subhash inamdar

subhash inamdar

Tuesday, March 25, 2014

शब्दरुपाने सुधीर मोघे आपल्यातच आहेत...

सुधीर मोघे यांना नेहमीच कवी म्हणून ओळखले गेले..त्यांचे देहाने जाणे झाले ते १५ मार्चला पुण्यात..

सोमवारी निवारा वृध्दाश्रमातल्या सभागृहात त्यांना श्रध्दांजली वाहताना..ते गेलेत असे समजू नका ते शब्दरुपाने आपल्यातच आहेत..एवढेच काय त्यांच्या ७५ अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजनही तसेच सुरु ठेवा...यातून त्यांच्या विषयीच्या आठवणी भरभरुन अनेक सुहृद सांगतील  आणि सुधीर मोघे यांचे खरेच मनस्वी व्यक्तिमत्व कसे होते.याचा उलगडा अनेकांच्या बोलण्यातून होईल..अनेक आठवणी सांगितल्या जातील .ते पुस्तकरुपाने लोकांसमोर मांडता येईल..नवीन पिढीला त्यांच्या कवीतांचे, साहित्याची आणि रंगरूपाची खरी ओळख पटेल...
`स्वरानंद`ने पुढाकार घेऊन योजलेल्या या सभेत..अनेकांनी सुधीर मोघे यांच्याविषयीचे आपले नाते काय होते..तो कसा इतरांपेक्षा कसा वेगळा होता याविषयीच्या भावना व्यक्त केल्या...यासभेला सुधीर मोघे यांचे मोठे बंधू आणि ज्येष्ठ अभनेते श्रीकांत मोघेही उपस्थित होते..
त्यांच्या भावना अशा होत्या...
आनंद माडगूळकर..
गदिमांच्या गावी जाताना सुधीर म्हणाला.होता...उद्या आपण गेल्यानंतर पुन्हा लोक आपली आठवण अशी काढतील का रे...तेव्हा मला त्या शब्दांची किंमत कळली नाही..पण आज कळते आहे....त्याचे मोठेपण आज तो नसताना जास्त जाणवतं आहे..गदिमाच्या आशीर्वादाने पहिले चैत्रबन साकार झाले..या चैत्रबनातले प्रतिभावंत त्याच्या जाण्याने संपले..


मानसी मागिकर..
कविता पानोपानी कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सुधीर मोघेंच्या मोठेपणाची अनुभूती जाणवली..कलेबद्दलची आणि कवीतेबद्दलची जाण त्यांच्याकडून कळत गेली...जे आपले आहे ते कधी ना कधी मिळतच. हा त्याचा सिध्दांत होता.
केतकी माटेगावकर..
आरोही चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचं गाणं जवळून अनुभवता आलं.रंगूनि रंगात माझ्या...याचे संगीत त्यांचच होते.. त्यांचं प्रोत्साहन..आणि गाण्यामधले स्वर हे काही विलक्षण होतं. ते आपल्यात नाहीत.पण ते गाण्यामधून कवीतेमधून अापल्यातच आहेत.
डॉ.वि.भा.देशपांडे..
पाय नेहमीच जमिनिवर असलेला कलावंत...म्हणूनच मैत्रीही घट्ट होती..आम्ही दोघे एकाच रुग्णालयात..मी ७ व्या तर ते दुस-या मजल्यावर..पण त्यांची भेट म्हणजे अनामीकाची ठरली..हे दुदैर्व..
रमण रणदिवे...
जीवनरसाना भरभरुन माणूस कसा असतो..ते सुधीर मोघे यांच्याकडे पाहता समजते.. संगीताचा कान ..स्मृतीतल्लख..आणि सह्दय माणूस तो होता..ज्याच्या गळ्यात पडून मनसोक्त रडावं असा माणूस...

अपर्णा संत..
पूर्वजन्मीतचे पूण्य म्हणून असा माणूस आयुष्यात मिळाला..
कळले ना..
जगणे गाणे आहे सारे
कोणीही गावो लागलेत तंबोरे
रे जगणे म्हणजे संथ स्वरांचा श्वास
अन् मरण,
जणू ही दोन स्वरातील आस...
ह्याच त्यांच्या ओळी आठवतात...

