subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, October 31, 2012

संगीतदान करणारे पं. ना वा दिवाण गेलेवय वर्षे. ८५. डॉ. नारायण वामन दिवाण. संगीत क्षेत्रात त्यांना पं. ना.वा. दिवाण म्हणून ओळखळे जाते. आज (बुधवारी) सकाळीही याही वयात त्यांनी दोन विद्यार्थ्य़ांना संगीत शिक्षण दिले. त्यानंतर अचानक त्यांना अस्वश्थ वाटले. आणि पहाता पहाता त्यांचे त्यातच दुःखद निधन झाले.  


आय़ुष्यभर संगीतदान हेच आपले काम. ते त्यांनी अतिशय तळमळीने केले. पुण्य़ात या तोडीचे आनेक गुरु आहेत. जे दान अनेक वर्ष करताहेत. मात्र पं. पिंपळखरे गावात आणि बिबवेवाडीत पं. दिवाण.
आज त्यांच्या अचानक जाण्याने संगीत क्षेत्रात आपलेपणानी अनेकांना सल्ला देणारा गुरु हरपल्याची भावना आहे. पुण्याच्या संगीत क्षेत्रातील अनेक गुरू, मार्गदर्शक त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी उपस्थित होते. पं. मुकुंद मराठे. विजय दास्ताने. संजय करंदीकर. पांडुरंग मुखडे. माजी आमदार विश्वास गांगुंर्डे ही त्यातलीच काही प्रमुख नावे. कितीतरी संगीत श्रेत्रातील विद्यार्थी यावेळी अश्रुपूर्ण नेत्रांना त्यांचे अखेरचे दर्शन घेत होते. 
तसा पं. दिवाण यांच्या कारकीर्दीचा धावता आढावा घेतला तर सारे आयुष्यच त्यांनी संगीताची सेवादान करण्यात घालविले. त्यांचेकडे संगीत विशारद झालेल्यांची संख्य़ा १००० आहे. तर संगीत अलंकार झालेले ८०० आहेत. तर ३ जण संगीताचार्य म्हणून उत्तीर्ण झाले आहेत. ते. स्वतः संगीताचार्य आहेत. नुकत्याच होत असलेल्या गांधर्व महाविद्यालयाच्या परिक्षा केंद्रात त्यांचेही एक महत्वाचे केंद्र होते..त्यांच्या सरस्वती संगीत विद्यालयामार्फत पुणे, सासवड, बारामती, भोर, पिंपरी-चिंचवड या केंद्रावरुन २००० विद्यार्थी परिक्षेला बसत असत. १९५७ सालापासून अ.भा.गांधर्व मंडळाशी संलग्न मंडळाचे पेट्रन म्हणून ते काम पहात होते.


स्पर्धेच्या घोषणेच्या दरम्यान मधोमध पं. दिवाणही प्रिया बेर्डे यांच्या बाजुला हरॉजर होते.यात संगीत क्षेत्रातील मंडळीही आणि आयोजकही दिसत आहेत.


मास्टर इव्हेंटस् आणि कै. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनच्या वतीने होत असलेल्या राज्यस्तरीय गायन, वादन आणि नृत्य स्पर्धेचे ते प्रमुख सल्लागारही होते.१९५७ ते १९७५ या काळात पुण्याच्या एस एन डी डी कन्याशाळेत ते संगीत शिक्षक म्हणून सेवाही केली आहे.
डिसेंबर १३, १९२७ ला बुवाचं वाठार (कोल्हापूर) इथे किर्तनकारांच्या घराण्यात दत्तजयंतीला त्यांचा जन्म झाला. १९४० ते १९५० या कालावधीत इचलकरंजी इथे दरबारगवई पं, केशवबुवा इंगळे यांचेकडे त्यांनी गुरुकुल पध्दतीने शिक्षण घेतले. १९५१ पासून ते पुण्यात आले. माधव संगीत विद्यालयात संगीत शिक्षक म्हणू आपला पहिला परिचय त्यांनी पुणेकरांना करुन दिला.
१९५२ पासून आपले स्वतःचे सरस्वती संगीत विद्यालय संचलित केले..ते आजतागायत..पहिल्यांदा ते नारायणपेठेत होते आता ते बिबवेवाडीत आहे.
आर्य संगीत प्रसारक मंडळ, गांधर्व महाविद्यालय, भारत गायन समाज या संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता.
आपले स्वतःचे स्वतंत्र कलाकार म्हणून नाव करण्यापेक्षा त्यांनी संगीतसाधक घडविण्याचे केलेले काम हेच त्यांच्या त्यागाचे प्रतिक मानावे लागेल. आज असे गुरु आणि गुरुकुल परंपरा जपणारे संगीत मार्गदर्शक दोनही विरळा. त्यांच्या कामाचे मोल अनमोल आहे. त्यांचे मोल त्यांचे संगीतसाधकच आपल्या कृतितून दाखवतील. त्यांच्या जाण्याने अखंड चाललेल्या संगीत सेवेला खिळ बसली आहे हे नक्की.सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596726

