subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, April 16, 2014

देणे देवगंधर्वांचे..

या आहेत देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांच्या नात सून..सौ. शैला दातार..बुवांच्या सा-या आठवणीतून त्यांनी देवगंधर्व सारखा एक ग्रंथ लिहिला आणि त्या सा-या शास्त्रीय संगीतांच्या अभ्यासकांना एक गायकीचा इतिहास उपलब्ध करुन दिला.
गेल्या रविवारी म्हणजे १३ एप्रिल ला भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेल्या भारत गायन समाजात बुवांच्या मूळ चीजा गाऊन त्यातून नाथ हा माझा हे स्वयंवर मधले पद कसे साकारले ते सोदाहरण सादर करुन दाखवित आहेत..

देणे देवगंधर्वांचे हा कार्यक्रम ऐकणारा हा श्रोतृवर्ग..शनिपारच्या समाजाच्या सभागृहात या थोर संगाताचार्यांची अभ्यासपूर्ण माहिती ऐकताना सारे सभागृह गच्च भरले होते..वारंवार पुढे सरका म्हणजे इतरांना कार्यक्रम ऐकता येईल असी विनंती निवेदक अरुण नूलकर यांना करावी लागत होती..


 


चहूबाजुला असलेल्या गायकांच्या तसबीरीच्या संगतीने मैफलीतील सारे श्रोते मनोभावे ह्या कार्यक्रमाचा आनंद घेत होते.











पं. भास्करबूवा बखले यांनी दिलेल्या अनेक चाली या विविध रागातल्या बंदीशीवरुन घेतल्या आहेत..त्या मूळ बंदिशींची आणि त्या पदांची रचना तेवढ्याच तयारीने शील्पा पुणतांबेकर आणि सावनी कुलकर्णी या सादर करीत होत्या तेव्हा दादही तेवढीच उत्स्फूर्त मिळत होती.. शैला दातार यांनी आपली कन्या शिल्पा आणि  दिरांची कन्या सावनी यांचेकडून मेहनतीने पदांना आणि बंदिशींना आकार दिला..त्यातूनच देवगंधर्व..इथे उमगले..दोघीही कलावंतांनी आपल्या सादरीकरणातून अभ्यासपूर्ण गायकीचे दर्शन घडविले.










 सावनी कुलकर्णी यांनीही सुहास दातार यांच्याकडून भास्करबुवांचे गाणं किती तयारीने आपल्या गळ्यातून मांडले यांचे उदाहरणच इथे दिसत होते..
दोघांनाही तबल्याची साथ समीर पुणतांबेकर आणि राहूल गोळे यांनी ऑर्गनवर तेवढीच समर्पक दिली..
शैला दातार यांच्या गायनाला प्रसाद जोशी  जे संगीत नाटकाला साथ करतात त्यांनी सुयोग्य तबला संगत करुन पदांना आणि बंदिशींना अधिकाधिक नटविले हे मान्यच करायला हवे..


भास्करबुवांच्या तेजस्वी, बुध्दीप्रधान आणि ओजस्वी  परंपरेचे दर्शन घडविले..यातून आणि अरुण नूलकर ..तसेच शैला दातार यांनी आपल्या निवेदनातून त्यांनी कसे संगीताचे शिक्षण घेतले..आणि...गायनाचार्य म्हणून नाव मिळवितानाच संगीत नाटकात पदातून बालगंधर्वांसारख्या नटांना स्वतःची ओळख मिळवून दिली...सारे काही रसिकांपर्य़त पोहोचले.
भारत गायन समाज शास्त्रीय संगीताला पारंपारिक अभ्यासाची जोड देऊन नवे कलावंत घडविण्याचे कार्य गेली १०० वर्ष करते आहे..ती परंपरा आहे ती या पं. भास्करबुवा बखले यांच्या या लयदार परंपरेची आणि त्यांच्या
कसदार सांस्कृतिची देन आहे..
  

- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276