subhash inamdar

subhash inamdar

Monday, August 1, 2011

नाट्यसंगीताचा जुना खजाना

संगीत नाटकातले संगीत आजही ऐकले जाते
-डॉ. सुहासिनी कोरटकर

बालगंर्धवांनी १९३३ साली रंगभूमिवर आणलेले संगीत नाटक संगीत सावित्री हे आजच्या तरूण पिढीपर्यंत पोचविण्याचे काम पं. जयराम पोतदार करीत आहेत. त्यांची ही धडपड यशस्वी व्हावी आणि संगीत नाटकातली पदे लोकांच्या स्मरणात रहावित ,अशी इच्छा डॉ. सुहासिनी कोरटकर यांनी व्यक्त केली.

त्यांच्या मते आजही जुन्या नाटकातले संगीत ऐकायला रसिक उत्सुक आहेत. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या २८ व्या पुण्यतिथी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचे शेवटचे नाटक संगीत सावित्री या नाटकाचा कथामय नाट्य संगीताचा अभिनव आविष्कार रविवारी (३१ जुलै) भरत नाट्य मंदिरात सादर झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना वसंतरावांचे सुपुत्र बापू देशपांडे यांनीही पोतदारांच्या उत्साहाची दाद दिली.
कार्यक्षम नगरसेवक उज्ज्वल केसकार यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.


१९३२ साली चित्रपटाचे बोलपटात रूपांतर झाले. त्यामुळे नाटकाकडे रसिक येईनासा झाला. म्हणून खाडिलकरांचे
` संगीत सावित्री` हे नाटक रसिकांच्या स्मृतिपटलावरून कायमचे निघून गेले. ते डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या
(नवी दिल्ली) पुणे शाखेच्या वतीने नाट्यसंगीताचा आस्वाद देणारे हे नाटक प्रतिष्ठानने सादर करून
रसिकांची दाद मिळविली.



संगीत सावित्रीचे संगीत दिग्दर्शन मास्टर कृष्णराव आणि बालगंधर्व यांनी मोठ्या कुशलतेने केले असल्याने
त्या चाली आज उपवब्द नव्हत्या. संजय हारिभाऊ देशपांडे यांनी त्यातल्या गाण्यांच्या चाली उपलब्द करून दिल्यामुळे हा नाट्यसंगीताचा जुना खजाना रसिकांना ऐकायला मिळाला. सुरेश साखवळकर, सीमा रानडे आणि रविंद्र कुलकर्णी यांनी चालींना आकार दिला. त्या रंगविल्या आणि दादही घेतली. नव्या चालींना आपल्या गळ्यात मुरवून च्या तयारीने त्या पेश केल्या. त्याचे कौतूक रसिकांनीही केले.



सूत्रधार-नटीच्या निवेदनातून विनया दसाई आणि सुभाष इनामदार यांनी त्या पारंपारिक वेषात कथानक कथन करून या नाटकाचे शाब्दिक दर्शन परिणामकारक घडविले.

संजय करंदीकर यांनी तबला साथ तर जयराम पोतदार यांची ऑर्गनची साथ रंगमंचावरील एकूण कार्यक्रमात उठून दिसली. यामुळे विस्मृतित गेलेली एक चांगली कलाकृती पुन्हा लोकांसमोर आली .
अवघ्या दोन तासात संगीत सावित्रीचा हा अभिनव प्रयोगातून ही नवी संकल्पना रूजून
नाट्यसंगीताचा प्रसार होण्यास मदत होईल असा विश्वास वाटतो.