचाही मुजरा.....!

अशोकच्या निवृत्तीनंतरच्या कलाप्रवासाला शुभेच्छा !



सुभाष इनामदार,पुणे