subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, October 4, 2017

`मत्स्यगंधा'ला लाभला तरूण कलावंताचा कस्तुरीगंध






संपदा जोगळेकर-कुलकर्णी,नचिकेत लेले,केतकी चैतन्य आणि राहूल मेहेंदळे यांनी संधीचे सोने केले



सोशल मिडीयाच्या माध्यमातून महाराष्ट्र, गोवा आणि गुजराथमधील दीडशेहून गायकांच्या मधून नचिकेत लेले आणि केतकी चैत्यन या तयारीच्या कलावंतांची अंतिम निवड करून..संपदा जागळेकर कुलकर्णी आणि संगीत मार्गदर्शक पं. रामदास कामत यांनी घालून दिलेल्या मार्गावर पावले टाकत त्रेपन्न वर्षांनी 

 संगीत `मत्स्यगंधा' 
हे वसंत कानेटकरांचे नाटक रंगमंचावर अवतरले.. 

नाटकाने अनेक कलावंतांना एकत्र करून त्यांच्या कलेला संधी दिली..आणि पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात पाहिलेल्या नाटकात त्याचे लखलखीत सोने केल्याची जाणीव पुरती मनोमनी पटली.


धी गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग आणि नाट्यसंपदा कला मंच यांनी संयुक्तपणे पुन्हा रंगमंचावर आणलेले नाटक त्याच आत्मविश्वासाने  रसिकांनी स्विकारले आहे. पदांना मिळणारा वन्समोअरची दाद आणि भिष्मकाच्या संवादाला मिळणारी दाद..सारे काही सांगून जाते.
आपल्या धारदार आणि पल्लेदार संवादानी नटलेले हे महाभारतकालीन युगाची आठवण देणारे नाटक..आणि सत्यवतीला आपल्या नादी लावणारा तो पराशर ऋषी पुरषी अहंकारात आपले वचन विसरतो..आणि हिमालयाचा साधक बनून त्या स्त्रीला कसा सोडून देतो...एकूणच पुरूष अबला असलेल्या सौंदर्य़वतीला मोहात पाडतो..तिच्याशी संबंध ठेवतो..आणि वेळ आली की तिला विसरून निघून जातो..
पण एक महापुरूष असाही असतो..तो आपले राजपद सोडून आपल्या वडिलांसाठी नव्या आईला दिलेला शब्द वचन समजून आपली प्रतिज्ञा अखेरपर्य़त पाळतो..दिलेल्या शब्दासाठी आपले मरणही स्विकारतो..

दोन मानवी शक्तिचे दर्शन घडविणारी ही महाभारतातली पराशर आणि सत्यवतीची ही कथा...आणि शब्दाला जागाणारा तो भीष्म ..या तिन प्रमुख पात्रांवर आधारित हे नाटक कानेटकरांनी अभ्यासपूर्ण उभे केले..त्यातल्या गीतांना पं. जितेंद्र अभिषेकी यांनी दिलेल्या चाली आजही रसिकांच्या मनात रुजल्या आहेत याची प्रतिची नाटक पहाताना त्यापदांना मिळणारी दाद यातून कळते..


संपदा जोगळेकर कुलकर्णींना मुजरा

अनंत वसंत पणशीकर यांनी आपल्या नाट्यसंपदेच्या कला मंचच्या वतिने शब्दांची जाण असणारी आणि रंगमंच भारून कसा जाईल याचा अभ्यास असलेली कसदार अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी हिच्या कल्पनेतून साकारलेल्या या नाटकाच्या रंगावृतीला मान्यता देऊन त्यांच्याच दिग्दर्शनाखाली दोन अडिच महिन्यांची बारा तासांची तालीम घेऊऩ ही मत्स्यगंधा ..देखण्या आणि आकर्षक पध्दतीने रंगमंचावर आणली. संपदा जोगळेकर कुलकर्णी यांच्या हातून एक उत्तम कलाकृती रंगमंचावर अवतार घेते यात शंका नाही..त्याच्या कर्तुत्वाला सलाम.

