subhash inamdar

subhash inamdar

Saturday, December 27, 2014

सत्यदेव दुबेेंचे नाटकवेड दाखविणारा प्रभावी आविष्कार


इन्शाअल्ला

सत्यदेव  दुबे एक अफलातून नाटकासाठी जगलेला माणूस..मी तो माणूस आज ख-या अर्थाने अनुभवला..पुरेपुर..सुशिल इनामदार यांच्या अभिनयातून..दुबे वावरले..बोलके झाले..काही गोष्टी नव्याने समजल्या..काही अंगावर आल्या,,, पुण्याच्या भरत नाट्य मंदिरातला २७ डिसेंबरच्या संध्याकाळी  झालेला हा प्रयोग मला न कळत माझ्यावर परिणाम करुन गेला..तो असा..
पण जे उमजले ते हे ..त्यामाणसाने स्वतःला कधीही विकले नाही..आपल्या मस्तीत जगले..रमले..इतरांना रमविले..जे आले त्यांना घेऊन..जे गेले त्यांना शुभेच्छा देऊन..नाट्ययज्ञ त्यांनी जसा मांडला तो आविष्कार चेतन दातार यांचाया लेखनातून उलगडत गेला..

पहिल्या अंकातील भावभावनांचा आणि प्रसंगांचा प्रायोगिक नाटकांचा त्यांचा अभ्यास एकेका प्रसंगातून दिसत गेला..ती उत्कत प्रतिभा जर प्रेक्षकांमनध्ये नसली तर तायंना ते कळणार नाही..काय हे नाटकवाले करताहेत असा बोल लागले..म्हणूनच काही गाष्टी अॅबसर्ड वाटल्या ..त्या कळत नकळत डोक्यावरुन गेल्या..पण दुसरा अंक दुबेंचे खरं जीवन उलगडणा-या होत्य़ा....तिथे फक्त दुबे होते..दुबे यांच्या मनातली ती नाटकाविषयी कलेविषयीची ओढ किती खोलवर रुजली होती याचे हे प्रतिबिब पूर्णपणे इथे  प्रतित होत होते...नटांनी विषेषतः सुशिल इनमामदार यांनी तो सर्वेश्वर फारच ताकदिने होत गेला..इथे एकसुरी होण्याची संधी होती..पण त्यांनी तो बोली आमि शारीरीक अभिनयाच्या छटातून असे काही स्वतःला बोहर काढले की त्यांच्यातला नट सतत खुणावत रहातो..नटाची शैली..त्याची ताकद आणि सभोवताल घेऱून ठेवण्याची त्यांची भाषा...केवळ अप्रतिम...

नाटक झाल्यावर दुसरा अंक माझ्या सौ.ला फारच आवडला..त्यातल्या सुशिल इनामदारांच्या कामावर तर त्या बेहद्द खुष झाल्य़ा...मना त्यांनी केलेले काम पाहता नटसम्राट आठवला..असे म्हटले..मला ते अदिक जास्त मोलाचे वाटले.
अजित भगत यांनी ते फारच अंगावर येईल इतके उत्कटपणे कलावंतांच्या माध्यमातून साकारले..






चिन्मय-निनाद यांनी दिलेली संगीताची भाषा नाटकाला अधिक बोलती करुन गेली..खरं म्हणजे ज्यांनी दुबे पाहिले नाहीत त्यांना दुबेंचे विलक्षण झपाटलेपण कळेल...त्यांनी अंतीम क्षणापर्यंत सोबत केली..पण तो क्षण ते स्वतः अधुरेपण सतत आपल्याजवळ ठेवत..नाटकात म्हटल्याप्रमाणे चारआणे आपल्या मुठीतून सुटून दिले नाहीत. ते नाणे त्यांनी घट्टपणे आपल्याजवळ सांभाळले..ते आपल्याबरोबरच इन्शाअल्ला..करत स्वतः बरोबरच घेऊन गेले..