Monday, October 29, 2012

नाट्यसंपदा प्रतिष्ठानचा गानसरस्वती महोत्सव पुण्यात रंगणारनाट्यसंपदा प्रतिष्ठान, मुंबई यांनी आपल्यामार्फत पहिला शास्त्रीय संगीताचा महोत्सव तोही गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या शास्त्रीय संगीतातील योगदानानिमित्त  पुण्यात आयोजित केला आहे. दिवाळी नंतरचे दोन दिवस ही एक संगीत क्षेत्रातील मोठी आतषबाजी १७ आणि १८ नोव्हेंबर २०१२ला गणेश कला क्रिडा मंचावर पुणेकरांच्या साक्षिने होणार आहे. संबंधीची माहिती सोमवारी प्रतिष्ठानच्या वतीने दाजीशास्त्री पणशीकर, सुभाष सराफ आणि किशोरी आमोणकरांचे शिष्य रघुनंदन पणशीकर (ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि नाट्यसंपदाचे कै. प्रभाकर पणशीकर यांचे सुपूत्र) यांनी दिली.

नाट्यसंपदा प्रतिष्ठानही संस्कृत आणि संगीताचा प्रसार करण्यासाठी कटीबध्द आहे. काही कालावधीपूर्वी संस्थेनं तरुण नाटककारांसाठी नाट्यलेखन स्पर्धा जाहीर केली होती. त्यातून तीन लेखकांना पुरस्कार देण्यात आले. आता गेली सात दशके संगीत क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या नावाने हा महोत्सव आयोजिला आहे. त्यांचा सत्कारही केला जाईल. त्यांचे पट्टशिष्य रघुनंदन पणशीकर यानी १५ वर्षे शास्त्रीय संगीताची तालिम घेतली आहे. तेच आता आपल्या गुरुंचे यापध्दतीने पूजन करुन ख-या सरस्वतीमय असेलेल्या किशोरीताईंच्या स्वरांची ओंजळ रसिकांपर्यंत पोहोचवित आहेत. 

कितीही झाले तरी संगीत विद्या ही गुरु-शिष्य परंपरेतूनच वाढीला लागते. विकसित होते, असे सांगून दाजीशास्त्री पणशीकर यांनी ही एका अर्थाने गुरुंची पूजाच आम्ही करीत आहोत. त्यांचे गुरुपूजन या महोत्सवात पारंहारिक पध्दतीने केले जाणार आहे. गुरुकूल परंपरा सुरु ठेऊन त्या परंपरेचा वेध घेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

या महोत्सवातून नवीन पिढीला व्यासपिठ देण्याचे प्रतिष्ठानचे उद्दीष्ट आहे. हा दरवर्षी करायचा आहे. जुने जाणते गायक यांच्या आशीर्वादामधूनच नविन कलाकारांचे गाणे पुढे जाणार आहे, असे या प्रतिष्ठानचे विश्वस्त सुभाष सराफ यांनी स्पष्ट केले.ए. शिवमणी (ड्रम्स), 


मिलिंद रायकर 


आणि रवींद्र जारी यांची व्हायोलिन आणि सतार वादनाची जुगलबंदी, बेगम परवीन सुलताना, रघुनंदन पणशीकर आणि पं. जसराज यांच्याबरोबरच किशोरीताईंची यादगार मैफल या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. जे.बी.एल.हरमन ग्रुपने हा महोत्सव पाच वर्षे प्रस्तुत करण्याचा मनसुबा यावेळी जाहिर केला.

 
 पुण्याला संगीत महोत्सवाची मोठी परंपरा आहे. त्या वैभवशाली परंपरेत आणखी एका भव्य महोत्सवाची भर पडणार आहे.


