subhash inamdar

subhash inamdar

Saturday, January 29, 2011

देऊळ चित्रपटाची घोषणा झाली झोकात

नाना पाटेकर आणि दिलिप प्रभावळकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी 
नेहमीची पारंपारिकता झुगारून देविशा फिल्मसने आपल्या नव्या चित्रपटाच्या नावाची घोषणाच इतक्या झोकदार प्रमाणे ऐटित केली की......मराठी चित्रपट सृष्टीत एक निराळा तरीही मराठीची पताका उंचविणारा चित्रपट येणार याची खात्रीच देऊळच्या निमित्ताने झासी.

वेगळ्या धाटणीचा आणि आपल्या मनातला चित्रपट करण्याची ही संधी मिळाल्याचे कबूल करून देऊळच्या निमित्ताने धाडसाने विषयाशी भिडलो असे ते सांगत नाना-दिलिप यांच्या अभिनयातून दोन अभिनय संपन्न नट ज्यांना आपण लहानपणी पाहिले त्यांच्याकडून  ही गोष्ट चित्रपटातून साकार होताना पाहणे हा  आनंदही पटकथा-संवाद लेखक गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या खास शैलीतव्यक्त केला ...त्यांच्या मनोगतातून देऊळ मधून एका समुहाची, गावाची, आजच्या काळची गोष्ट आशय गंभीर तरीही...तो विनोदी पध्दतीने चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे स्पषट झाले.
पुण्याच्या हॉटेल प्राईडमध्ये निर्माते अभिजित घोलप यांच्या या चित्रपटाची घोषणा २७ जानेवारीला झाली. तीही वेगळ्या थाटात, दिमाखात आणि संगीताच्या निनादात.. टाळ्य़ाच्या गजरात...ते ही उर्स्फूतपणे...
फेब्रुवारीच्या चार पासून वाईजवळच्या खेड्यात चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होत आहे. तिथे साकारणारा हा दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या नजरेतून उमटत जाणार आहे.
दिलिप प्रभावळकरांच्या भाषेत सांगाचये झाले तर उमेश कुलकर्णी हा सिनेमाच्या भाषेत काम करणारा दिग्दर्शक....
नानाचा आपण फॅन असल्याची कबुली देत त्याच्या अभिनयातून त्याचा आवाका थक्क करणारा आहे... त्याच्याबरोबर काम करणे हा योग या मिमित्ताने जुळून येतोय याचा आनंदही दिलिप प्रभावळकरांनी आपल्या सत्काराच्या भाषणात व्यक्त केला.
त्यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहिर झाला म्हणून नाना पाटेकरांच्या हस्ते त्यांचा सत्कार इथे करण्यात आला...या वेळी दिलिप प्रभावळकरांनी पुरस्कार मिळाल्य़ाचा आनंद नक्कीच आहे.. अजून अनेकांचा पुरस्कार होणे गरजेचे आहे... हे ही स्पष्ट केले. लगे रहो मुन्नाभाई मधील गांधींच्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला तेव्हा जसा आनंद झाला तसा आज होत असल्याचेही ते म्हणाले.

नाना पाटेकरांच्या शब्दातच सांगाचये म्हणजे त्याची ( दिलीप प्रभावळकरांची) पात्रता जेवढी आहे तेवढे त्याला नाव मिळाले नाही असे वाटते....दिलिपची हसवा फसवी मधली भूमिका मी कित्येक  वेळा पाहिली आहे.. खरचं इतका छान....
पण त्यांने स्वतःला मराठी पुरते मर्यादित ठेवलेय....आम्हाला तो हिंदीत मिळाला नाही...
मला खूप दिवसांनी मराठीत सिनेमा करायला मिळतोय..याचा आनंद आहे...हा चित्रपट चालेल... तो तुम्हाला हसता हसता विदारक सत्य सांगेल...चित्रपट चांगला होईल याची खात्री आहे.. मला उत्तम भूमिका दिली आहे.. मी ती छान करेन असा विश्वास द्यायलाही नाना पाटेकर विसरले नाहीत. इतरवेळी ज्यांच्याशी बोलायला घाबरतो तो नाना पाटेकरांचा आविर्भाव इथे नव्हता..ते खुशीत आणि आपल्या माणसात मनसोक्त विहरत होते...

गेले दहा महिने चित्रपटाचा अभ्यास आपण करत आहोत.. आज रिजनल सिनेमाला जे चॅलेंज दिसते  ते पाहून ते स्विकारून चित्रपट यशस्वी करण्यासाठी राईट टिम निवडल्याची खात्री तंत्रज्ञानाच्या क्षेत्राक़डून चित्रपट निर्मितीच्या क्षेत्राक़डे वळणा-या अभिजित घोलप या मराठी निर्मात्याने नेमक्या वेळी सांगून जिद्दीचा प्रत्यय दिला. या चित्रपटाद्वारे मार्कटिंग आणि चित्रपटाचे ब्रॅंडिंग उत्तम करण्यासाठी ते आता सज्ज झाले आहेत. आपली संस्था उत्तमोत्तम विषयावरचे चित्रपट बनवून मराठी प्रेक्षकाला आनंदी बनविण्याचा प्रयत्न करेल असा आशावाद  दिला.

देऊळच्या निमित्ताने ग्रामीण पार्श्वभूमि लाभलेली मराठीतील एक ब्लॅक कॉमेडी पाहायला मिळेल याची खात्री वाटते.. वळू आणि विहिर नंतर उमेश कुलकर्णी यांच्या कडून नाना पाटेकर आणि दिलिप प्रभावळकरांमधला अभिनेता ताकदीने पडद्यावर दिसेल. या दोघांचा एकत्रीतपणे साकारलेला शोवटचा प्रसंग वनटेक मध्ये तर चित्रित होईलच..पण तो क्लायमॅक्स आत्तापर्यतच्या मराठी चित्रपटात मैलाचा दगड म्हणून साकारेल असा विश्वास उमेश कुलकर्णी यांना आहे....

मराठी चित्रपटाच्या भविष्याकडे पाहताना देऊळच्या कलावंतांनी रचलेली वीट न वीट प्रेक्षकांना सजवून अनुभवता येईल.
श्रेयनामावली 

देऊळ 
निर्माता- अभिजित घोलप
दिग्दर्शक- उमेश कुलकर्णी
पटकथा,संवाद- गिरीश कुलकर्णी
गीतकार- स्वानंद किरकिरे
संगीतकार- मंगेश धाकडे
प्रमूख भूमिका-
नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, डॉ.मोहन आगाशे, उषा नाडकर्णी, अतिशा नाईक, किशोर कदम, विभावरी देशपांडे, ज्यांती सुभाष, मंजूषा गोडसे, हृषिकेश जोशी इत्यादी.....

सुभाष इनामदार,पुणे. 

subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
http://www.culturalpune.blogspot.com/
Mob. 9552596276