शशिकांत कुलकर्णी..
कवीता पानोपानी कार्यक्रमाचे व्यवस्थापनाच्या निमित्ताने त्यांची कर्तबगारी कळत गेली..मोठा कवी, मोठा माणूस..
डॉ. सलील कुलकर्णी..
प्रत्येक छोट्या गोष्टीत रसपूर्ण जगणे कसे असावा हे शिकविणारा कवी..खरा माणूस..मनस्वीपणे जगला..
शैला मुकूंद..
 गिरविणे हे त्यांच्या लेखी कधीच नव्हते..ते सतत नवे नवे लिहित गेले..देत गेले..उलगडत गेले..
श्रीनिवास भणगे..
निर्भिड आणि निष्पाप..माणूस..त्यांच्याकडून नाही म्हणायला शिकलो..
सुधीर गाडगीळ..
गद्य निवेदनाचा मूळपुरुष..भरभरून दाद देणारा कलावंत..
आनंद मोडक..
जुन्या गाण्यांचा चाहता..आचार्य अत्रे, पुल देशपांडे गदिमा या परंपरेला प्रतिभावंत हरपाला..तुकारामा इतकं सोपं..आणि तुकारामा इतक अवघड लिहिणारा कवी..
अरुणा ढेरे..
 संगीताची उत्तम जाण आणि शब्दाचं उत्तम ज्ञान असणारा कवी.. सतत ताजा असणारा आणि मराठी काव्यपरंपरेचे उत्तम ज्ञान असणारा कवी..
विजय कुवळेकर..
चांगल्या गुणांची पूजा करत सतत नवीन करत रहाणे हेच त्याचं उद्दिष्ट होतं. नेहमीच शब्दांशी, सुरांशी तो खेळत राहिला.

याशिवाय मृणाल कुलकर्णी (पत्राद्वारे), प्रदिप दिक्षित, श्रीकांत पारगावकर, वंदना खांडेकर, सिध्दार्थ बेंदें यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या...
अरुण नूलकरांनी प्रसंगोचित अशा आठवणी आणि सुधीर मोघे यांच्याबद्दलच्या गुणांचा उल्लेख आपल्या निवेदनात केला..


Thursday, March 13, 2014

आवाज कुणाचा..भावे काकांचा...पडद्यावरही`रंगभाषाकार`...प्रभाकर भावे इप्टाच्या माहितीपटातून थेट रसिकांच्या ह्दयापर्यंत पोहोचले...आणि सातारच्या घरातली आपली पारंपारिक कला घेऊन ते आता रंगभाषेच्या माध्यमातून देशाच्या नाट्यपरंपरेतले चेहरे सजविणारे कलावंत म्हणून सुपरिचित झाले ...

 पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक या एकांकिका स्पर्धांसोबतच "इप्टा‘, "पीडीए‘, थिएटर ऍकॅडमीसारख्या अनेक नाट्य संस्थांच्या प्रयोगांमधून त्यांनी रंगभूषेची किमया केली आहे. महाविद्यालयीन तरुणांमध्ये ते भावेकाका या नावानेच ओळखले जातात. रुपेरी पडद्यावर जेव्हा हा माहितीपट झळकला तेव्हाही उपस्थित तरुण कलावंतांनी पुन्हा एकदा..आव्वाज कुणाचा..भावे काकांचा..म्हणत एकच गजर करत त्यांच्या प्रेमाचे पुरते दर्शन घडविले..

आपण जे काही आहोत..ते वडिलांच्या कलागुंणांच्या शिकवणुकीने..आणि रंगभूषेतल्या कलेचा ध्यास घेऊन जगलो ..परमेश्वराने आपल्याला यासाठीच जन्माला घातले..ह्या धारणेने...मात्र मी आज प्रेम पाहून काय बोलावे..तेच कळत नाही...माझ्या काकांनी (मुकुंद भावे) तर मला साक्षात दंडवत घालून मला लाजविले...याउपर मी काय बोलावे..हेच कळत नाही....प्रभाकर भावे आज इथे मात्र खरोखरच निशब्द झाले..

गुरुवार संध्याकाळी सारे तरुण रंगकर्मी राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या चित्रपटगृहात एकत्र होऊन..भावेमय रंगून गेले होते..इप्टाच्या पुणे शाखेच्या या माहितीपटाचे कोतूक करण्यासाठी मुंबईहून  व इप्टाचे माजी उपाध्यक्ष व अभिनेते अंजन श्रीवास्तव  , अभिनेते मोहन आगाशे,ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांच्यासह अनेक जण अमृत सामक यांनी बनविलेला पाहण्यासाठी आणि प्रभाकर भावेंच्या कार्याची तोंडभरून स्तुती करण्यासाठी हजर होते...
हरहुन्नरी कलावंत..काय काय करु शिकतो...ते त्यांच्या रंगभूषेच्या प्रदिर्घ कारकीर्दीने समजते...शिवाय त्यांचे मुखवटे आणि रंगभूषेविषयीचे पुस्तकही तेवढेच उत्तम साकारले गेले आहे...कलाकारातला माणूसही तेवढाच जागा आहे...भावे काकांचे एक वैशिष्ठ्य म्हणजे..ते माणसातल्या कालकाराला बाहेर काढतात..त्यांनी चेहरा रंगविला की तो तो रहात नाही तो नट बनतो..आणि आपली  भूमिका उत्तम रिच्या वठविण्याचा आत्मविश्वास आपल्यात सहजपणे प्राप्त होतो..असा तरुण रंगकर्मिंचा विश्वास आहे.