त्यांच्या स्त्री अभिनेत्रींच्या कथा इथे दिसतात..काही वेळा त्यांचे बिनधास्त बोलही ऐकावे लागतात..पण त्यांच्या मनस्वी स्वभावाला सारे काही चिकटून आले आहे..
सतत नाटक..नाटकाविषयक...आणि शेवटी तर सुदाम्याच्या तोंडून त्या कृष्ण लिला ज्या उत्कटतेने सादर झाल्या..तिथे ते सारे खोटेपण जळून गेले..उरले ते खरं..अस्स्ल खणखणीत नाणे..ज्यांने अनेक शिष्य घडविले..नाट्यचळवळ उभारली..रंगभूमिवर काळ्या पडद्यावर सफेद जग उभे केले...इथेही त्याचे दर्शन सुशील इनामदार यांच्या परिपूर्ण वाचिक, आंगिक आणि उत्तम अभिनयातून घडले..
सर्वेश्वर सोबत देवेंदर- गौतम बेडं आणि गुलन- मृणाल वरणकर यांच्या भूमिकांची दाद द्यावीशी वाटते..मोनिलिसा विश्वास, संजाना हिदुपूर,सुदेश बारलिंगे या नटांच्या भूमिकाही उत्तम बळ देऊन नाटकात प्राण ओतीत गेल्या..
मला व्यक्तिशः देवेंद्रर मध्ये अच्युत पोतदार आणि सर्वेश्वरमध्ये विजय केंकरे यांच्या व्य़क्तिमत्वाची झलक दिसली..ज्या उत्कटतेने आणि प्रामाणिकपणे आविष्कारने ही कलाकृती घडविली यात सत्यदेव दुबेंसारखा नाट्यअभ्यासक अधिक ठळकपणे समोर दिसला..नाटकाविषयीची अत्यतिक ओढ आणि आवड...हिच त्यांची वैयक्तिक ओळख होती..ती इथे जपली गेली..

मला व्य़क्तिशः सत्यदेव दुबे दिसले..भासले..अंगावर आले..अगदी त्यांच्या गुण-दोषांसह..रंगभूमसाठी जगणरा हा वेडा माणूस...त्यांच्या स्मृतीला खरंच इथे आकार मिळाला आहे...पुढच्या पिढीला  अगदी ज्याने दुबे पाहिले नाहीत..त्यांना तो माणूस आणि त्यांत असलेला नाट्यवेडाने झपाटलेला माणूस स्पष्ट दिसेल.



या नाटकाला रसिकांची हजेरी वाढली...एका वेड्या नाट्यजीवनाची कहाणी अधिक लोकांपर्य़त पोहोचली तर ही आविष्कारच्या अरुण काकडे यांनी केलेली तळमळ  सार्थकी लागेल..ज्यांना कुणाला शक्य असेल त्यांनी हा प्रयोग जिथे असेल तिथे पहावा एवढीच विनंती



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, November 7, 2014

गोखले आण्णांची पदे आजही दाद घेऊन जातात



रंगशारदेच्या दरबारात
आजही संगीत नाटकातली पदे ऐकायला रसिक उत्सुक असतात..आणि तेही नाटककार-पत्रकार आणि साहिंत्यिक विद्याधर गोखले यांच्या लेखणीतून साकार झालेल्या बहारदार पंदांची बरसात होत असेल..तर निवारा वृद्दाश्रमाचे पुण्यातले सभागृह गुरुवारी ६ नोव्हेंबर २०१४ ला टाळ्यांच्या आनंदात त्या पदांचे स्वागत करते..वन्समोअरचा गलाकाही करते... आणि त्यातही आपल्या आवडीच्या लेखकांची स्मृती जपताना नव्या-जुन्यांच्या या संगमातून नव्याने काही कलावंत आजही ती पदे शिकतात आणि उत्तमरित्या सादर करताहेत..हा एक नजाराही इथे पहायला मिळाला.
पूर्णब्रम्ह...या किल्लेदारांच्या परिवाराच्यावतीने विद्याधर गोखले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आपल्या २२ व्या वर्षातल्या पदार्पणाचे निमित्ताने नीला किल्लेदार यांनी लोकसत्ताचे माजी संपादक आणि संगीत नाटकातून संस्कृती आणि संस्काराची उत्तम पेरणी करणारे नाटकाकार विद्याधर गोखले यांच्या पदांची निवड केली...गोखले यांच्या कन्यका सौ. सुनंदा दातार यांचा सन्मानाने सत्कार करून ही मैफल रसिली करुन सोडली. स्वतः किलेलेदारांनीही  (पुणेकरांच्या पोटापाण्यासाठी सुग्रास अन्न पुरविले आहे).. सुरगंगा मंगला हे जय जय गौरीशंकर नाटकातले पदही सादर केले.


