subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, February 17, 2016

मानव्याच्या निमित्ताने रंगला गदिमायन..मानव्य संस्थेच्या संस्थापिका विजयाताई लवाटे...
देहविक्रय करून चरितार्थ करणाऱ्या असहाय्य स्त्रियांचा आधार असलेल्या.....फूटपाथवर भाजीपासून कपड्यांपर्यंतच्या वस्तूंची विक्री करणाऱ्या हजारो कष्टक-यांचा आधार असलेल्या.....एड्सग्रस्त मुलांच्या पाठीवरून फिरणारा आईच्या मायेचा हात असणाऱ्या 'मानव्य' संस्था च्या कर्त्या धर्त्या….मानवतेचा, प्रेमाचा, वात्सल्याचा आणि निरपेक्ष माणुसकीचा वारसा देणा-या ... विजयाताई लवाटे.....!!!

एचआयव्ही बाधित मुलांना त्यांचे जीवन सुखाने जगता यावे याच उद्देशातून सामाजिक कार्यकर्त्यां विजयाताई लवाटे यांनी ‘मानव्य’ संस्थेच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली.
आता त्याला अकरा वर्षे झाली..काल म्हणजे ११ फेब्रुवारी २०१६ हा त्यांचा स्मृतिदिन..तो एस एम जोशी सभागृहात साजरा केला गेला..मानव्य संस्थेत आपल्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरविणारी मुलंही इथे एकमेकांना बिलगून आपल्या या प्रेमाचा ओलावा शोधत होती..
यानिमित्ताने डॉ. अारुंधती सरदेसाई यांनी या मुलांच्या जीवनात आई-वडील, आजीःआजोबांचे प्रेम मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करीत ...विजयाताई लवाटे यांच्या कार्याची स्तुती  तिथे सर्वांच्या तोंडून होत होती..त्यांच्या कार्याने वाढलेल्या संस्थेचे बळ वाढविणारी आर्तिक मदतही लोक देत होते..एकूणच मानव्यच्या कार्याची पोचपावती समाज देत होता..

त्यातच भर म्हणून अलौकिक प्रतिभेचे कवी, लेखक, कलावंत आणि गीतरामायण लिहून अजरामर केलेले गदिमांचे मोठेपण सांगत त्यांच्या चित्रपट गीतांना पुन्हा एकदा सादर करून ती पोचपावती आपल्या गदीमायन या कार्यक्रमातून गदिमापुत्र आनंद माडगूळकर यांनी मानव्यसाठी जमलेल्या उपस्थितांना त्या काळाची आठवण करून दिली..
त्यांच्या थोरवीच्या आणि कवीतल्या श्रेष्ठत्वाची उदाहरणे देऊन गदिमांचा जीवनपट आनंद माडगूळकर सांगत होते..

नाटककार बाळ कोल्हटकरांनी आनंदला जेव्हा गीतरामायणातले एखादे गाणे म्हण म्हणून आग्रह करताना ते सादर करताना त्यांच्या डळ्यातून घळघळा अश्रूंचा बांध फुटला..आणि त्यांनी सांगितले ते ऐकताना गदिमा माझ्यासमोर मूर्तीमंत उभे राहिले...हेच गदिमा पुन्हा आपल्या स्मरणात आणण्याचे कसब आनंद माडगूळकरांच्या वाणीत त्यांच्या निवेदनात आणि त्यांच्या ओघवत्या गीतात पुरेपुर आहे..हे रसिकांनी जाणले...आणि गदिमायनच्या कार्यक्रमाचे स्वागत करत हा कार्यक्रम एकत रहावा ..गदिमा पुन्हा एकदा आपल्या कथानकातून बाहेर येत ओजस्वी वाणीने प्रतिभेचे लेणे लाभलेल्या पुत्राकरवी ऐकण्याचे भाग्य मिळाल्याचा आनंद इथे येत राहिला..

त्याचे सूत्रसंचालन करणा-या विनया देसाई यांचाही सहभाग लाभल्याने ही मैफल सुरु होता होता केव्हा संपली ते कळलेही नाही..
खर तर असा कार्यक्रम मानव्यच्या व्यासपीठावर ऐकायला मिळाला याचे समाधान वाटते..

-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

प्रेमरंगाच्या नाट्यपदांनी रंगलेली संध्याकाळ

विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानच्या कलावंतानी रविवारी प्रेम व्यक्त करण्याच्या दिनी मराठी 
संगीत नाटकांची परंपरा कायम ठेऊन..अगदी आण्णासाहेब किर्लास्करांपासून,,भास्करबुवा बखले, खाडीलकर, बालगंधर्व..राम मराठे, जितेंद्र अभिषेकी..ते कान्होपात्रा..ते कट्यार..ते स्वरसम्राज्ञी...पासून अनेक नाटकातली प्रेमविषयक भावना विविध रागात गुंफणारी सुंदर ओंजळ रसिकांच्या चरणी समर्पित केली.व्हेलंटाईन दिनी आपली संगीत नाटकांची जुनी परंपरा सिध्द करत नवीन कलावंतांच्या साभिनय आणि सवेश प्रवेशांची आगळी मालिकांच पुण्यातल्या प्रेमरंग या कार्यक्रमातून शुभदा दादरकर यांच्या लेखनातून गुंफत मुक्तपणे नाट्यसंगीताच्या चाहत्या रसिक वृंदांसमोर सादर करुन वाहवा मिळविली..
मधुवंती दांडेकर आणि श्रीकांत दादरकर यांनी प्रतिष्ठानच्या दोन वर्ष नाट्यसंगीताची तालिम घेणा-या गुणी कलावंतांना रंगमंचीय कसे वावरावे..कसे गावे..गाताना चेहरा कसा हसरा ठेवावा..या सा-याची रितसर तालीम दिली.

