लोकबिरादरीच्या नीधीसाठी खास आयोजन
कोल्हापूर,१ एप्रिल- हेमलकसा इथल्या डॉ. मंदा व प्रकाश आमटे यांनी चालविलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतीसाठी पुण्यातील प्रसिध्द व्हायोलिन वादक सौ. चारुशीला गोसावी आपला कोल्हापुरातील शुभारंभाचा कार्यक्रम रविवार,८ एप्रिल २०१२ रोजी केशवराव भोसले नाटय्गृहात रात्री ९ वाजता सादर करणार असून तो सांस्कृतिक पुणे यांच्यावतीने आयोजित केला आहे. यात मराठी व हिंदी लोकप्रिय गाणी सादर केला जाणार आहेत. या कर्यक्रमाचा शुभारंभ कोल्हापूरातील ज्येष्ठ व्हायोलीन कलावंत आदरणीय श्री. डी. एन .जोशी यांच्या हस्ते होत आहे.
याबाबतची माहिती सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांनी कोल्हापूरात आज पत्रकार परिषदेत दिली.
हेमलकसा इथल्या आदिवासी भागात आरोग्य आणि त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी डॉ. मंदा व प्रकाश आमटे यांनी चालविलेल्या कार्याला आपण कलेच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावावा या हेतूने सो. चारुशीला गोसावी यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.
व्हायोलिन वादन क्षेत्रात सौ. गोसावी गेली ३२ वर्षे विविध कार्यक्रमातून त्यांनी आपली कला पोचविली आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनइल) मध्ये त्या कार्यरत असून त्यांना खात्या अंतर्गत होणा-या अ.भा. स्तरावरील शास्त्रीय संगीताच्या व्हायोलीन वादनाच्या स्पर्धेत सलग २२ सुवर्णपदके प्राप्त झाली आहेत.
त्यांनी आत्तापर्यंत २५०० कार्यक्रमामधून व्हायोलीनचा साथ केली असून १०० चे वर स्वतंत्र व्हायोलीनवादनाचे कार्यक्रमही केले आहेत. आपले वडील व गुरू पं. भालचंद्र देव यांचेकडून त्यांनी हा कलेचा वारसा घेतला आसून भारभतभर विविध कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे.
कार्यक्रमात अभंग, नाट्य़गीत, लावणी इत्यादी प्रकारही त्या व्हायोलीनमधून सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिध्द निवेदक आनंद देशमुख यांचे असून त्याशीवाय इतर सहभागी कलावंतांमध्ये रविराज गोसावी (तबला), अमृता ठाकूरदेसाई ( सिंथेसायझर) आणि राजेंद्र साळुंके (तालवाद्ये) यांचा सहभाग असणार आहे.
कोल्हापुरातील शुभारंभाचा कार्यक्रम रविवार,८ एप्रिल २०१२ रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात रात्री ९ वाजता सादर करणार असून तो सांस्कृतिक पुणे यांच्यावतीने आयोजित केला आहे. त्याची तिकीटे रूपये. १०० व ५० अशी असून ती शुक्रवार पासून नाट्यगृहावर उपलब्ध होतील. कोल्हापूरच्या गायन समाज देवल क्लबच्या सभासदांसाठी या कार्यक्रमासाठी विशेष सवलत दिली जाणार असून त्यांनी आपली तिकीटे देवल क्लबचा शिक्का मारुन थिएटरवरुन घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचा खर्च वजा जात सर्व रक्कम लोकबीरादरी प्रकल्पासाठी दिली जाणार आहे. ज्यांना धनादेशाद्वारे मदत करायची आहे त्यांनी तो महारोगी सेवा समिती, वरोरा (Maharogi Sewa Samiti, Warora) या नावावर काढला तर तो स्विकारण्याची व्यवस्था नाट्यगृहावर करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ९५५२५९६२७६ या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांनी केले आहे .
`सांस्कतिक पुणे`च्या वतीने महाराष्ट्रात अशा प्रकारचे विविध शहरात करण्यात येणार आहेत.त्यातलाच हा कोल्हापूरात होणारा कार्यक्रम आहे.
आपले,
सुभाष इनामदार
Mob. 9552596276
subhashinamdar@gmail.com
सौ. चारुशीला गोसावी
Mob.9241019499
charusheelagosavi@gmail.com