subhash inamdar
subhash inamdar
Tuesday, February 28, 2012
दैवतासमान कुसुमाग्रज....
फेब्रुवारी २७ सन २०११ ही तारीख म्हणजे कुसुमाग्रजांच्या जन्म शताब्दी वर्षाची आठवण मनावर कोरुन ठेवलेली. या निमित्ताने `गतिमान प्रॉडक्शन प्रस्तुत`, `रसयात्रा` ही अत्यंत साधेपणाने आलेली जाहिरात आकर्षून गेली. त्या कार्यक्रमाला मी वेदशास्त्रोजक सभेतल्या सभागृहात गेले होते. कुसुमाग्रजांचे सर्व साहित्य वाचून मानसी आपटे यांनी त्यांचे निवडक साहित्य या निमित्ताने समोर मांडले. वर्षापूर्वीचा तो कार्यक्रम आवडला पण भावला नव्हता.
बरोबर वर्ष झालं आणि मटातली जाहिरात बघितली आणि टिळक स्मारक मंदिरात निवडक कविता, नाट्यप्रवेश, कथा आणि गीतांवर आधारित `रसयात्रा` कार्यक्रमाला गेले.
अध्यक्ष सुधीर मोघे, ते स्वतःच स्फूर्तिचं उत्तमस्थान असल्याने त्य़ांच्या कुठल्याही कार्यक्रमाला मी नेहमी जातच असते. आजही त्यांनी आपल्या वेगळेपणाच्या भाषणात कुसुमाग्रजांनाही माहिती नसलेली कविता म्हणून दाखविली. ५० वर्षापूर्वीची कविता. ह्या कवितेने त्यांच्या मनात घर करुन ठेवलेले नी म्हणूनच ते कवी झाले. कुसुमाग्रजांच्या संस्काराने.
कुसुमाग्रजांच्या अनेक आठवणी माझ्याही मनात घर करुन गेल्या.
मी त्यांना प्रथम भेटले ती प्रभाकर पाध्येंकडे. प्रभाकर पाध्यांकडे दरमहा इंडियन रायटर्स तर्फे अनेक मोठमोठे लेखक जमत असत. त्यात कुसुमाग्रजही मुद्दाम नाशिकहुन येत. बापट, पाडगावकर, श्री.पु.भागवत, मे.पुं. रेगे, अशोक केळकर, दि.के बंडेकर..असे कितीतरी.. आणि त्यात कुसुमाग्रजांचे देखणे सात्विक व्यक्तिमत्व कुणालाही भारवून टाकणारे. तेथील पुंडलिकांच्या वेगळ्या विचारांवर ते भारावून गेलेलेही आठवतात. पुंडलिकांनाही त्यांच्याविषयी खूप आदर. विशेषकरुन चक्र, माता दौपदी, चार्वाक नाटकांवर खूष होऊन ते बोलत राहात. त्यांच्या आवाजातही.. बोलण्यातही गोडवा असे. हा कार्यक्रम बघत असताना मला हे सारं आठवत राहिलं.
त्यांच्या `गर्जा जयजयकार`शी मला सातवीपासूनची ओळख.पाठांतराला हीच कविता होती.
त्यांचा `दुसरा पेशवा`ही बघायला गेलेलो. आठवले. त्यातील त्यांच्या संवादाने. त्यावेळेलाही भारालेपण आले होते. त्यांनी बारकाव्यानी केलेल्या इतिहास वाचनाचेही कौतुक वाटलेले. आणि काशीबाईबद्दलही पेशव्यांच्या भावना खूप बारकाईने न्याहाळलेल्या. विशाखा हा कवितासंग्रह अनंतराव कुलकर्णींनी कुसुमाग्रजांच्य़ा सांगण्यावरुन पाठविलेला. त्या कवितांचे वाचन कितीतरी वेळा झालेले.
त्यांचे `विज म्हणाली धरतीला..`हे मला सर्वात आवडलेले नाटक. त्याच्या पहिल्या प्रयोगाला बालगंधर्वाला आम्ही गेलेलो. त्यातील काव्यमय भाषा आणि नाटकाच्या शेवटी आलेले कुसुमाग्रज आठवले. हा कार्यक्रम बघताना जणू ते स्वतः शेवटी येऊन बसलेले आठवले.
मानसी आपट्यांनी एवढ्या मोठ्या कुसुमाग्रजांच्या साहित्यातून निवडलेले तुकडे खूपच महत्वाचे आणि सामान्य वाचकांपर्यत पोचतील असे वाटते. त्यांच्या सगळ्या साहित्याची लयमयता, शब्दयोजना..जोरदार व ठशीव भाषाप्रभुत्व आहे. वर्षभर सततच्या त्यांच्या कार्यक्रमांना जाऊनही कुठेही तोच तोचपणा ..कंटाळवाणेपणा.. वाटला नाही., त्याचे हेच कारण.