-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, October 28, 2012

राज्यस्तरीय गायन, वादन आणि नृत्यविषयक स्पर्धा

कै. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशन आणि मास्टर ईव्हेंट व पब्लिसिटी यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्टार बॅटल्स या गायन, वादन आणि नृत्यविषयक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा आरंभ १६ ते १८ नोव्हेंबर २०१२ पासून पुणे, कोल्हापूर, सोलापूर नवी मुंबई, नाशिक, ओरंगाबाद आणि नागपूर शहरात सुरु होत असल्याची माहिती कै. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनच्या संचालिका अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.


कोणत्याही कलेचा प्रसार आणि प्रचार नेहमीच लहान मुलांपासून सुरु होतो. म्हणूनच गायन, वादन आणि नृत्य या कलेत प्रविण असलेल्या राज्यातल्या लहान गावातल्या कलाकारांसाठी ही अभिनव स्पर्धा स्टार बॅटल्स या बॅनरखाली घेण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या कलेला दाद आणि त्यांना नवे व्यासपिठ मिळवून देताना त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा उद्देश आहे. ही स्पर्धा या क्षेत्रातल्या कलाकारांच्या दृष्टीने एक नवे आव्हान ठरणार आहे.कलेच्या विविध क्षेत्रात आज स्पर्धा मोठी आहे. मात्र आरंभापासून कलेला खतपाणी घालून जर योग्य मार्गदर्शन लाभले तर पुढे तो चांगला कलावंत म्हणून नाव-किर्ती आणि प्रसिध्दी मिळवू शकतो..यासाठी त्याच्या कलेतील प्रगती अजमावून त्याला शाबासकीची थाप देणे आणि ती कला पुढे नेण्यासाठी आर्थिक मदत करु योग्य गुरुकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या स्पर्धमागचा संयोजकांचा उद्देश असल्याचे या स्पर्धेचे समन्वयक सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांनी सांगितले.

मास्टर ईव्हेंट व पब्लिसिटी आणि कै. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने ही राज्यस्तरीय स्पर्धेची घोषमा करण्यात आली. डिसेंबरच्या मध्याच्या सुमारास याची अंतिम फेरी घेण्यात येईल. य़ासाठी ७ व्या वर्षांपासून पुढे असलेल्या कोणत्याही कलाकाराला भाग घेता येईल. प्राथमिक फेरीत त्याच्या गुंणांचे मुल्यपापन त्याक्षेत्रातल्या अनुभवी परिक्षक मंडळाकडून केल्यानंतर त्याला अंतिम फेरीत निवड होईल. 

या परिक्षक मंडळात संगीताचार्य पं. ना.वा .दिवाण, पं. विजय बक्षी, संतूरवादक धनंजय दैठणकर, गुरू व नृत्यांगना स्वाती दैठणकर, गझल गायक अन्वर कुरेशी, तबला वादक संजय करंदीकर आणि नृत्यकुशल अभिनेत्री शर्वरी जेमिनीस या मान्यवर परिक्षकांची सल्लागार समिती काम करणार आहे.
स्टार बॅटल्स या स्पर्धचे मुख्य प्रायोजक मास्टर टूर ऑर्गनायझेशन प्रा. लि. हे आहेत.
नुकतीच पुण्यात स्पर्धेमध्ये परिक्षक म्हणून काम करणा-या संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनुभवी कलावंतांचा मेळावा आणि त्यांची याबाबतची मते अजमावण्यात आली. यात मधुवंती दांडेकर, मंजिरी आलेगावकर, निर्मलाताई गोगटे, ह्षीकेश बडवे, मिलिंद पोटे, प्रशांत फाटक, विजय दास्ताने, मिलिंद डोंगरे, सुरेश फडतरे, तेजस्विनी साठे, चारुशीला गोसावी, कौमुदी कुलकर्णी,. अपर्णा रास्ते, विजय कोटस्थाने, कृष्णा जोशी, चित्रा आपटे, मधुवंती बोरगावकर, अझुरीद्दीन शेख यांचा समावेश होता.


अधिकाधिक निकोप स्पर्धा पार पडावी यासाठी स्थानिक पातळीवरचे काही संस्थांने कलावंत याचा आयोजनात सहभाग घेण्यात आला आहे.

Wednesday, October 17, 2012

पार्टनर आता चित्रपटातून दिसणार...


