subhash inamdar

subhash inamdar

Monday, December 26, 2011

योग्य वयात तरुणांच्या पाठीवर शाबासकी थाप

`स्वरानंद` या पुण्यातल्या संस्थेने आपल्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त चार तरुण कलावंतांना त्यांच्या संगीत क्षेत्रातल्या कामगिरीचा गौरव पुरस्कार देऊन सोमवारी २६ डिसेंबरला (२०११) केला. यात

गायक आनंद भाटे,


संगीतकार निलेश मोहरीर,रसिकप्रिय गायिका योगिता गोडबोले-पाठक, आणिगिटारवादक ज्ञानेश देव

यांना संगीतकार आनंद मोडक यांच्याकडून पुरस्कार प्रदान करण्यात आले. याचवेळी सरदेशमुख महाराज आणि युसूफभाई मिरजकर यांच्या स्मृतीनिमित्त २० हजार रुपयांची शिष्यवृत्ती कोल्हापूरची हार्मानियम वादक मुलगी शामिम मोमिन हिला याचवेळी प्रदान करण्यात आली.ज्यांच्या अनेक रचनांनी मराठी मनावर भूरळ घातली असे संगीतकार यशवंत देव या समारंभासाठी तब्येत बरी नसूनही हजर होते. त्यांनीही या समारंभात आपले मनोगत मांडले . त्यांच्या मते गुरू तुम्हाला मार्ग दाखवितो. पण तुम्ही स्वतः त्या मार्गावर चालायचे असते.. पुरस्कार मिळालेल्या कलावंतांच्या वतीने योगिता गोडबोले-पाठक यांनी अशा पुरस्काराने बळ मिळते. कौतुकाची थाप माठीवर पडते. त्यामुळे पुढच्या काळासाठी एक जिद्द निर्माण होते... रसिकांचे रंजन करण्य़ासाठी प्रोत्साहनही यातून मिळते...


स्वरानंदचे प्रकाश भोंडे यांनी संस्थेत वीसएक वर्ष विविध कार्यक्रमातून व्हायोलिनची साथ करणारे निष्ठावान कलाकार पं. भालचंद्र देव यांचा त्यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्त य़शवंत देवांना त्यांचा सत्कार करण्याची विनंती केली. भोंडे यांनी असे निष्ठावान साथीदार मिळाले हे संस्थेचे भाग्य असल्याचे सांगितले.. आणि त्यांची

पं. भालचंद्र देवांची कन्या सौ. चारुशीला गोसावी हिचाही उत्तम व्हायोलिनची साथ करणारी स्वरानंदची कलाकार म्हणून रसिकांना परिचय करुन दिला.


एकूणच सुगम संगीच्या क्षेत्रात ४१ वर्षे सातत्याने काम करणारी ही `स्वरानंद` आजही वेगवेगळे उपक्रम घेऊन मराठी रसिकांची पसंती मिळविते... दरवर्षाला नवीन आणि ज्यांची कला रसिकांनी पसंत केली आहे आणि ज्यांच्या गायनात, वादनात ,कलेत उद्याची उमेद आहे आशा तरुण कलावंतांचा पुरस्कार देऊन गौरव करते....


हे संगीतकार आनंद मोडक यांच्या शब्दात सांगायचे तर....`योग्य वयात या तरुणाईच्या पाठीवर शाबासकीची थाप संस्था देत आहे..हे उचित आहे. त्यांच्या प्रवासाच्या योग्य वयात त्यांना शाबासकी दिली जाते. तरुणाईत दिलेले पुरस्कार महत्वाचे वाटतात`.... असा उल्लेख केला.


पुरस्कारानंतर सर्वच पुरस्कार विजेत्या कलावंतांनी आपल्या गुणांची उधळण आपापली पेशकश सादर करुन रसिकांची दाद घेतली. या सर्वच कार्यक्रमाची सूत्रे अरुण नूलकर यांनी पुणेरी चिमटे काढत कार्यक्रम य़शस्वी करण्यात मोलाची भर घातली.सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596176