त्यांच्या अभ्यासू लेखणीच्या स्पर्शाने आपल्या आयुष्यात अनमोल असे क्षण आल्याचे त्यांच्या सर्वच नाटकात भूमिका केलेल्या मधुवंती दांडेकर यांनी आवर्जुन सांगितले..आणि आपली नाट्यपदेही रंगविली..शैली मुकूंद यां अभ्यासू निवेदिकेने त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली नसतानाही..त्यांच्या साहित्याचा नाटकांचा अभ्यास करुन  शैलीदार शब्दातून .गोखले आण्णांचे पैलू उलगडत नेत बहारदार असा पदांना खुमासदार वाणीत गायकांना गाते केले..
स्वतः मधुवंती दांडेकर या तर गोखले यांच्या नाटकातून भूमिकाही करीत होत्या...रविंद्र कुलकर्णी यांनीही त्यांच्या काही नाटकातून भुमिका करुन त्या पदांची ओळख आधीच करुन घेतली आहे..पण मंगला चितळे यां भजनांचे..भक्तीगीतांचे संस्करण करतात...पण त्यांनीही या वयात गोखलेंच्या नाटकातली काही पदे इतकी सुंरेल आणि ओघवती सादर केली की खरे तर त्यांच्याबद्दल खूप काही सांगावेसे वाटेल..आजही त्यांच्यासारख्या गायकांनीही ती म्हणाविशी वाटतात..आणि पेलता येतात..यातच त्यांचा मोठेपणा सामावलेला आहे..पदातले शब्द आणि नाटय्रदांना आवश्यक असणारी लयदार तानही त्यांनी उत्तमप्रकारे आपल्या गळ्यातून रसिकांसमोर सादर करुन स्वतःबरोबरच त्यांनाही आनंद दिला..

जय जय गोरीशंकर, सुवर्णतुला, मंदारमाला, स्वरसम्राज्ञी, मदनाची मंजीरी अशा लोकप्रिय झालेल्या विद्याधर गोखले यांच्या नाटकांची तसेच वसंत देसाई, छोटा गंधर्व, प. राम मराठे यांच्या संगीताने संपन्न झालेल्या पदांची पुन्हा आठवण नाट्यसंगीत जाणणा-या रसिकांना करुन दिली.  खरं तर काळाच्या ओघात ही संगीत नाटके केवळ होशी संच कधीमधी सादर करतो..काही प्रमाणात. स्वरसम्राज्ञी..शिलेदार सादर करतात..पण बाकी नाटके काळाच्या या गतीमान संगीताच्या युगात विसरुन जाऊ लागली आहेत..अशा कार्यक्रमांमुळे पुन्हा एकदा ही संगीत नाटके ज्यांना किर्लोस्कर..देवल..खाडीलकर..यांच्या परंपरेचे पंख आहेत..ती पाहण्याची उस्तुकता निर्माण होते...मधुवंती दांडकर, रविंदर् कुलकर्णी आणि मंगला चितळे यांनी ती सारी पदे रसरसून गायली...त्यातली सूरभाषा आणि शब्दातले सोंदर्य जसेच्यातसे  नव्हे काकणभर जास्त सुंदर नटविले...ही सारी पदे रसिकांना आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे या कार्यक्रमाला लाभलेले साथीदार,.,. निलिमा राडकर (व्हायोलीन)..माधव मोडक (तबला) आणि संजय गोगटे यांची ऑर्गनवरची साथसंगत..त्यांच्यामुळे पदांना साग्रसंगीत आणि तालसंगत सूर लाभले..


विद्याधर गोखले यांच्यावरच्या नाट्यपदांच्या अशा कार्यक्रमांना इतर शहरातही दाद मिळेल..हाच संच तिथल्या रसिकांनीही आवडेल..याचे पुन्हा पुन्हा कार्यक्रम व्हावेत...आणि गोखले यांच्या नाटकांचे पुनरूज्जीवन होऊन..एखादी सुनिल बर्वे ( ज्याने हार्बेरियमच्या माध्यमातून जुन्या नाटकांचे संदर प्रयोग सादर केले) इथेही पुढे यावा आणि अशा नाटकांची वेळेच्या मर्यादा ओळखून रंगावृत्ती करुन ही नाटके पुन्हा प्रेक्षकांना सुंदर नेपथ्यातून दाखविल  अशी अपेक्षा करतो..

