उपस्थित राहून त्यावर स्वतंत्र भाष्य करू शकणारे तरूण ब्लॉगर्सनी संपर्क साधावा. हा एक नवा उपक्रम इंटरनेटच्या माध्यमातून सुरु केला आहे. साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट आणि विविध ललीत कलांचे कार्यक्रम सादर करणा-या संस्थाचेही आगामी कार्यक्रम या ब्लॉगवर दिले जातील. इथे कोणतेही मूल्य आकारले जाणार नाही.
भारतातले पुणे हे एक सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख स्थान मानले जाते. इथल्या रसिकांची कीर्ति सर्वदूर पसरली आहे. पुण्यात रोज अनेक कार्यक्रम होतात. त्यांच्यासाठी ही स्वतंत्र दखल घेणारी साईट असावी एवढीच माझी इच्छा आहे... त्यासाठीच हे सारे...
हा ब्लॉग सुरु केला आहे..तो आपल्या सर्वांचे सांस्कृतिक संकेतस्थळ असेल.. ते करणे हा माझा प्रयत्न आहे. खात्री आहे आपण सारे याला मदत कराल. धन्यवाद.
सुभाष इनामदार, पुणे