subhash inamdar

subhash inamdar

Thursday, January 13, 2011

मराठी रंगभूमीवरचा राजहंस हरपला !

मराठी रंगभूमीवर स्वतःचे युग निर्माण करणारे. एका नाट्यसंस्थेचे नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात कोरणारे. कट्यार सारख्या संगीत नाटकाने मानदंड निर्माण करणारे.....आपल्या भूमिकेने राजहंसी रूप धारण करणारे....ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकरांचे निधन झाले...

आणि रंगभूमिवरचा राजहंसच हरपल्याची जाणीव झाली.


तो मी नव्हेच मधल्या पंचरंगी, बहुढंगी भुमिकांतून स्वतःचे नट म्हणून असलेले अस्तित्व हे तर पणशीकरांच्या अभिनयातला मोरपंखी तुराच जणू...

ते करताना ते भूमिका जगले.. व्यक्तिरेखेतल्या बारकाव्यांनी नाटकाला अजरामर केले,,, काळ बदलला...नटांमध्ये बदल झाले..तरीही पंतांचा तो लखोबा लोखंडेची किमयाच वेगळी.... खरेच ती सर कुणालाच आली नाही.



नाट्यसंपदेचे संस्थापक म्हणून पंतांची कामगीरी अजोड नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदले जाईल. त्यांनी निर्मिती केलेल्य़ा नाटकांची यादी देण्यापेक्षा जी आज माझ्या स्मृतीत साठवली गेली आहेत...त्यांचा उल्लेख करतो.

वसंत कानेटकरांचे अश्रुंची झाली फुले मधला प्रिन्सीपॉल विद्यानंद... इथे ओशाळला मृत्यू मधला औरंगजेब... तो मी नव्हेच तर आहेच...थॅंक यू मि. ग्लॉड मधला इन्स्पेक्टर.... बेईमान मधली सतीश दुभाषींबरोबरची गीरणी मालकाची भूमिका....मला काही सांगायचं...आणि जिथे गवकाला भाले फुटतात मधील अभीनयाचे टोक.....सारेच....पंतांच्या अभिनयातून साकरलेल्या भूमिकांनी मराठी रंगभूमीवर रसिकांना राजहंसी रुपाचे दर्शन घडले..सामीजिक आशय..त्यातून समाजातली दरी..इतिहासात डोकावता औरंगजेबालाही त्यांनी जिवंत केले...प्रिन्सीपॉल विद्यानंदाच्या रुपाने शैक्षणीक क्षेत्रातल्या प्रवृत्तींवर केलेली टिका...

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लखोहा लोखंडेच्या रूपांतून लग्नासाठी उतावीळ झालेल्या तरुणींची कथा सांगणारे आचार्य अत्रेंयांचे तो मी नव्हेच ला दिलेले योगदान......सारेच पंतांच्या कर्तृत्वाची त्यांच्या अभिनय केलची उतुंग उंची घडवितात.

पुरुषोत्तम दारव्हेकर..पं. वसंतरांव देशपांडे...पं.जितेंद्र अभिषेकीं या त्रयींच्या रुपाने साकारलेले कट्यार काळजात घुसली हे नाटक तथाकथित संगीत नाटकांचा चेहराच बदलून टाकणारे नाटक देउन संगीत रसिकांना वेगळ्या विश्वात घेउन गेले...याची निर्मितीही पंतांच्या शिरपेचातला मानाचा तुराच...

असा कलावंत...असा निर्मिता... फिरता रंगमंच प्रथम रंगमंचावर आणणारे...नाट्यरिषदेला स्वतःचे बळ देणारे सामाजिक भान आणि मराठी समस्कृतीवर प्रेंम करणारे कलावंत म्हणून ...

आणि अवघ्या काही प्रयोगाचून तो एक राजहंस हे कर्णीच्या जीवनावरचे नाटक धाजसाने निर्माण करणारे....ज्यात कर्णाच्या भूमिकेत शोभणारे रविंद्र महाजनी...

सारेच घडविले ते प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदेने....

आज नाट्यसंपदा अवघा रंग एकची झाला...ने कार्यरत..आहेच

पण पंतांची मौलिक दृष्टी आता रहाणार नाही...

मराठी रंगभूमिवर राजहंसी रूपाने वावरणारा कलावंत...आज काळाच्या पडद्याआड गेला....
त्यांच्या आठवणीतून तो दिसणार...

त्यांच्या तो मीच... या आत्मचरित्रातून ते आता वाचता येतील...त्यांच्या भुमिकांची आठवण मनात साठवूल

या निर्माता, कलावंत आणि नाटकासाछी आयुष्य वेचणा-या या महान साधकाला....श्रध्दांजली.........



सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com

www.culturalpune.blogspot.com

www.subhashinamdar.blogspot.com

Mob. 9552596276