नाट्यसंगीत गाताना ते वेळेच्या मर्यादेनुसार कसे विविधरंगी बनवावे याचे प्रशिक्षणही यामुळे  इथे मिळाले..
असे कार्यक्रम महिन्यातून एक तरी करण्याचा मानसही शुभदा दादरकर यांनी बोलून दाखविला..
यात काम करणारे कलावंत..धीटाईने सारे काही साग्रसंगीत सादर करून रसिकांच्या पसंतीस उतरत होते..
हिमांशू जोशी आणि विद्यानंद देशपांडे यांची ऑर्गनची आणि तबल्याची साथ घेऊन ..संगीत नाटकातली पदे ही मुले तन्मयतेने वेशभुषेसह गात होती...

सादर करताना नटी-सूत्रधाराच्या हातात कार्यक्रमाची सूत्रे देत..सारा प्रेमरंगाचा प्रवास होत होता..
यात हेमंत आठवले..सूत्राधार..दिपाली राजे...नटी...तर त्यांच्या जोडीला नाट्यपदांची विविधरंगी मोरपिसे रसिकांच्या मुखी नाटविली ती ...अनुजा माढेकर, लीलाधर चक्रदेव, मीनल पोंक्षे, माधवी केळकर, कल्याणी बडगुजर, मानसी दातर आणि मानसी बडवे या कसदार कलावंतानी..

संगीत नाटकांची मजा काही वेगळीच असते..त्यातही ते ते रुप घेऊन तुम्ही ती पात्रेच बोलावली तर रंगमंचावर पाहतानाही सुंरेख वाटते...

असे कार्यक्रम करताना आगामी कलावंतांची एक फौज तयार होऊन नवे संगीत नाटक नव्या स्वरूपातही पुढे-मागे य़ेऊ शकेल..असी आशा करावयास काहीच हरकत नाही..

पुन्हा एकदा सा-या कलावंतांचे आणि सादरकर्त्या संस्थेलाही धन्यवाद द्यायला हवेत...


- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, February 10, 2016

पोएट सुधीर मोघे साठला आहे रसिकांच्या ह्दयात


सोमवारी पुणेकरांनी दोन कार्यक्रमातून कवीराज सुधीर मोघे यांची स्मृती जागविली.. एक टिळक स्मारक मंदिरात डॉ. सलील कुलकर्णी आणि शुभंकर कुलकर्णी या पिता-पुत्रांनी टिळक स्मारक मंदिरात.....
....तर पुणेकर कलावंताला दूरदर्शनवरून थेट बोलते..करणारे निर्माते अरुण काकतकरांनी सुधीर मोघे यांच्या पंधरा कवीता..गीतांची पार्श्वभूमी सांगणारी आणि जिवनाबद्दलच्या जाणावांचे आणि आपण गेल्यानंतर काय उरावे यांची आपल्या कवीतेमधून सांगितलेली आठवण पुन्हा एकदा रसिकांसमोर ठेऊन मनोहर मंगल कार्यालयात अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या केल्या..
संस्कृती प्रतिष्ठानच्या शिरीष बोधनी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरवात मानसी मागिकर यांच्या प्रास्तावीकाने झाली..तर पुढे सलग तेरा आठवणीतून स्वतः सुधीर मोघे आपल्या आयुष्यातल्या विविध टप्प्यावर भेटलेले संगीतकार, निर्माते यांच्याशी कवीतांबाबात झालेल्या चर्चेतून चित्रपटातली गीते कशी कागदावर उतरत गेली याचे वर्णन सांगणारी मालीकाच रसिकांसमोर येत गेली..
अरूण काकतकरांनी सुधीर मोघे यांना बोलते केले..आणि तो बोलवीता धनी आपले मनोगत रसाळ वाणीत सांगत गेला..
इथे पोएट सुधीर मोघे बालते झाले..

बोलताना कांही ठिकाणी थांबून त्यांची गाणी विशेषतः राम फाटक यांनी संगीत दिलेले भावगीत सखी मंद झाल्या तारका आपले गुरू पं. भीमसेन जोशी यांनी कसे गायले..आणि ते सांगताना दोघांचे मोठेपण.. भीमसेन जाशी आणि सुधीर फडके यांचीही आठवण सांगून  उपेंद्र भट यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला.
हे नायका जगदीश्वरा ..ही नांदीही भट यांनी सादर केली..

गुरु एक जगी त्राता..हे गीत प्रमोद रानडे यांनी सादर केले..आदिती देशमुख यांनी ..झुलते बाई रास झुला..आणि उत्कर्षा शहाणे यांनी ..एकाच या जन्मी जणू फिरूनी जणू जन्मेन मी..आणि... सांज ये गोकुळी गाऊन सुधीर मोघे यांच्या ओघवत्या शेलीची आठवण करून दिली.

या कार्यक्रमाचे वर्णन कवी सुधीर मोघे यांच्याच शब्दात सांगण्याचा मोह होतो..

क्षण जगून झालेले
जुन्या पानात जपावे
डोळ्यातील पाण्यानेच
नवे पान उलटाले..

अरूण काकतकरांनी हा अनुभव दिला..त्याबद्दल त्यांचे मनासापून ऋण...
पोएट सुधार मोघे..तुम्हाला आठवताना खूप कांही सोसावं लागते..
तुम्ही जपलेल्या आठवांना इथं.
स्मृतीत भरभरून सांभाळावं लागतं..
-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276