अवघा रंग एकची झाला..या नंतर नाटक जुने असूनही जुन्या परंपरा जपत ही संगीत रंगभूमिची परंपरा लखलखीतपणे पुन्हा उभी राहिली ती या मत्स्यगंधाच्या रुपाने. यासाठी अनंत वसंत पणशीकर यांना रसिकांनी धन्यवाद दिले पाहिजेत.

नेपथ्यासाठी विविध कलामहाविद्यालयाचे विर्द्यार्थी बरोबर घेतले .विकास गावकर यांच्या नेतृत्वाखाली नवा सेट घडविला.. अशाक पत्की यांच्याकडून उत्तम पार्श्वसंगीत तयार करून घेतले..शितल तळपदे यांनी प्रकाशयोजनेवर भर दिला..
सकाळी रामदास कामत यांनी केतकी चेतऩ्य आणि नचिकेत लेले यांच्याकडून पदांतील सहजता स्वरातून कशी येईल याक़डे कटाक्षाने पाहिले.. मकरंद कुंडले आणि केदार भागवत यांच्या साथीने त्या लोकप्रिय पदाची रंगत वाढविली.
संगीत नाटकाला उत्तम साज चढविला. व्यावसायिक परिपक्वता येण्यासाठी सारे काही निर्माण केले..नविन कलावंतांना पुरेसा वेळ दिला..नाटकाची भाषा तोंडात घोळविली . मग त्यांची सोशल मिडीयांतून माहिती देऊन..त्यांची टिमकी मिरवत जाहिरात करून नाटक रंगभूमिवर आणले.
नाटकाचे सरळ सरळ दोन भाग पडतात..एक सत्यवती आणि पारशराचा अधिक सहभाग असलेला पहिला अंक आणि आपल्या वचनाला जागत भिष्मकाने उभारलेले मानवी मुल्यांवर विचार करायला लावणारा दुसरा अंक..
काळा प्रमाणे बदल करत नाटकाची मर्यादा तीन तास केली . काही गोष्टी ध्वनीमुद्रित संवादातून निवेदन करून स्पष्ट केल्या.. पडद्यामागे काही प्रसंग दाखवून काम भागविले.


नचिकेत लेले
 
आजही पहिल्यांदा रंगमंचावर अवतरणारा पराशर म्हणजे निचिकेत लेले जेव्हा टाळ्या घेतो..तेव्हाच नाटकाची निर्मिती आणि त्यातल्या कालवंताची निवड किती योग्य आहे याची रसिक पावती देतात असे वाटते..नचिकेतच्या देवाघरचे ज्ञात कुणाला तर पुन्हा एकदाचा गजर झाला..बालगंधर्वात या नाटकाला शिट्ट्याही मिळाल्या.
केवळ नाटकातली पदे उत्तम सादर करून नट बनू शकत नाही..त्यासाठी हवी अभिनयाची जाणीव..ती पुरेपुर तयारी संपदाने करून घेतल्याने..निचिकेत मध्ये पराशराचा विश्वास आलेला अनुभवता आला..गुंतता ह्दय हे, आणि साद देती हिमशिखरा ही पदे त्यांने प्रेक्षकांकडे बघून उत्तम रंगविली.. इतका उमदा तरुण मराठी कलावंत यामुळे मराठी संगीत रंगभूमीला सापडला..त्याला कायम रंगमंचावर या ना त्या नाटकातच गुंतून ठेवायला हवे..



