subhash inamdar

subhash inamdar

Sunday, July 14, 2013

नाटकावरुन चित्रपट...`श्रीमंत दामोदरपंत`

पुन्हा एकदा नाटकावरुन चित्रपट तयार करुन केदार शिंदे चित्ररसिकांना वेगळ्याच अनुभूतीची करामत पडद्यावर दाखविणार आहे.


१९९८ साली `श्रीमंत दामोदरपंत` हे नाटक गाजले ते वेगळ्याच पध्दतीने..त्याच्या सीडीची प्रचंड विक्री झाली. केदारच्या यानाटकाच्या सीडी भराभर घरोघरी दिसायला लागल्या ..नाटकानेही लेकप्रियतेचे नवे उच्चांक प्रस्थापित केले. ...आता मात्र केदार शिंदे यांनी ओंकार मंगेश दत्त यांच्याकड़ून आपल्या या नाटकाचे विस्तारलेले रुप आकारात आणत पुन्हा एकदा नाटक विसरुन याचा चित्रपट तयार केला आहे. श्रीमंत दामोदरपंत या मूळ नाटकात भरतने दामू ही मध्यवर्ती भूमिका केली होती. अर्थातच केदारचा चित्रपट म्हटला की सुपरस्टार भरत जाधवची भूमिका असायलाच हवी. या चित्रपटातही भरत जाधवच नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.   
 'श्रीमंत दामोदरपंत' या चित्रपटाच्या निमित्ताने काही योगही जुलून आले आहेत. सुनील बर्वे हा अभिनेता आणि केदार शिंदे हा दिग्दर्शक असे दोघे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत. कॉमेडीक्वीन निर्मिती सावंत हिचा मुलगा अभिनय सावंत या चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर पदार्पण करतोय. छोटा पडदा गाजवताना लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि दिग्दर्शक केदार शिंदे प्रथमच एकत्र आले आहेत. सोनू निगमच्या आवाजातले आणि वैशाली सामंत हिने संगीत दिलेले एक गाणे यात आहे आणि ते त्याच्या खास स्टाईलमधले असल्याने नक्कीच लोकप्रिय ठरेल यात शंका नाही.

अतिशय गंभीरपणे हा चित्रपट तयार केला आहे..मला खात्री आहे..ज्यांनी नाटक पाहिले आहे आणि ज्यांनी पाहिले नाही अशा सा-यांना श्रीमंत दामोदरपंत नक्की आनंद देईल...यात कोणताही उपदेश वा काही सांगण्याचा प्रयत्न केला नाही..केवळ अनेक समस्यांनी ग्रासलेल्या मध्यमवर्गींयांन दोन तास करमणूक देणे एवढाच उद्देश ठेऊन चित्रपट बनविल्याचे  केदार शिंदे सांगतात.
नाटकात रंगभूमीच्या मर्यादामुळे दामोदरपंतांच्या वाडयात हे सगळे नाट्य घडते. हे पंत म्हणजे एक काळ गाजवलेले आणि हयात नसलेले स्वातंत्र्यसैनिक असतात, मात्र रोज संध्याकाळी सहा वाजता ते दामूच्या अंगात संचारतात. एरव्ही व्यवस्थित असलेल्या दामूचे नकळत रूप बदलते. दिवसभर आईच्या पदराआड़ असलेला दामू संध्याकाळचे सहा वाजले की रुद्रावतार धारण करतो त्यामुळे सगळ्याचीच पंचाईत होते असा नाटकातला संदर्भ आहे, मात्र या चित्रपटात दामू वाड्याच्या बाहेर कोठेही असताना असे घडते त्यामुळे तो तेथून घरी पोहोचेपर्यंतच्या असंख्य धम्माल गंमती असलेले प्रसंग घडायला लागतात,हीच या चित्रपटाची रंगत असल्याने त्यातूनच हे सारे नाट्य खास केदार शिंदे स्टाइलने रुपेरी पडद्यावर फुलत जाते.


माहेरची साडी...सारख्या हमखास स्त्रीयांच्या डोळ्यातून अश्रू काढणा-या भावनाशिल चित्रपटांची नायिका म्हणून ...अलका कुबल ....यांची प्रतिमा बदलण्याचे काम या चित्रपटाने केले आहे..त्या सुध्दा या चित्रपटातून आपल्या नव्या भूमिकेचा रसिक कसा आस्वाद घेत आहात हे पाहण्यासाठी  उत्सुक आहेत.
याचे सारे श्रेय त्या केदार शिंदे यांना देतात..त्यांच्या दिग्दर्शनाचे कौतूकही करतात..आणि सांगातात.....`केदार शिंदे यांना टायमिंग सेन्स आणि बिटवीन द लाईन्स वाचायची खूप चांगला समज आहे. त्यांच्यातला मास्तर ते नेमके अचूक हेरतो..`

रंगमंचावर जे शक्य होत नाही ते अशा सिनेमातून दाखविता येतं...आणि काळानुरुप बदल करून ती कलाकृती सादर करता येते..केदार याबाबतीत चांगली संकल्पना राबवित आहे. नाटाकाला सिनेमाच रुप देऊन ती कलाकृती अजरामर करण्याची केदारची संकल्पना भरताला खूप आवडली..यामुळे भावीपीढीला इतिहास समजेल.
चित्रपटाची कथा आणि संवाद तसेच दिग्दर्शन केदार शिंदे याचे आहे. पटकथालेखन ओंकार मंगेश दत्त यांचे आहे. संजय मेमाणे आणि अनिल कटके यांची सिनेम्याँटोग्राफी आहे. महेश कुडाळकर यांचे कलादिग्दर्शन आहे. ओंकार मंगेश दत्त आणि वैभव जोशी यांचे गीत लेखन असून सोनू निगमबरोबरच अभिजित कोसंबी यांच्या आवाजात ती ऐकायला मिळतात. या चित्रपटाला वैशाली सामंत आणि कमलेश भडकमकर या दोघा जानकारांचे संगीत आहे.

श्रीमंत दामोदरपंत २६ जुलै पासून प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने पुण्यात कलाकारांच्या उपस्थितीत केदार शिंदे यांना पत्रकार परिषद घेऊन आपल्या चित्रपटाबाबत माहिती दिली..


`कॉट्सटाऊन पिक्चर्स`..च्या बॅनरखाली तयार झालेल्या चित्रपटात विजय चव्हाण , भरत जाधव, अलका कुबस, पियुष रानडे, चेत्राली गुप्ते, मृणास दुसानील, अभिनय सावंत आणि खास खलनायक शोभावा असा सुनिल बर्वे यांच्या भुमिका आहे.

वैशाली सामंत आणि कमलेश भडकमकर यांनी संगीत देलेल्या चित्रपटाचे छायालेखन संजय मेमाणे अनिल कचके यांनी केले असून खरोखरी श्रीमंतीपट वाटावा असा देखावा दिसून हिंदीच्या तोडीचे सेट वापरून चित्रपट नटविला आहे.

सध्या प्रमोशनचा धुमधडाका सुरु असून काही दिवसातच त्याचा परिणाम चित्रपटगृहात दिसून येईल. केदार शिंदे हे यापुढेही जुन्या गाजलेल्या नाटकावरून चित्रपट बनविण्याच्या कामात व्यस्त रहाणार हे आता नक्की झाले आहे.-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276