subhash inamdar

subhash inamdar

Friday, July 4, 2014

दोन आवाजात गौतम मुर्डेश्वरांची कसरत




दोन वेगवेगळ्या जातीचे आवाज एकाच गायकाच्या गळ्यातून निघत होते...खरी तर ती तारेवरची कसरत होती..हा पहिला प्रयत्न होता..पण खरचं ही खूप शिकण्यासारखी गोष्ट होती...एक मुलायम, पातळ आणि तेवढाच भावनाशील आवाज..तो तलत महमूद यांचा....एका परड्यात..तर दुसरा काहीसा कंप पावणारा पण शास्त्रीय संगीताचा अभ्यास असलेला कसदार फिरत असलेला मन्ना डे यांचा जोरकस दमदार आवाज...

गुरुवारी ३ जुलैला २०१४ला यशवंतराव चतव्हाण नाट्यगृहात `तमन्ना` हा कार्यक्रम सादर होत असताना...दोनही आवाजात एकच गायक नट गौतम मुर्डेश्वरची हा कसरत सुरु होती...पण कुठेतरी ही दोन्ही वेगळ्या आवाजाची जादू ..आणि त्यातही प्रत्येकाची वेगळी गाण्यातही तयारी..त्यावरची मेहनत घेऊन..नायकाच्या तोंडीची ती चमकदार तेजी...एकाला न्याय द्यायला जावे..तर दुस-यावर थोडी माया अधिक लागते...


दोन भिन्न गायकांच्या आवाजातले वेगळेपण जर वेगवेगळ्या कार्यक्रमात सादर झाले असते..तर त्यात अधिक रमता आले असते...असा एक रसिक म्हणून मला वाटलेला हा अभिप्राय इथे द्यावासा वाटतो..म्हणूनच तमन्ना...खर तर रसिकांनी उटलून धरला..गौतम मुर्डेश्वर यांचे हिंदी..उर्दुचे उच्चारणही सदोष..पण तरीही  एकेकाची एकेक कारकीर्द मांडली असती तर आवाजाची धाटणीही अधिक बोलकी आणि पुरेपूर गळ्यातून काढताना गाणीही तेवढीच अंर्तमनात अधिक उतरून गेली असती.. श्रुती करंदीकरांनी गीतातली नायिकेच्या आवाजाची जागा आपल्या तरल आवाजाने भारुन टाकली..
काही गाण्यात तर वादक अधिक प्रभावी ठरले..त्यांच्या हुकमतीवर तर सारे गाणे तोलले गेल्य़ाचे स्पष्ट दिसले...खरी तर ही एका जादुमयी काळाची सफर होती..पण हे पारडे एकसारखे खालीवर होत होते...

झनक झनक पासून सुरवात होऊन..मध्यतरापर्य़ंत..वक्तच्या ए मेरी जोहरी जबी..पर्य़ंत..आणि नंतर प्यार हुआ..एकरार हुआ..राजकपूरच्या बरसात मधल्या गाण्याने सुरवात होऊन..लागा चुनरीने दाग पर्यतची लयकारीदार पेशकश..सुरांच्या संगतीत अधिकाधिक रंगत गेली...रसिकांच्या वन्समोअरच्या प्रतिसादाला न जुमानता..सरस गीतांचा हा नजराणा इथे सादर झाला..

रवींद्र खरे यांच्या मराठी निवेदनातून तो काळ समोर उभा रहात गेला..त्यातून गायकांची मेहनत आणि संगीतकारांचे कौशल्य प्रकर्षाने दिसत गेले..शब्दातून ते मोठेपण उमगत गेले आणि त्यामागच्या सुरावटींनी आणि गायकांच्या सूरांनी रसिकांची मने तृप्ततेकडे झेपावत गेली.

तलत महमूद यांच्या 'जलते हैं जिसके दिये., रिमझिम तेरे प्यारे प्यारे गीत लिए., दो दिल धडक रहे हैं., फिर वोही शाम.' तस्वीर बनाता हॅं..अशा मनाला मोहून टाकणार्‍या गीतांनी सांज रंगली.

तर कौन आया मरे मनके व्दारे, कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं.,पासून मन्ना डे यांची गाणी थेट –हदयसंवाद करु लागली..ते अखेरच्या शास्त्रीय संगीतावर आधारीत असा लागी चुनरीमे दाग ने तर सुंदर असा स्वरमेळ साधला..एकेक गाण्यांची तयारी अतिशय मेहनतीने करुन हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद गायकाच्या आवाजात होती...ती त्यांनी पुरेपूर सार्थ केली...



विवेक परांजपे यांनी सा-या संगीत संयोजनाचा डोलारा आपल्य़ा खांद्यावर समर्थपणे सांभाळला..गीतातला स्वरमेळ आणि मधल्या सूरावटींच्या बोलक्या जागा अचूक जीवंत केल्या..त्यांना सिंथेसायझवर साथ केली ती केदार परांजपे यांनी..तर रिदम मशिनवर अभय इंगळे..आणि तबल्यावर थाप दिली ती अपूर्व द्रवीड यांनी..तर हार्मोनियमची संगत केली ती कुमार करंदीकर यांनी...एकूणच संगीत साथीदारांनी गाण्याची लय आणि गाण्याचा आवाका सारेच उत्तमपणे सादर करून रसिकांवर मोहनी पाडली..


स्वर-संवेदनाच्या या पहिल्या उपक्रमाला रसिकांचा प्रतिसाद पुढल्या कार्यक्रमाची वाट पहाणारा होता..गुरू शशिकला शिरगोपीकर, नंदा गोखले ( पं शरद गोखले यांच्या गायक पत्नी) आणि ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची उपस्थितीही कलावंतांना स्फूर्ती देऊन गेली.या निमित्ताने गौमत मुर्डेश्वर यांची अनेक दिवसांच्या तपस्येची..त्यांच्यातल्या सुरेल सादरीकरणातली भारदस्त तमन्ना पुरी झाली याचा विशेष आनंद वाटतो..




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276