पुन्हा एकदा किल्लेदार परिवारला गोखले यांच्या नाटकातली पदांची रंगत आणि त्यानाटकाल्या उत्तम नाट्यगीतांना रसिकांसमोर आणले याबद्दल मनापासून धन्य़वाद देतो...त्याबद्दल आनंद व्यक्त करतो..आणि इतरत्रही अशीच दाद मिळेल असा विश्वास देतो. 


-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, August 13, 2014

दाद मिळवून गेली.. दिल की बात

पुण्यात गजल गायनाचे विविध कार्यक्रम होतात. त्या गायनाची गजलचे अर्थ उलगडून स्वरांच्या सुरील्या मैफलीतून उमटविणा-य़ा अशाच एका संस्थेने `साज`ने `दिल की बात` द्वारे स्त्री गजल गायिकांचे पुनःस्मरण केले..श्रुति करंदीकर आणि गायत्री सप्रे ढवळे या दोन गायिकांनी त्या सादर केल्य़ा आणि रसिकांकडून तोंडभरुन कौतूक करुन घेतले. हे सांगायला तसा बराच उशीर झालाय कारण तो कार्यक्रम २ ऑगस्टला पुण्यात पत्रकार संघात होऊन गेला..परंतू देरसे आये ..दुरुस्त आये,,असच काहीसे म्हणतात ना त्याप्रमाणे.
ये इश्क नही आसॉं, दूर है मंजिल, गुलोंमे रंग भरे, आणि नुकताच झालेला तसव्वूर..असे गजलांचे कार्यक्रम करून त्यात आपली मुशाफिरी जगजाहिर करणा-या `साज` या संस्थेने मागच्या पीढीतल्या पाच नामवंत गजलगायिकांना या कार्यक्रमातून मानाचा कुर्निसात केला..तोही जाहिरपणे..
सुरवात झाली फरिदा खानम यांनी गायलेल्या गालिब च्या इब्ते मरियम हुआ करे कोई..या गजलने. रागेश्री रागावर आधारित गजलचा डौल पूर्णपणे शास्त्रीय ढंगाचा होता. इथूनच मैफलीत रंग भरायला सुरवात झाली. श्रुति करंदीकर यांनी तेवढ्याच समरसतेने ही गजल सादर केली.
सर्वांना परिचित अशी मेहदी हसन यांनी गायलेली मुहबत करनेवाले कम न होंगे.. ही गजल सुरु होताच श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. गायत्री सप्रे-ढवळे यांनी ती गजल सादर केलीही उत्तम..त्यातल्या सा-या अर्थाला समजून ती गायली गेल्याने प्रेक्षकांनी नंतरही टाळ्यांनी कलावंतांना प्रोत्साहन दिले..

मधुरानी यांच्या दोन गजला श्रुति कंरदीकर आणि गायत्री सप्रे-ढवळे यांनी एकामागोमाग एक पेश केल्या. न वो बात कर मेरे हमनावा आणि वो जो हममे तुममे करार था..या गजलनी वातावरण तयार झाले. रुपक तालातल्या वेगळ्या वजनाच्या या दोन गजलांचा रसिकांना भरभरुन आनंद घेतला.
सर्वांत शेवटी आबिदा बेगम यांनी गायलेल्या जबसे तूने मुझे दिवाना बन रखा है या भैरवीतल्या गजलला पेश केले ते दोन्ही गायिकांनी एकसुरात  यामुळे हा सहगजल गाण्याचा वेगळा प्रयोगही आकर्षक होता.
दोन गायिकांनी एकाच बैठकीत गजल गायन करण्याचा पुण्यातला हा एक दुर्मिळ योग होता...हे नक्की..


कार्यक्रमात हार्मानियमची साथ केली ती कुमार करंदीकर यांनी..ती नुसती साथ नव्हती तर या वाद्यातून ते गातही होते..इतके ते तंतोतंत बरोबर संगत करीत गायनाला रंगत चढवित होते. ताल म्हणजे तबल्यातून बोलत आपल्या बोटांनी ते अरुण गवई..