पाठ्यपुस्तकातील कवितांमुळे प्रत्येक विद्यार्थ्य़ांच्या तोंडावर कुसुमाग्रज हे गोड व्यक्तिमत्वाच्या कविचे नाव परिचयाचे झाले. अनेक प्रेमगीते, प्रेमकथा ऐकल्या पण कुसुमाग्रजांनी `पृथ्वीचे प्रेमगीत` लिहून त्याला लखलखीत नक्षत्राचे अढळस्थान दिले. ही कल्पनाच जगाविरहित आहे. या गीताने कुसुमाग्रज हे नाव कवितेइतकेच तोंडातच बसले.
त्यांच्या लेखणीला जणू कालिदासापासून ते शेक्सपीअर पर्यंतच्या नाटककारांचा स्पर्श आहे. त्यानी कुठल्याही विषयावर चार ओळी लिहिल्या तरी त्यात काव्यात्मकता असते. मराठी भाषेबाबात बोलताना ते म्हणतात.. भरजरी वस्त्राच्या जोडीला लक्तरांना आणले.. ...हे एकमेव वाक्य सुभाषितासारखे रसात्मक बनले.....जणू ही मराटी मनासाठी आताच्या सद्यपरिस्थितील मराठी भाषेच्या संदर्भात अंतर्मुख करणारे काव्यच बनले. `मराठी भाषा मंत्रालयाच्या दारात मस्तकी राजमुकुट घालून आणि अंगावर लक्तरे लेवून उभी आहे......या वाक्याने मराठीचा उपेक्षा करणारे शासन. मराटी समाज थरथरून चळचळ कापत..विचार करायला लागला.
त्यांचे लेखन आजच्या पिढीने मनलावून अभ्यासले तर ते अनुपमेय असे सांस्कृतिक वाड्मयीन उच्च दर्जाचे संचितच ठरेल.
बालगंधर्व आणि लो. टिळक यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले... टिळक म्हणजे मार्तंड की सूर्यतेजाईतके तेजस्वी असूनही ते तापहिन होते. तर बालगंधर्व म्हणजे शीतल, अलांछन चंद्रमा होते....
आजच्या पिढीने या दोघांना न पाहताही त्यांच्या या वाक्याने या दोन महान देवतासमान पुरुषांपुढे आपोआपच मस्तक लवून त्यांना वंदन करतील अशी त्यांची थोडक्याच शब्दात केलेली वाखाणणी.
या महापुरुषाची भेट झाली की त्यांच्याबद्दल इतका आपलेपणा वाटायचा की ते आपल्याच कुटुंबातील एक आहेत असे त्यांच्या लेखनावरुन वाटत राहते. असे निर्विष. स्वच्छ मनाचा. गोडवाणीचा साहित्यिक आजपर्य़ंत झालेला नाही. म्हणूनच ते सर्वांना साहित्यातून प्रत्यक्ष भेटीतून दैवतासमान वाटत गेले.
आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने वर्षभर जे कार्यक्रम पाहिले त्यातून ते मनात ठासून पक्के झाले. त्यांच्या नावाचे जन्मस्थान, गोदावरी पुरस्कार असले तरीही ते समारंभ स्टेजवर हजर न राहता पहात..ऐकत. आले आहे.....
अशी त्यांची थोरवी गाताना आपल्या मनाला खरा आनंदयुक्त आदर वाटून आपोआपच मान वाकते हे त्यांचे श्रेष्ठत्व!
-रागिणी पुंडलिक,
१४५६, सदाशिव पेठ, पुणे-३०
फोन. ०२०- २४४६०२३८
V V Shirwadkar / “Kusumagraj” is a gem of a person, a poet, a social and cultural personality born in Nashik.
The original name of V V Shirwadkar was Gajanan Ranganath Shirwadkar that changed after after adoption.
He was born on 27th February 1912 in Pune.
Kusumagraj completed his primary education in Pimpalgaon and high school education in New English School, now J.S. Rungtha High School of Nashik. He then passed matriculation from Bombay University.
His poems and articles were first published in “Balbodhmewa ” magazine when he was hardly 17 years old. Later these were published in “Ratnakar” magazine.
In 1932, he participated in the “Satyagraha” for allowing untouchables to enter Kala Ram Temple. Kusumagraj had no looking back, he began writing poems, stories, plays for the news papers like Weekly Prabha, Sarathi, Navyug etc.
Some of this well acclaimed poem collections are “Vishakha”, “Marathi Mati”, “Swagat”, “Himraesha”, “Yayati Ani Devayani”, “Veej Mhanali Dhartila”.
His eye-opening play “Natsamrat” which fetched him the Sahitya Academy Award in 1974, is regarded as a milestone by the Marathi population till date.
The other awards confernend on Kusumagraj include : Ram Ganesh Gadkari Award, honourable degree of D.Lit. from the Poona University, Sangeet Natya Lekhan Award, Dnyanpeeth Award and above all the Padmabhushan.
This great personality left us on 10 March 1999.
See Also
Subscribe to:
Posts (Atom)