केतकी चैतन्य
पण जी दिसली छान.. भूमिकेची ताकद ओळखून सत्यवतीला नटविले. आपल्या अभिनयाने नटविले ते केतकी चैतन्य या मूळच्या राजापूरच्या तरूण गायक अभिनेत्रीने. . तिने आपल्या लोभसवाण्या चेहरेपट्टीतून घडविलेली सत्यवती किती सहज काम करते आणि रसिकांच्या ह्दयात कशी पाहोचते ते पाहण्यासाठी तरुण मंडळींनी आणि संगीत नाटक पाहणारे सारे रसिक नाट्यगहापर्यंत यावेत ही अपेक्षा आहे..
 सहज संवाद फेक आणि कसदार गायनाची फवारणी करून तिने रसिकांना मोहित केले.. तिच्या गायनात गोडवा आहे.तिचा चेहराही बोलतो तो डोळ्यातून .  अंगीक आणि वाचिक अभिनयाबरोबरच तिचे स्वरही पदांना डुलवत होते.. अर्थशून्य भासे हा कलह जीवनाचा हे पद तर तिच्या अस्सल गायनाची साक्ष देते.  तिने संगीत नाटके अशीच करत रहाणे ही काळाची गरज आहे.
राहूल मेहेंदळेची कमाल
इतर सारेच कलावंत नाटक खेळतात. अगदी नेटकेपणाने... नाटकाचा तोल कायम ठेवतातकौतूक करण्यासारखे काम  राहूल मेहेंदळे  याने केले..तौ शोभून दिसला देवव्रत म्हणून आणि भिष्म म्हणूनही..त्यांने नाटकाला गांभीर्य दिले..कानेटकरांनी लिहलेली कोरून ठेवलेली वाक्ये त्यांने ज्या लिलया सादर केली..त्याला खरच दाद द्यायला हवी..
नाटकाचा दुसरा अंक केवळ भीष्माचा.. आणि  काही प्रमाणात अंबाचा आहे..बाकी पात्रे गौण वाटतात..पण जीवनात आपल्या शब्दाशी प्रामाणिक राहून आपले मरणही हवाली करणारा हा भीष्म रसिकहो तुम्ही पहाच. जरूर.

अंबेचा तोरा...तिचे अंबेपण  तिचा संताप..सारेच  आणि आपल्यावर अन्याय केलेल्या भिष्माशी तिने केलेला समाना पहाताना..पूजा राईबागीची अभिनयातली ताकद लक्षात येते..तिच्या जोरकस अभिनयाने तिने भूमिकेचा डौल उभा केला.

अमोल कुलकर्णी यांनी चंडोल बनून प्रेक्षकांना झुलवीत ठेवले..नाटकात चेतना निर्माण केली.



तर धिवर बनलेले संजीव तांडेल याची तळमळ आणि तगमग पुरेशी बोलकी होती. शशी गंगावणे यांचा प्रियदर्शनही उठून दिसतो..
करिश्मा नानावटी यांच्या वेशभुषेतून साकारलेली ही नाटकातली पात्रे वैविध्य अशा वेशभुषेने शोभून दिसली.. देवव्रताचे राजेपण आणि भिष्मकाचा राजसत्ता गेल्यानंतरचा गेटअप आणि सत्यवतीची धीवर कन्या आधीच्या अंकात आणि नंतरची  काळ उलटून निष्प्रभ झालेली माता सत्यवती..दोन्ही चेहरे वेगळेपणाने खुलून दिसत होते..ते रंगभूषेच्या माध्यमाने..
धी गोवा हिंदू असोशिएशन निर्मित आणि नाट्यसंपदा कलामंच प्रकाशित संगीत मत्स्यगंधा हे नाटक म्हणजे संगीत रंगभूमिला तरूण कलावंतांनी दिलेली उत्तम देणगीच आहे.


यातला खरा नायक आहे..तो यातले संगीत..ते पं. जितेंद्र अभिषेकीबुवांचे.. 






तर नाटकाचे लेखक प्रा. वसंत कानेटकर..त्यांची भाषा करारी..काळाला ओळखणारी आणि माणसातला मी पण हलविणारी..या दोन्ही तपस्वींना अभिवादन.








नाटकाची ताकद आणि  संगीत नाटकाला पुन्हा अवतार घ्यायला लावणारे सारेच कलावंत, सहकारी त्यासाठी कौतुकास  पात्र आहेत.
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276