इन्शाअल्ला
सत्यदेव दुबे एक अफलातून नाटकासाठी जगलेला माणूस..मी तो माणूस आज ख-या अर्थाने
अनुभवला..पुरेपुर..सुशिल इनामदार यांच्या अभिनयातून..दुबे वावरले..बोलके
झाले..काही गोष्टी नव्याने समजल्या..काही अंगावर आल्या,,, पुण्याच्या भरत नाट्य मंदिरातला २७ डिसेंबरच्या संध्याकाळी झालेला हा प्रयोग मला न कळत माझ्यावर परिणाम करुन गेला..तो असा..
पण जे उमजले ते हे ..त्यामाणसाने स्वतःला कधीही विकले नाही..आपल्या मस्तीत
जगले..रमले..इतरांना रमविले..जे आले त्यांना घेऊन..जे गेले त्यांना शुभेच्छा
देऊन..नाट्ययज्ञ त्यांनी जसा मांडला तो आविष्कार चेतन दातार यांचाया लेखनातून उलगडत गेला..
पहिल्या अंकातील भावभावनांचा आणि
प्रसंगांचा प्रायोगिक नाटकांचा त्यांचा अभ्यास एकेका प्रसंगातून दिसत गेला..ती
उत्कत प्रतिभा जर प्रेक्षकांमनध्ये नसली तर तायंना ते कळणार नाही..काय हे नाटकवाले
करताहेत असा बोल लागले..म्हणूनच काही गाष्टी अॅबसर्ड वाटल्या ..त्या कळत नकळत डोक्यावरुन गेल्या..पण दुसरा अंक दुबेंचे
खरं जीवन उलगडणा-या होत्य़ा....तिथे फक्त दुबे होते..दुबे यांच्या मनातली ती नाटकाविषयी
कलेविषयीची ओढ किती खोलवर रुजली होती याचे हे प्रतिबिब पूर्णपणे इथे प्रतित होत होते...नटांनी विषेषतः सुशिल इनमामदार यांनी तो
सर्वेश्वर फारच ताकदिने होत गेला..इथे एकसुरी होण्याची संधी होती..पण त्यांनी तो
बोली आमि शारीरीक अभिनयाच्या छटातून असे काही स्वतःला बोहर काढले की त्यांच्यातला
नट सतत खुणावत रहातो..नटाची शैली..त्याची ताकद आणि सभोवताल घेऱून ठेवण्याची
त्यांची भाषा...केवळ अप्रतिम...
नाटक झाल्यावर दुसरा अंक माझ्या सौ.ला फारच आवडला..त्यातल्या सुशिल
इनामदारांच्या कामावर तर त्या बेहद्द खुष झाल्य़ा...मना त्यांनी केलेले काम पाहता नटसम्राट
आठवला..असे म्हटले..मला ते अदिक जास्त मोलाचे वाटले.
अजित भगत यांनी ते फारच अंगावर येईल इतके उत्कटपणे कलावंतांच्या माध्यमातून
साकारले..
चिन्मय-निनाद यांनी दिलेली संगीताची भाषा नाटकाला अधिक बोलती करुन गेली..खरं म्हणजे
ज्यांनी दुबे पाहिले नाहीत त्यांना दुबेंचे विलक्षण झपाटलेपण कळेल...त्यांनी अंतीम
क्षणापर्यंत सोबत केली..पण तो क्षण ते स्वतः अधुरेपण सतत आपल्याजवळ ठेवत..नाटकात
म्हटल्याप्रमाणे चारआणे आपल्या मुठीतून सुटून दिले नाहीत. ते नाणे त्यांनी घट्टपणे
आपल्याजवळ सांभाळले..ते आपल्याबरोबरच इन्शाअल्ला..करत स्वतः बरोबरच घेऊन गेले..
त्यांच्या स्त्री अभिनेत्रींच्या कथा इथे दिसतात..काही वेळा त्यांचे बिनधास्त
बोलही ऐकावे लागतात..पण त्यांच्या मनस्वी स्वभावाला सारे काही चिकटून आले आहे..
सतत नाटक..नाटकाविषयक...आणि शेवटी तर सुदाम्याच्या तोंडून त्या कृष्ण लिला
ज्या उत्कटतेने सादर झाल्या..तिथे ते सारे खोटेपण जळून गेले..उरले ते खरं..अस्स्ल
खणखणीत नाणे..ज्यांने अनेक शिष्य घडविले..नाट्यचळवळ उभारली..रंगभूमिवर काळ्या
पडद्यावर सफेद जग उभे केले...इथेही त्याचे दर्शन सुशील इनामदार यांच्या परिपूर्ण
वाचिक, आंगिक
आणि उत्तम अभिनयातून घडले..
सर्वेश्वर सोबत देवेंदर- गौतम बेडं आणि गुलन- मृणाल वरणकर यांच्या भूमिकांची
दाद द्यावीशी वाटते..मोनिलिसा विश्वास, संजाना हिदुपूर,सुदेश बारलिंगे या नटांच्या भूमिकाही उत्तम
बळ देऊन नाटकात प्राण ओतीत गेल्या..
मला व्यक्तिशः देवेंद्रर मध्ये अच्युत पोतदार आणि सर्वेश्वरमध्ये विजय केंकरे
यांच्या व्य़क्तिमत्वाची झलक दिसली..ज्या उत्कटतेने आणि प्रामाणिकपणे आविष्कारने ही
कलाकृती घडविली यात सत्यदेव दुबेंसारखा नाट्यअभ्यासक अधिक ठळकपणे समोर
दिसला..नाटकाविषयीची अत्यतिक ओढ आणि आवड...हिच त्यांची वैयक्तिक ओळख होती..ती इथे
जपली गेली..
मला व्य़क्तिशः सत्यदेव दुबे दिसले..भासले..अंगावर आले..अगदी त्यांच्या
गुण-दोषांसह..रंगभूमीसाठी
जगणरा हा वेडा माणूस...त्यांच्या स्मृतीला खरंच इथे आकार मिळाला आहे...पुढच्या पिढीला अगदी ज्याने दुबे पाहिले नाहीत..त्यांना तो
माणूस आणि त्यांत असलेला नाट्यवेडाने झपाटलेला माणूस स्पष्ट दिसेल.
या नाटकाला रसिकांची हजेरी वाढली...एका वेड्या नाट्यजीवनाची कहाणी अधिक लोकांपर्य़त
पोहोचली तर ही आविष्कारच्या अरुण काकडे यांनी केलेली तळमळ सार्थकी लागेल..ज्यांना कुणाला शक्य असेल
त्यांनी हा प्रयोग जिथे असेल तिथे पहावा एवढीच विनंती.
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276