हिंदी आणि उर्दुची जाण ज्यांच्या निवेदनातून क्षणोक्षणी दिसत होती..त्या नीरजा आपटे...

एकूणच ही दिलकी बात अशीच चालू रहावी आणि श्रोत्यांनी बहुत अच्छे..म्हणून दाद देत रहावी अशी ही मैफल होती ..

Wednesday, July 16, 2014

घरच्या गुरुची आगळी पूजा...



संगीताचा वारसा जपणारी परंपरा आता पुढे जाणार याची खात्री पटविणारा एका कलावंत आजींचा डॉ. ज्योती ढमढेरे  यांया कार्यक्रम अनुभवला आणि खरोखरीच भारावलेल्या अवस्थेत बाहेर पडलो.. खरं तर मी त्यांना पुण्यातल्या भरत नाट्य मंदिराच्या समोरच्या डॉ. ढमढेरे वाड्यात शास्त्रीय संगीत, गझल शिकणा-या आणि कायाकल्प मधून स्त्रीयांवर उपचार करणारे क्लिनिक चालविणा-या कलावंत राहतात हे ओळखत होतो.. कट्यार मध्ये छोटा सदाशिव असलेला जयदीपची आई..हे ही ओळखत होतो..हो आणखी एक सुमारे दोन वर्षापूर्वी त्यांच्या मुलीने अनुपमाने `नेसली निळी पैठणी.`.ह्या आईच्या लावण्यांवर कार्यक्रम करुन त्यांच्या काही लावण्यांची झलक दाखविली..सीडीही प्रकाशित केली..तीही सुलोचना चव्हाण यांच्या हस्ते हे ही स्मरते.
पण आज परंपरा..या रंगमंचावरील कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. ज्योती ढमढेरे यांच्यातल्या कवीला..गीतकाराला , संगीतकाराला,गुरुला आणि प्रसंगी स्वरचित बंदिशींतून जेव्हा १३ जुलैला रविवारी संध्याकाळी पडदा वर गेल्यावर ज्या रुपात त्या भेटल्या त्यातून त्यांच्याविषयी आदर वाढला..आपोआपच अरे आपल्याला हे सारे का नाही आजपर्य़त कळाले याचे वाईट वाटले..आणि आपल्यालाही असे जमेल काय..यासाठी आशीर्वाद मिळावा असी प्रतिभा त्यांच्यामध्ये आहे याची खात्री पटली...आणि म्हणूनच या नव्या रुपाची ओळख करुन घेतली.

 

खरं तर १२ जुलैला गुरुपौर्णिमा होती..हा कार्यक्रम १३ जुलैला होता..म्हणजे घरच्या गुरुची ही पूजाच होती जणू... रवींद्र खरे यांनी त्यांच्यातल्या अनेक पैलूंची ओळख पटवून दिली..खरं तर आपल्या घरातली अशीच एकादी व्यक्ति असते..जिच्यापाशी अनेक गुण असतात..तीही गुरुच असते..पण आपण तिचे ऋण असे जाहिरपणे फारसे मानत नसतो...घरच्या जबाबदा-या सांभाळून केलेली ही गुणांची पूजा या निमित्ताने बांधली गेली आणि आपल्यासारख्या असंख्य मातांना..त्यांच्या कर्तुत्वाला ती समर्पित केली गेली..

स्वतःबरोबर घरातल्यांना मोठं करणारी ही कर्तुत्ववान महिला महिला म्हणूनही त्यांची ओळख नव्याने करुन द्यावी लागणार आहे..आज त्यांचे वय ७० आहे..पण बालपणीचा श्रीरामपुरातला गावचा संस्कार..पुण्यात आल्यावर झालेला नवा परिचय..यातून स्वतःची संगीताशी वेगळी ओळख करुन..खॉंसाहेब महोम्मद हुसेन..यांचेकडे घेतलेले शास्त्रीय संगीताचे धडे..काही काळ संजीव शेंडे नंतर असिफ खान आणि मग बाळ माटे यांचेकड़ून भजनाचे घेतलेली तालिम सा-यांची मोट बांधून आपल्या मुलीला जी `सप्तक` नावाची संगीताची संस्था काढून त्याव्दारे संगीताचे शिक्षण अमेरिकेत देते आहे..आपल्या मुलाला जयदिपला आणि पुढे ते सई, आनंद आणि सायली दलाल या मुले आणि नातवांपर्यंत पोहचविले..आणि संगीताची परंपरा...साकारली..

