subhash inamdar

subhash inamdar

Friday, November 18, 2011

'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव'-७ ते ११ डिसेंबरला


सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या शीर्षकात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावाचा अंतर्भाव केला आहे. त्यामुळे 'सवाई गंधर्व संगीत महोत्सव' यंदापासून 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' म्हणून ओळखला जाणार आहे.

जानेवारीत पंडितजींचे निधन झाल्यानंतर होणारा हा पहिलाच सवाई गंधर्व महोत्सव आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पंडितजी महोत्सवात कार्यरत नसले, तरी एखादा दिवस आवर्जून हजेरी लावायचे. गुरुसेवेसाठी ५० वर्षांहून अधिक काळ महोत्सवासाठी सर्वस्व देणाऱ्या पंडितजींच्या स्मृती चिरंतन राहाव्या, यासाठीच त्यांचे नाव महोत्सवाशी जोडण्याचा हा प्रयत्न असल्याचे 'आर्य संगीत प्रसारक मंडळा'चे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.

यंदाच्या ५९ व्या वर्षी हा महोत्सव प्रथमच पाच दिवस होणार असून, सात ते ११ डिसेंबर या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेच्या मैदानावर हा महोत्सव रंगेल. महोत्सवात एक दिवस रात्री १२ पर्यंत परवानगी मिळावी, यासाठी अर्ज करण्यात आला असल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले.