बारा वर्षांपूर्वी परकर पोलक्यात सादर केलेला मुक्ताविष्कार आज नऊवारी साडीत करणा-या प्रचिती प्रशांत सुरु यांचा मुक्ताई चा दोनशेवा प्रयोग पहाण्यासाठी भरत नाट्य मंदिराच्या खूर्च्या कमी पडल्या. कांही महिने बंद असलेल्या भरतनी नव्याने सुरु केलेली वातानुकूलित यंत्रणा कोलमडून पडली. जिथ जागा मिळेल तिथे लोक बसून प्रयोग पहात होते. अनेक विध मंडळी संस्थेकडे आणि आयोजकांकडे त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत होते. एकजण तर आपली पत्नी आत आहे मात्र आपल्याला जागा नाही म्हणून प्रयोग कधी सुटणार याची प्रतिक्षा करीत ऊभे होते... यातून एक झाले...भरत नाट्य संशोधन मंदिराने आपल्या सास्कृंतिक कार्यक्रमांच्या योजनेत ६ जून ला `मुक्ताई`ला लाभलेल्या गर्दीचा प्रतिसाद पाहून २०१ वा प्रयोग घोषीत केला. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असला तरी प्रवेशिके शिवाय प्रवेश नाही हे ही संस्थेने ठरवून टाकले आहे.
योग साधून आळंदी देवस्थानचे प्रमुख ट्रस्टीपद भूषवित असलेले डॉ. प्रशान्त अनंत सुरू यांनी या कौतुक प्रयोगाच्या प्रसंगी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आणि स्वामी माधवानंद यांना रंगमंचावर उपस्थितीत केले होते. आरोग्याची तपासणी करणारी प्रचिती आता डॉक्टर झाली आहे..पण या निमित्ताने ती `मुक्ताई`मधून समाजमनाची डॉक्टर बनू पहाते आहे असे या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रतिसादावरुन दिसून येते..राजदत्त बोलताना `भारुडांनी समाजाला ज्ञान देण्याचा जसा प्रयत्न एकनाथांनी केला, त्याचाच वारसा `मुक्ताई`च्या निमित्ताने प्रचिती चालविते आहे याबद्दल कौतूक आणि समाधान व्यक्त केले.
आमच्यात १०० दोष आहेत याची यादीही तयार केली आहे..पण गुणांच्या बाजूला ५ पांडवही आहेत. हे विसरून चालणार नाही..मंगंश तेंडूलकर मुक्ताईच्या डी,व्ही.डी चे प्रकाश करताना आपल्या शैलीत बोलत होते.`आळंदीतल्या त्या इतर भावंडाबरोबरच मुक्ताईचे स्थानही तेवढेच श्रेष्ठ आहे..ते आज सांगण्याची गरज आहे. या प्रयोगाच्या निमित्ताने ते काम प्रचिती सुरु करीत आहेत..याचा अधिक आनंद आज वाटत आहे आजच्या काळात हजार वर्षापूर्वी संतांनी निर्मीण केलेला हा भावनीक ठेवा..त्याला मोल नाही....ती ज्ञानाची..संस्काराची महती आजही ओरडून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे..`
आपल्या बरोबर गेली ४० वर्षे अनेक कलाकार काम करीत आहेत पण प्रचितीसारखी लाघवी आणि मनमिळावू कलाकार आपण दुसरी पाहिली नसल्याचे या प्रयोगाच्या निमित्ताने खास मुंबईहून हजर राहिलेले अभिनेते अविनाश खर्शीकर सांगतात.
साम संगीत सभेच्या वतीने हा मुक्ताई या मुक्तआविष्काराचा २०० प्रयोग सादर झाला..त्यानिमित्ताने साम संगीत सभेच्या मेघना वैद्य यांनी उगवत्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करतात. विद्या, कला आणि ज्ञान देणे हा याचा उद्देस असल्याचे त्या सांगतात.
आपल्याला आशीर्वाद देणारे असंख्य रसिक, मान्यवर उपस्थित पाहताना डॉ. प्रचितीच्या चेह-यावर विलक्षण समाधान होते. वयाची १२ वर्षाची मुलगी आज २४ वर्षाची झाली आहे. तेव्हा. नाटक करायला मिळतोय याचा आनंद होता. आता यातून आपण खूप काही शिकलो आहोत..अशीच प्रचिती सतत येवो असा आशीर्वाद तिने आपल्या मनोगतातून उपस्थितांकडे मागितला.
पद्मभीम नाट्यसंघाची ही निर्मिती मुक्ताई आता तेवढ्यात तयारीने हा प्रयोग सादर करत होती. आता पुढे वाटचाल सुरु आहे.
वैद्यकीय व्यवसायातून माणसांचे मोहोळ निर्माण करणारे डॉ. प्रशात्न आणि डॉ. प्रफुल्लता सुरु यांची चाहती मंडळी इथे मोठ्या दाटीने एकत्रित होऊन मुक्ताईच्या महतीचा आविष्कार ऐकत होती. याचे लेखन केले ते डॉ,प्रफुल्लता सुरु यांनी आणि दिग्दर्शनाची संकल्पना राबविली ती डॉ. प्रशांत सुरु यांनी.. कौतूक समारंभाचे संचलन करणारे डॉ. प्रशांत सुरु यांनी वेळेत आणि मनापासून पहिला भाग आटोपता घेतल्यावर आजचा २०० वा प्रयोग पाहण्यात प्रेक्षक गर्क झाला होता.
अधुनिकतेकडे झुकणारा आजचा वाचक आणि रसिकवर्ग सारे सोडून या प्रयोगासाठी भरतकडे मुक्ताई पाहण्यासाठी असंख्य संख्येने हजर रहातो..हे काळाने पुढे खेचत आणलेला आजचा वर्ग काही प्रमाणात का होईना मूळ संस्कृती-संकल्पनेकडे आजही आकर्षीत होत आहे हे मंगळवारच्या (१५ मे, २०१२) वातावरणातून जाणवत होते.
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276