सवाई गंधर्व संगीत महोत्सवातल्या २०११ कांही यूट्यूबवरच्या लिंक्स...यात शंकर महादेवन यांचे भजन
सवाई गंधर्व २०११ महोत्सवात सगळ्या त टॊपला होता तो शंकर महादेवन...त्याच्याच काही यूट्युब लिंक्स
यात पुण्याचे तबलावादक पं. रामदास पळसुले यांचे वादन...
अमजदअली खान यांना वेळ कमी मिळाला..पण त्यांनी कमाल केली...
भारतीय संगीताबद्दल विशेष आस्था असणाऱ्या पाश्चिमात्यांना सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचीही मोहिनी पडली आहे. त्यामुळेच दर वर्षीप्रमाणे या वर्षीही महोत्सवात परदेशी पाहुण्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे. संगीताच्या अभ्यासकापासून कानसेनांपर्यंत अनेक पाहुणे भारतीय संगीताने तृप्त होत आहेत.
फ्रान्सहून आलेल्या कॅपियन संगीतातील प्रत्येक गोष्ट समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या म्हणाल्या, 'मी थोडेफार गाणे, पियानो शिकले आहे. पण व्यवसायाने किंवा रूढ अर्थाने मी कलाकार नाही. पण मला संगीत ऐकण्यास खूप आवडते. पुण्यात एका मित्राच्या लग्नासाठी आले होते. तेव्हा मला या महोत्सवाबद्दल कळले. महोत्सवाची महती ऐकून येथे येण्याचे ठरवले आणि या संगीताच्या प्रेमातच पडले. गायक सुरवातीला जी आलापी करतात, ती खूप शांत, सुखद असते. त्यामुळे ऐकणारा स्वत:च्या मनात डोकावू शकतो. किंबहुना मला भारतीय संगीताचे हेच वैशिष्ट्य वाटले. ते मनाच्या खोलवर पोचले. मला जमिनीवर बसायची सवय नाही; पण महोत्सवात संगीत ऐकताना माझे पाय दुखत आहेत किंवा अशाप्रकारे बसणे मला अवघड जात आहे, हे जाणवतही नाही आणि हीच मला भारतीय संगीताची ताकद वाटते. तुमचे दु:खही तुम्हाला विसरायला लावते.''
पुण्यात आल्यापासून इथले लोक खूप घाईत, धावपळीत असल्यासारखे वाटतात; पण महोत्सवात त्यांना इतक्या शांत चित्ताने बसलेले पाहून खूप आश्चर्य वाटले. त्याचबरोबर इथे सर्व स्तरांतील रसिक एकत्र बसून गाणे ऐकतात. श्रीमंतासाठी वेगळी सोय, गरिबांसाठी वेगळी, असा प्रकार नाही हे पाहूनही खूप आनंद झाला, असेही कॅपियन यांनी नमूद केले.
मूळचे कॅनडाचे, पण आता सिंगापूर येथे राहणारे व पुणेकर तबलावादक नवाझ मिरजकर यांच्याकडून शिक्षण घेणारे ब्लेअर मिलर या कार्यक्रमांकडे अभ्यासक दृष्टीने पाहतात.
तबल्याचे शिक्षण नऊ वर्षे घेतल्यामुळे, तसेच दिल्लीत काही वर्षे राहिल्याने त्यांचे कान भारतीय संगीतासाठी तयार झाले आहेत. ते म्हणाले, ""इथला रसिक मला जास्त आवडतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन भारतीय संगीत ऐकणे, हा अनुभव खूपच छान आहे. पं. भीमसेन जोशी यांच्या अनेक ध्वनिफिती मी ऐकल्या आहेत. त्यांच्या आवाजात जबरदस्त ताकद होती. महोत्सवातील वाद्यसंगीत मला अधिक भावले.''
पुण्यात मिरजकर यांच्या घरी जाऊन आपले गुरू नवाझ मिरजकर यांच्या आई-वडिलांची भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
कॅनडात भारतीय संगीत शिकणाऱ्या रॉबिन कॅरिगन या खास महोत्सवासाठी पुण्यात आल्या आहेत. पुणेकर नीरजा आपटेकर या त्यांच्या कॅनडातील गुरू आहेत. कॅरिगन म्हणाल्या, ""मी गाण्याबरोबर पियानो, ऑर्किडियनही शिकते. या महोत्सवात मला अश्विनी भिडे देशपांडे, शैला दातार यांचे गाणे अधिक भावले. सॅक्सोफोनवर भारतीय संगीत ऐकण्याचा अनुभव खूप वेगळा होता. मी जॅझही शिकते. त्यामुळे हा प्रयोग मला अधिक भावला. कॅनडात विविध देशांतील संगीत क्षेत्रातील लोक राहतात. त्यामुळे सगळ्या प्रकारचे संगीत ऐकायला मिळते.''
http://www.esakal.com/esakal/20111211/5733657263938939740.htm
No comments:
Post a Comment