subhash inamdar

subhash inamdar

Sunday, January 2, 2011

स्वप्नऋतु सीडीतून तरूणाईची गाणी

स्वप्न
हेमंतातल्या गारव्यासारखी
गोड आल्हाददायक स्वप्न
चांदराती सरून गेल्यावर
पहाटेला गुलाबी रंग देणारी ..
ही स्वप्ल
अशी हळवी, मोहक स्वप्नांची गीते देणारी स्वप्नऋतु

स्वप्ने सगळेच पाहतात. ती खरी करण्यासाठी आयुष्य वेचतात.
या स्वप्नाऋतु या श्रीरंग उ-हेकरया तरूण संगीतकाराने केलेल्या  आठ गाण्यांची सीडी पुण्यात रविवारी २ जानेवारीला संगीतकार आनंद मोडक यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात आली. तसा पुण्याचा असला तरी सध्या हैद्राबाद इथं नोकरीनिमित्त गेलेल्या हर्षल पाटील याच्या गीतांना या सीडीत बंदिस्त करण्यात आले आहे. ऋचा घाणेकर – थत्ते हिच्या परिराणीच्या गीताने ह्या सीडीतून तुम्ही थोडे लहानही बनाल.

संगीताच्या ह्या दुनियेत नव्याने उदयाला येणा-या या संगीतकाराच्या कामाचे कौतूक करताना त्याने केलेल्या गीतांचेही आनंद मोडक यांनी कौतुक केले आणि त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निखील श्रीराव यांनी या सीडीची निर्मिती केली आहे. त्यांच्या रूपाने मराठी शब्दांवर प्रेमकरणारा आय टीतला एक तरूण पुढे आला याचा अधिक आनंद होतो. या मराठी अल्बमच्या निमित्ताने अनेक नवे कलावंत संगीताच्या क्षेत्रात दिसायला लागतात. यात संगीतकार श्रीरंग उ-हेकर हा संगीतकार. गीते लिहिणारे हर्षल पाटील आणि ऋचा घाणेकर-थत्ते. अभिषेक मारोटकर हा गायक.
तसे या स्वप्नऋतुत दोन गीतांना सुरेश वाडकरांसारखा गायक-कलावंत सामिल झाल्यानेही या नविन मंडळींना हुरूप येणार आहे. या शिवाय सारेगमप मधले दोन चेहरे ऐकता येतात एक आनंदी जोशी आणि मुग्धा वैशंपायन हे गायक.
सर्वांनीच तयार केलेला हा मराठी अल्बम मनसा या कमलेश भडकमकरांच्या संस्थेने वितरीत करण्यासाठी घेतला आहे. यातच त्याचे मह्त्व पटून जाते.
या निमित्ताने अमर ओक यांच्या बासरीवादनाची छोटेखानी मैफल रंगली. त्यांनी बासरीतून घेतलेल्या आगळ्या सुरावटींनी त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत आखणी वाढ झाली. त्यांनी पोकळ बांबूच्या बासरीमधून श्रीकृष्णाने हाती धरलेल्या मुरलीची कमाल तेवढ्याच ताकदीने दाखवून बासरीवरचे नाद ह्दयात साठविण्याची संधी दिली.
आनंद मोडक यांनी सकाळच्या जाहिरातीत कांही गोष्टींचा उल्लेख केला तर दर जास्त लागतो याची खंत व्यक्त केली. ध्वनिफितीचे प्रकाशन म्हटले की ती कमर्शीअल जाहिरात होते. म्हणूनच अमर बन्सीच्या जाहिरातीतून सहभागी गायकांची नावं टाकून जाहिरात दिली आणि हा समारंभ त्याचाच एक भाग म्हणून करावा लागला यांची खंत स्पषटपणे जाणवली.

स्वरांचे सूरेल नाते ते बासरीच्या सूरातून. गायकांच्या मुखातून आणि गीतांच्या बोलातून येत होते आणि ते रसिक चाहता आनंद घेत आस्वाद घेत होता...हेच महत्वाचे नाही काय ?
तुम्हीही हा नवा मराठी गाण्यांचा...मनातल्या भावनांचा...अधु-या स्वप्नांना साकार करणारा....जरूर ऐकावा हिच इच्छा आहे....

सुभाष इनामदार, पुणे
mob. 9552596276