subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, February 10, 2016

पोएट सुधीर मोघे साठला आहे रसिकांच्या ह्दयात


सोमवारी पुणेकरांनी दोन कार्यक्रमातून कवीराज सुधीर मोघे यांची स्मृती जागविली.. एक टिळक स्मारक मंदिरात डॉ. सलील कुलकर्णी आणि शुभंकर कुलकर्णी या पिता-पुत्रांनी टिळक स्मारक मंदिरात.....
....तर पुणेकर कलावंताला दूरदर्शनवरून थेट बोलते..करणारे निर्माते अरुण काकतकरांनी सुधीर मोघे यांच्या पंधरा कवीता..गीतांची पार्श्वभूमी सांगणारी आणि जिवनाबद्दलच्या जाणावांचे आणि आपण गेल्यानंतर काय उरावे यांची आपल्या कवीतेमधून सांगितलेली आठवण पुन्हा एकदा रसिकांसमोर ठेऊन मनोहर मंगल कार्यालयात अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या केल्या..
संस्कृती प्रतिष्ठानच्या शिरीष बोधनी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरवात मानसी मागिकर यांच्या प्रास्तावीकाने झाली..तर पुढे सलग तेरा आठवणीतून स्वतः सुधीर मोघे आपल्या आयुष्यातल्या विविध टप्प्यावर भेटलेले संगीतकार, निर्माते यांच्याशी कवीतांबाबात झालेल्या चर्चेतून चित्रपटातली गीते कशी कागदावर उतरत गेली याचे वर्णन सांगणारी मालीकाच रसिकांसमोर येत गेली..
अरूण काकतकरांनी सुधीर मोघे यांना बोलते केले..आणि तो बोलवीता धनी आपले मनोगत रसाळ वाणीत सांगत गेला..
इथे पोएट सुधीर मोघे बालते झाले..

बोलताना कांही ठिकाणी थांबून त्यांची गाणी विशेषतः राम फाटक यांनी संगीत दिलेले भावगीत सखी मंद झाल्या तारका आपले गुरू पं. भीमसेन जोशी यांनी कसे गायले..आणि ते सांगताना दोघांचे मोठेपण.. भीमसेन जाशी आणि सुधीर फडके यांचीही आठवण सांगून  उपेंद्र भट यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला.
हे नायका जगदीश्वरा ..ही नांदीही भट यांनी सादर केली..

गुरु एक जगी त्राता..हे गीत प्रमोद रानडे यांनी सादर केले..



आदिती देशमुख यांनी ..झुलते बाई रास झुला..आणि उत्कर्षा शहाणे यांनी ..एकाच या जन्मी जणू फिरूनी जणू जन्मेन मी..आणि... सांज ये गोकुळी गाऊन सुधीर मोघे यांच्या ओघवत्या शेलीची आठवण करून दिली.





या कार्यक्रमाचे वर्णन कवी सुधीर मोघे यांच्याच शब्दात सांगण्याचा मोह होतो..

क्षण जगून झालेले
जुन्या पानात जपावे
डोळ्यातील पाण्यानेच
नवे पान उलटाले..

अरूण काकतकरांनी हा अनुभव दिला..त्याबद्दल त्यांचे मनासापून ऋण...
पोएट सुधार मोघे..तुम्हाला आठवताना खूप कांही सोसावं लागते..
तुम्ही जपलेल्या आठवांना इथं.
स्मृतीत भरभरून सांभाळावं लागतं..




-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276