सहजपणे त्यांना काव्य स्फूरते..ते मनात साठते..मग कागदावर उमटते...तसेच काहीसे..यातून गझल..रागांच्या बंदिशी, भावगीत, भजन, भक्तिगीत, लावणी..सारेच शब्दांचेबंध त्यांच्याकडून होत गेले..आणि मग काय हा नाजूक मोग-याचा फुलांचा निट गुंफलेला हार त्यांनी मुलांच्या नातवांच्या मुखातून रसिकांसमोर सुगंधित केला...


अगदी मनोगतातून व्यक्त झालेल्या त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे...दर दहा वर्षींनी माझ्या आयुष्यातल्या रंगाची छटा बदलत गेली..त्यात नवे रंग मिसळत गेले. ह्या स-या रंगंछटांचा एक सुंदर गोफ तयार झाला..तेव्हा प्रथम या सप्त रंगाचा मला साक्षात्कार झाला. या रंगातील एक रंग सुरांचा, लयींचा, तालाचा, उपज आणि बंदिशींची. मला आठवत तसं. मी सुरांच्या संगतीत आहे. ती संगत आई-वडीलांनी स्वतः पाणी घालून सशक्त केली. शब्द उशीरा साथीला आहे..पण साहित्यकला आणि संगीत हे माझ्या प्रेमाचे..आज हे मोग-यचे इवलेसे रोपटे मी न लावताच माझ्या दारात सजले, वाढले आणि घमघमले..या गगनावेरी गेले..माझी तिन्ही मुले आणि नातवंडं गानप्रमी आहेत...केवळ प्रेमीच नव्हे तर गानवेडी आहेत..हे तुम्हाला समजेलच..

जसजसा कार्यक्रम फुलत गेला..तसतसा कन्या..तीची मुलगी यांनी सादर केलेली रागदारी..नातीचा..सुरेल स्वराविष्कार...जयदिपचा लागलेला आवाज..त्याचे हळुवार सादरीकरण...मुलीची ठसकेबाज लावणी...सईने सादर केलेले गीत..आणि नातू आनंदने गीटारीच्या संगतीत म्हटलेले भावगीत...सारेच मग अनमोल संगीत पचविलेल्या आजीच्या बटव्यातून बाहेर येत येत..उपस्थित रसिकांच्या टाळ्यांनी पसंतीस उतरत होते...

खरं तर..त्यांनी एक गीतात सांगितल्या प्रमाणे..

कठीण कठीण मार्ग तरी रमत गमत चालले

मिटुनि सुख नेत्र मी हसत हसत चालले...

अशी अवस्था होत गेली..

पती डॉ. दिनकर ढमढेरे यांची ८०व्या वर्षींची साथ..सून उज्वला हिची घरातली मदत..अनुपमाने संगीताची सेवा करण्यासाठी निवडलेली स्वरमयी वाट...आणि जयदिपच्या सोज्वळ,निर्मळ स्वरातून फुलविलेला हा संगीताचा पिसारा...इथे फुलत..नव्हे डुलत होता..


घरातल्या सा-यांचे हे कौटुंबिक नाते...संगीताच्या बंधनात एका धाग्यात गुंतलेले पाहताना..मन भरून येते..आणि तृप्त पावते..

तिनपिढ्यांची ही संगीत परंपरा राजेंद्र साळुंके, नरेंद्र चिपळूणकरआणि राजू जावळकर यांच्या साथिने उपस्थितापर्यंत पोहोचली आणि आवडीलीही

हा नेहमीचा पारंपारिक कार्यक्रम नाही...पण परंपरेची किंमत सांगणारा आणि इतरांना परंपरेचे महत्व पटविणारा नक्कीच होता.म्हणूनच..वेगळा...आगळा.



