subhash inamdar

subhash inamdar

Monday, April 22, 2013

संधीकाली रमणा-या त्या तीन यात्रा..

अगदी उन्हाळा असला तरी पुणेकरांसाठी सुखद असा हा काळ आहे. सध्या तापमानही ३६ पर्यत असते..रात्री तर थंडीही जाणवते..त्यातच भर म्हणजे संध्याकाळचे सुरेल वारे..
त्यातही अधिक सुखावह काळ म्हणजे रोज नवेनवे सांस्कृतिक कार्यक्रमांचा नजराणा.

दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या डेव्हीड ससून वृध्दाश्रम चालवीत असलेल्या निवारा संस्थेने (१८६५ मध्ये पुणे येथे "डेव्हिड ससून इन्फर्म असायलम' ही संस्था स्थापन झाली. ही संस्था "निवारा' या नावाने आजही वृध्दांसाठी मदतकार्य करते आहे. )मराठी भावसंगीताची वाटचाल हा एक सर्वांना आवडेल असा भावगीतांचा नजराणा पेश केला.
`स्वरानंद `संस्थेने आपल्या अपर्णा संत, संजीव मेहेंदळे या दोन गायकांच्या संगतीत अरुण नूलकरांच्या निवेदनातून रंगत नेलेला हा कार्यक्रम रंगला..तो पराग माटेगावकर, अनय गाडगीळ, राजेंद्र साळुंखे आणि राजेंद्र दूरकर यांच्या दमदार साथीमुळे. तुडुंब भरलेल्या निवाराच्या सभागृहात वन्समोअरची अनेक गाणी मराठी चित्रपटांची ती जुनी मोहिनी किती होती याची साक्ष पटविणारी होती.
अपर्णा संत यांच्या  सुरेल आवाजाची जादूच या कार्यक्रमात रसिकांच्या मनावर अधिक पडल्याचे प्रतिसादातून दिसते होते.
काही रसिकांनी दूरकरांच्या ढोलकीच्या नादावर फिदा होऊन दौलतजादाही उधळली.

`राजा माणूस ......

राजा परांजपे जन्मशताब्दी निमित्ताने त्यांचे एक से एक चित्रपटाची उधळण होत असताना..२१ एप्रिलला `राजा माणूस`या अनिल बळेल लिखित आणि स्नेहल प्रकाशन निर्मित पुस्तकाचे प्रकाशन अवघे ८८ वर्षांचे तरुण नायक रमेश देव यांच्या हस्ते ऐतिहासिक केसरी वाड्याच्या सभागृहात झाले.
राजा परांजपे यांनी आपल्याला कुंभाराच्या मडक्याप्रमाणे घडविले असे अभिमानाने सांगणारे आणि ज्यांच्या नावातच राजा असणारे ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या आठवणींने हेलावत समारंभ फुलत गेला.

रेसकोर्सवर राजा परांजपे यांची पहिली गाठ कशी पडली याचे साद्यंत वर्णन ऐकवून राजा परांजपे यांच्या पुस्तकाचे नाव देव माणूस असायला हवे..असे सांगून त्यांनी माडगूळकर आणि बाबुजी यांच्यात सुवासिनी चित्ररपटात कसे भांडण लावून ..दिवसामागू दिवस चालेले ऋतू मागूनी ऋतू..जिवलगा कधी रे येशील तू..हे अजरामर गीत कसे तयार झाले याची आठवण रंगवून सांगून राजा परांजपे हे दिग्दर्शक तर मोठे होतेच पण माणूस म्हणूस किती श्रेष्ट होते  याचे दर्शन घडविले.
रविन्द्र घाटपांडे यांनी राजा परांजपे यांच्या चित्रपटातल्या दोन गीतांना संपदा थिटे आणि  हेमंत आठवले यांच्या आवाजात सादर करुन त्या काळाचल्या चित्रपटांची आठवण करुन दिली.

वाहवा..क्या बात है..



आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे
या स्वरांच्या चांदण्याला गगन दे रसिका तुझे..
 किंवा

पाऊस-पाणी-प्रकाश-वारा-पक्षी-सागर-सरिता
परमेशाच्या प्राणांमधल्या जिवंत सार्‍या कविता
आनंदाने मिळेल त्याचे कवेत घ्यावे गाणे ..
जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे
जगणार्‍याने जगता जगता मजेत गावे गाणे..


हे लिहणा-या कवी रमण रणदिवे यांच्या `स्वर चांदणे ` उमलविणा-या मराठी गझल रुजविणा-या कवीत ज्यांचे नाव सुरेश भट यांनी  पुढे आणले त्या या कवीच्या प्रतिभेचा आविष्कार...रंगला तो सोमवारी एस एम जोशी सभागृहातल्या रसिकांच्या साक्षीने.
हल्ली कलाकारांचेही मार्केटींग करावे लागते...पण ते न जमणारे दर्जदार कवी यांना आवलाच कार्यक्रम करण्यासाठी कांही मित्रांना गळ घालून तो घडवावा लागतो..ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही...


उत्तम आवाज, संगीताचे ज्ञान आणि संवादिनीवरून फिरणारा संगीतमय हात ही रणदिवेंची आणखी एक ओळख. त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचा हा वारसा पुढे चालवला आहे.  त्यांचे घर म्हणजे संगीतघरच आहे. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे आणि त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. गेली ४० वषेर् ते एका श्रद्धेने कविता आणि गझला लिहीत आहेत.


राजेश दातार आणि प्रियल साठे यांनी त्यांच्या गझलांना इतके सुरेल पेश केले की त्यातले शब्दन् शब्द सूरमयी पैठणी नेसून रसिकांच्या मनात घर करुन राहिले..संपल्यावर टांळ्यांच्या कडकडाटात आनंदही व्यक्त केला.
 


मात्र तरल.स्पर्शून जाणा-या शब्दांना मानणारे संगीतकार आणि त्यांच्या गझलांचे चाहते तरुण संगीतकार कौशल इनामदार यांची हजेरी..


केवळ उपस्थित नाही तर त्यांच्या दोन रचनांना अतिशय सुरेल असे सादरीकरण करुन रमण रणदिवेच्या श्रेष्ठत्वाचे दर्शन घडविले.
खरं तर हा सारा खेळच रणदिवे कुटुंबीयांनी रंगला...हार्मोनियमवर होते मेकॅनिकल इंजिनीअर असलेले एक पुत्र आणि दुसरा मुलगा  अतिशय उत्तम तबला साथ करत होते.




स्वतः संगीताचे ज्ञान असेलेल्या रमण रणदिवेंच्या रचना यामुळेच छंदबध्द होत असतील. त्यांना सुरातच शब्द सुचत असतील... विनय़ा देसाई यांनी या गझलकाराला बोलते केले आणि मुक्त छंदातल्या काही रचना त्यांच्या कडून आठवून सादर करायला भाग पाडले. तसे ते पेटी घेऊनच बोलत होते म्हणूनच एका गझलेची प्रचिती त्यांच्या आवाजातही ऐकायला मिळाली...आणि शब्द आले..वाहवा..क्या बात है..

आज जे सुरांचे चांदणे रसिकांनी टिपले तसे त्यांच्या रचनांचे अनेक कार्यक्रम व्हायला हवेत...आणि ते होतील याची खात्री वाटते.




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276