अनेक कलावंत आणि पुरुषोत्तम गाजविणारे..गाजविलेले कलाकार भावेंविषयी काय सांगतात..ते ऐकणे फार मोलाचे आहे...फ्रभाकतर भावे यांचा सन्मानही इथे केला गेला...मोहन आगाशे यांनी तो केला..एका रंगकर्मिला असा रसिकांचा लोभ मिळणे हे आजच्या काळात फार दुर्मिळ गोष्ट आहे..ती त्यांना त्यांच्या रुजू बोलण्यातून..कामाच्या निष्ठेतून मिळाली..हेच यातून दिसते....त्यांच्या या क्षेत्रातल्या लेखनकार्यालाही नाट्यकर्मिच्या लेखी एक प्रयत्नातून सिध्द झालेला ठेवा प्राप्त होत आहे..तो जपून ठेवावा आणि त्यांच्या लेखनाला महत्व प्राप्त व्हावे अशीच सा-यांची इच्छा आहे.- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


Sunday, March 2, 2014

पुन्हा ज्योत्स्ना भोळेंचे स्वर आळवले गेले..ज्योत्स्ना भोळे...यांच्या गायकीचा स्पर्श झालेल्या अनेक गीतांना..नाट्यपदांना आज पुण्यात पुन्हा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऐकण्याची संधी आज पुणेकरांना मिळाली..ती त्यांच्या गाण्यांच्या स्पर्धेच्या दिवशी..पुण्याच्या पत्रकार संघात.`स्वरवंदना प्रतिष्ठान`च्यावतीने रविवारी १८ ते ८० वयोगटातल्या विविध वयातल्या स्पर्धकांनी भाग घेतला..यात मोठ्या गटात लीना राजवाडे आणि कनिष्ठ गटात किमया लोवलेकर यांना पहिले बक्षिस मिळाले...
निर्मला गोगटे, सुमती टिकेकर आणि गायक श्रीकांत पारगावकर यांच्या परिक्षक समितीसमोर स्पर्धकांनी आपापली तयारी सादर केली..लगेचच याबाबतचा निर्णय दिला गेला आणि परिक्षकांच्या हस्तेच विजेत्यांची नावे जाहिर करुन त्यांना पुरस्कार दिले गेले.
`गाणे हे अवघड गोष्ट आणि ती सोपी गोष्ट नाही..तेव्हा तुम्ही प्रयत्न करीत आहात याबद्दल आनंद वाटतो..पण ती एक शब्द-सुरांची अनोखी कला आहे..त्यात मेहनत आहे..ती सहजी येणारी सोपी गोष्ट नाही.`.असे..जाहिर चिंतन निर्मला गोगटे यांनी याप्रसंगी सांगून स्पर्धकांची पाठही थोपटली आणि गाणे ही किती गंभीर गोष्ट आहे..ते पटवून दिले.


अरुण नूलकरांनी संपूर्ण स्पर्धेचे संचालन केले..त्यांनीच यशस्वी स्पर्धकांची नावे जाहिर केली..
यात ३५ ते ८० या वरीष्ट गटात
लीना राजवाडे, संगीता कुलकर्णी, संगीता भिडे या तिघांशिवाय उर्मिला मराठे यांना उत्तेजनार्थ म्हणून जाहिर केले..याशिवाय  १८ ते ३५ या वयोगटात किमया लोवलेकर, ऋतूजा जोशी, भक्ति पिळणकर आणि उत्तेजनार्थ - योगदा देशपांडे याची निवड केली.. 
या निमित्ताने या सभागृहात ज्योस्त्ना भोळे यांची सतत आठवण येत होती..त्यांची कन्या वंदना खांडेकतर यांनी या बाबत पुढाकार घेऊन ही स्पर्धा आयोजली होती..
त्यांच्या गाण्यातले सहजपणही किती अवघड होते..हे प्रत्येक गीताबरोबर कळत होते..त्यांच्या जन्मशताब्दीच्या या खुणा आता वर्षभर विविध कारणाने उमटणार आहेत..त्यांच्या स्मृतीला अभिवादन...- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276