व्यंगचित्रात जो कुत्रा दाखविला आहे तो पिसाळलेला आहे..शिवसेनेकडे पाळलेला कुत्रा असल्यामुळे तो भुंकत नाही आणि कुणाला विनाकारण चावत नाही....मंगेश तेंडूलकरांच्या ७०व्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना संजय राऊत यांनी राष्टवादीचे आमदार अंकूश काकडे यांना अशा कोपरखळी देऊन व्यंगचित्रही राजकीय नेत्यांना कसे लागते आणि किती खुपते याचे दर्शनच घडविले..
ही घटना घडली ती बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात...जिथे राष्ट्रवादीचे अंकूश काकडे यांनी एका व्यंगचित्राचा उल्लेख करुन यात राष्ट्रवादीचा कुत्रा तीन वेळा भुंकतो..मनसेचा नुसतीच कोल्हेकुई करतो...असे विविध राजकीय पक्षांवर काढलेल्या व्यंचित्रात शिवसेनेचा यात उल्लेखही केलेला नसल्याचे दाखवून दिले...याचा दाखला देत शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आपल्या भाषणात अशी शाब्दिक खेळी करत उत्तर दिले..
हे राजकीय लोक व्यंचित्रातला आनंद घेतानाही आपले राजकीय व्यासपीठ बिलकूल सोडत नाहीत..आम्ही तेंडूलकरांच्या व्यंगचित्राकडे पहाताना त्यातल्या आशयाकडे वेगळ्या पध्दतीने पाहतो...आम्ही ते सारे हसत हसत पचवितो असे म्हणतो..पण प्रत्यक्षात मात्र तसे व्यंग दाखविले की तुटूनही पडतो..कुठेतरी ते चित्र डोक्यात पक्के घेतो..आणि वेळ आल्यावर त्याचाही समाचार घेतो..हेच सिध्द केले.
खुद्द शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे ही सांगत ...अनेक लेखातून जे व्यक्त होऊ शकत नाही ते व्यगचित्र एका चित्रात करते...व्यंगचित्रात हिच परंपरा संभाळणारे आता केवळ मंगेश तेंडूलकरच शेवटचे शिलेदार उरले आहेत...त्यांच्या व्यंगचित्रातून अनेक विषय माडतात...त्यांच्या कलेला सा-यां रसिकांनी असाच प्रतिसाद देऊन त्यांची कला याही वयात बहरत रहो असा आशावादी सूर आळविला..
शनिवारी सकाळी या उदघाटन कार्यक्रमाला अनेक मान्यवर रसिक या क्षेत्रातले जाणकार उपस्थित होते..आपल्या हातून ही चित्रे काढली जातात..पण मी ती काढत नाही...आता चहा घेण्यासाठीही हात थरथरतो..पण ब्रश हाती घेतला की चित्र रेखाटना तो स्थिर रहातो...जोपर्यंत ती काढली जातात तोपर्यंत मी काढतच रहाणार...असे म्हणत...मंगेश तेंडूलकरांनी आत्तापर्यंत वाचकांनी केलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झाल्याचे ते सांगतात.
वयाची एंशी पूर्णकरूनही अतिशय उत्साहाने प्रदर्शन भरवितात...रसिक-वाचकही त्याला तेवढाच दिलखुलास प्रतिसाद देतात...त्यांची याही वयातली ही उमेद तरूणांना आणि नवीन कलावंतांना याकडे आकृष्ट करेल यात शंका नाही...
पुण्यात आजही खड्डे कायम आहेत...मी त्याबाबत व्यंगचित्रकार आणि जागरूक करदाता म्हणून प्रयत्न करतो...पण पुण्याचे हे चित्र महापालिकेतील विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी आणि महापालिकेच्या अधिका-यांनी बदलण्याची गरज असल्याचे सांगत व्यगचित्रातून व्यंग दाखविले..पण ते समाजहिताचे काम व्हावे असाच उद्देश असतो...यात अनेक ठिकाणी अनेक विषयावर मी चित्राच्या भाषेतून मते व्यक्त केली आहेत...पण ती दूर व्हावीत आणि समाजहिताचे काम व्हावे ही आशादायक बाब घडावी ही तेंडूलकरांची विनंती आहे...
- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276