स्वरबहार आणि सांस्कृतिक पुणे च्या वतीने ज्येष्ठ व्हायोलीनवादक पं. भालचंद्र देव
यांच्या सहस्त्रचंद्रदर्शना निमित्ताने
शनिवारी, ३ डिसेंबरला सायंकाळी साडेपाचला
नवी पेठेतल्या निवारा सभागृहात
सत्कार आणि संगीताची मैफल आयोजित केली आहे.
गानवर्धनचे स्स्थापक, अध्यक्ष श्री. कृ.ग.धर्माधिकारी यांच्या हस्ते
पं. भालचंद्र दामोदर देव यांचा सत्कार केला जाणार आहे.
यात आनंद देशमुख, चित्तरंजन देव यांचा सहभाग असेल.
कार्यक्रमात सौ.मधुरा गोसावी-तळेगावकर,
सौ.चारुशीला गोसावी तसेच स्वतः पं. भालचंद्र दामोदर देव
यांच्या व्हायोलीन वादनाचा आस्वाद रसिकांना घेता येईल.
तबला साथ रविराज गोसावी यांची असून राजय गोसावी निवेदन करणार आहेत.
हा कार्यक्रम सर्व रसिकांना विनामूल्य खुला आहे.
आपला,
सुभाष इनामदार.
सांकृतिक पुणे करिता
http://culturalpune.blogspot.in/
subhashinamdar@gmail.com
9552596276