एखादा चित्रपट येण्याआगोदर काही दिवस त्याची जाहिरात येऊन धडकते. तशी या श्री पार्टनर बाबत परवा झाले.  १९७७ साली आलेल्या वपुंच्या ( बापूंच्या) कादंबरीने मध्यमवर्गीय जीवनातील सुख-दुखाःच्या प्रसंगातून एकलेपण घालविणा-या आणि मित्राचे नाते , त्याचे
प्रेम जपणा-या या जीवनाचे विलक्षण शब्दात केलेले हे शब्दचित्र डोळ्यासमोर ऊभे रहाते. याच नावाचे नाटक आले. त्याचे १०० प्रयोग झाले. त्यात वपुंनीच पार्टनर ची भूमिका केली होती.

नंतर आली ती मालिका. त्यात विक्रम गोखले यांनी पार्टनर रंगविला. आणि आता समीर रमेश सुर्वे तीन वर्षांच्या अथक् धडपडीनंतर याच कादंबरीतून चित्रपट तयार करून तो रसिक-वाचकांसमोर आणत आहेत. गेल्या दीड वर्षात त्याच्या धाडसाला आणि ध्येयाला बाबा काळे सहनिर्माते म्हणून प्रप्त झाले आणि ही श्री पार्टनरची फिल्म पडद्यावर साकार झाली.

आता मार्केटिंग तंत्र बदलेले आहे. गावागावात जावून आधी त्याबाबात पत्रकार परिषद कलाकारांसोबत केली जाते. विविध माध्यमाचे प्रतिनिधींसमोर त्यातल्या कांही गोष्टींची चर्चा होते. त्यातली वैशिष्ठ्ये मांडली जातात. त्याचे गुणगान होते...मात्र एकदा चित्रपट लागल्यावर पुढे सारेच विरुन जाते. कारण तो चित्रपट त्या ताकदीचा नसतो.
 
मात्र पार्टनर बाबत पाहिलेला आणि ट्रेलर मधून दिसणारा आणि गाण्यांची रंगत आणि त्याचे चित्रिकरण पाहता तो कादंबरीसारखा नव्हे तर वाचकांच्या मनात कादंबरी वाचताना ती जशी भावेल असा चित्रपट असावा याची खात्री पटते..कारण तो काळ आता नाही हे नक्की पण संवादाचे आणि त्या परिस्थीतीचे भान लेखकाला आणि पटकथा लिहिताना समिर सुर्वे यांना असावे असे दिसते.
इथे कुठलाही चेहरा फारसा ओळखीचा नाही. कारण विविध शहरात जाऊन कलाकारांच्या मुलाखतीमधून ही कलावंताची फौज उभी राहिली आहे.त्यात नवखेपणा असेल पण पण जिवंतपणा नक्कीच दिसेल. 

पार्टनरची भूमिका सतीश पुळेकर या अतिशय कसदार अभिनय करणा-या वेगळ्या धाटणीने आपली करियर करणा-या ज्येष्ठ अभिनेत्याने केली आहे. आईच्या भुमिकेसाठी लालान सारंग ह्या ब-याच काळाने चित्रपटात ठसा उमटवित आहे...मात्र श्री (पद्मनाथ विंड) पासून त्याच्या पत्नि आणि प्रेयसीच्या भूमिकेसाठी (श्वेता पगार) या नविन चेह-याची ओळख रसिकांना होणार आहे.

चित्रपट करायला होकार देणा-या बापूंच्या कन्य़ा स्वाती चांदोरकरांनी चित्रपटाबाबत अतिशय चांगले मत व्यक्त केले आहे. आज बापू असते तर त्यांनाही तो आवडला असता, असे त्यांच्या तोंडून येते. त्या चित्रपटाच्या प्रचारासाठी गावोगावी जातात. 

चित्रपट करण्याआधी १४ वेळा परत परत यावर विचार करुन त्याचे स्क्रिप्ट समीरने पुन्हा पुन्हा लिहले. विविध लोकांना विचारुन हा विषय कसा रुचेल यासाठी त्याचा सर्व्हेही केला.

यातले संगीत हा एक महात्वाची भुमिका वठवतोय. अश्विनी शेंडे यांच्या गीतांना निलेश मोहरीर या संगीतकाराने चित्रपटात ते विश्व उभे केले आहे. त्यात मधुरता तर आहेच पण भारतीय परंपरेचे विशेषतः शास्त्रीय संगीतातल्या रागांवर आधारित गाणी वेगळी वाटतात.


आता २४ ला पाहूया या श्री पार्टनरला रसिक कसे स्विकारतात ते.सुभाष इनामदार,पुणे
 subhashinamdar@gmail.com
9552596276