subhash inamdar

subhash inamdar

Friday, April 26, 2013

शिवचरित्रातून आपण काय घेतले...?

 शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे य़ांचा सवाल..



गेल्या काही वर्षात मी १० ते साडे-दहाहजार व्याख्याने शिवचरित्रावर दिली. मात्र आज मला असे वाटते की, लोकांनी ती करमणूक म्हणून ऐकली. टाळ्या दिला. प्रसंगी जयजयकार केला..छत्रपती शिवाजी की जय..आणि त्यांच्या कर्तृत्वाची नोंद केवळ पुतळ्यांच्या स्वरूपात दिली..अश्वारूढ पुतळे पुण्यात सात आहेत..
पण त्या शिवचरित्रातून आपण काय घेतले...

आज मी व्यथित आहे. मध्यतरी मी इंग्लंडला गेलो असताना विल्स्टन चर्चिलचा पुतळा तुमच्या देशात नाही..असा प्रश्न माझ्या इंग्रजी मित्राला विचारला..त्याने काही काळ थांबून सांगितले...चर्चील आमच्या रक्तात आह..पुतळ्यांची गरज काय...

आज मला ते आठवते कारण...आज रोज टीव्ही आणि वृत्तपत्रातून लहान मुलींवर बलात्काराच्या बातम्या दिसतात. काय चालले आहे हे..तुम्हाला आणि मलाही पेटून उठावे वाटत नाही...
काय घेतले तुम्ही शिवचरित्रातून केवळ करमणूक करुन घेतली.

आज मला स्वतः बद्दलही चिड येते..आणि मी फुकट उतकी वर्षे वाया घालविली असे वाटते.

आपण फक्त शिवाजी महाराजांच्या गुणांची चर्चा करतो. त्यांच्या मोगलांशी केलेल्या लढाया पाहताना त्यांच्या धाडसी वृत्तीला दादा देतो.

मात्र, प्रत्यक्षात आपल्याला चंगळवाद आवडतो. अशी आपली वृत्ती असेल तर आपल्या राष्ट्राची प्रगती कशी होईल?
पुतळे उभारून आणि जयजयकाराच्या घोषणा देऊन आपली प्रगती होणार नाही. त्यासाठी शिवचरित्राचे वेड आपल्या रक्तात भिनण्याची आवश्‍यकता आहे.

माझी व्याख्याने लोकांनी करमणूक म्हणून ऐकली. त्यामुळे त्यांचा आणि माझा वेळ वाया गेला, अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले, शिवचरित्र वाचून किंवा ऐकून आम्ही नेमके काय मिळवले याचा विचार करण्याची वेळ आज आली आहे.

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी श्रीनिवास कुटुंबळे लिखित, "विधाता हिंदवी स्वराज्याचा' या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी ते खूपच व्यथित झाल्याचे दिसत होते. इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 


त्यावेळी त्यांनी काढलेले शब्द आजही मला आठवतात..तसेच्या तसे देण्याचा मी यत्न केला आहे....आपण सर्वजण याचा विचार कराल अशी अपेक्षा करतो..




- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276