-सुभाष इनामदार,पुणे
 subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, July 4, 2014

दोन आवाजात गौतम मुर्डेश्वरांची कसरत




दोन वेगवेगळ्या जातीचे आवाज एकाच गायकाच्या गळ्यातून निघत होते...खरी तर ती तारेवरची कसरत होती..हा पहिला प्रयत्न होता..पण खरचं ही खूप शिकण्यासारखी गोष्ट होती...एक मुलायम, पातळ आणि तेवढाच भावनाशील आवाज..तो तलत महमूद यांचा....एका परड्यात..तर दुसरा काहीसा कंप पावणारा पण शास्त्रीय संगीताचा अभ्यास असलेला कसदार फिरत असलेला मन्ना डे यांचा जोरकस दमदार आवाज...

गुरुवारी ३ जुलैला २०१४ला यशवंतराव चतव्हाण नाट्यगृहात `तमन्ना` हा कार्यक्रम सादर होत असताना...दोनही आवाजात एकच गायक नट गौतम मुर्डेश्वरची हा कसरत सुरु होती...पण कुठेतरी ही दोन्ही वेगळ्या आवाजाची जादू ..आणि त्यातही प्रत्येकाची वेगळी गाण्यातही तयारी..त्यावरची मेहनत घेऊन..नायकाच्या तोंडीची ती चमकदार तेजी...एकाला न्याय द्यायला जावे..तर दुस-यावर थोडी माया अधिक लागते...


दोन भिन्न गायकांच्या आवाजातले वेगळेपण जर वेगवेगळ्या कार्यक्रमात सादर झाले असते..तर त्यात अधिक रमता आले असते...असा एक रसिक म्हणून मला वाटलेला हा अभिप्राय इथे द्यावासा वाटतो..म्हणूनच तमन्ना...खर तर रसिकांनी उटलून धरला..गौतम मुर्डेश्वर यांचे हिंदी..उर्दुचे उच्चारणही सदोष..पण तरीही  एकेकाची एकेक कारकीर्द मांडली असती तर आवाजाची धाटणीही अधिक बोलकी आणि पुरेपूर गळ्यातून काढताना गाणीही तेवढीच अंर्तमनात अधिक उतरून गेली असती.. श्रुती करंदीकरांनी गीतातली नायिकेच्या आवाजाची जागा आपल्या तरल आवाजाने भारुन टाकली..
काही गाण्यात तर वादक अधिक प्रभावी ठरले..त्यांच्या हुकमतीवर तर सारे गाणे तोलले गेल्य़ाचे स्पष्ट दिसले...खरी तर ही एका जादुमयी काळाची सफर होती..पण हे पारडे एकसारखे खालीवर होत होते...

झनक झनक पासून सुरवात होऊन..मध्यतरापर्य़ंत..वक्तच्या ए मेरी जोहरी जबी..पर्य़ंत..आणि नंतर प्यार हुआ..एकरार हुआ..राजकपूरच्या बरसात मधल्या गाण्याने सुरवात होऊन..लागा चुनरीने दाग पर्यतची लयकारीदार पेशकश..सुरांच्या संगतीत अधिकाधिक रंगत गेली...रसिकांच्या वन्समोअरच्या प्रतिसादाला न जुमानता..सरस गीतांचा हा नजराणा इथे सादर झाला..

रवींद्र खरे यांच्या मराठी निवेदनातून तो काळ समोर उभा रहात गेला..त्यातून गायकांची मेहनत आणि संगीतकारांचे कौशल्य प्रकर्षाने दिसत गेले..शब्दातून ते मोठेपण उमगत गेले आणि त्यामागच्या सुरावटींनी आणि गायकांच्या सूरांनी रसिकांची मने तृप्ततेकडे झेपावत गेली.

तलत महमूद यांच्या 'जलते हैं जिसके दिये., रिमझिम तेरे प्यारे प्यारे गीत लिए., दो दिल धडक रहे हैं., फिर वोही शाम.' तस्वीर बनाता हॅं..अशा मनाला मोहून टाकणार्‍या गीतांनी सांज रंगली.

तर कौन आया मरे मनके व्दारे, कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं.,पासून मन्ना डे यांची गाणी थेट –हदयसंवाद करु लागली..ते अखेरच्या शास्त्रीय संगीतावर आधारीत असा लागी चुनरीमे दाग ने तर सुंदर असा स्वरमेळ साधला..एकेक गाण्यांची तयारी अतिशय मेहनतीने करुन हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद गायकाच्या आवाजात होती...ती त्यांनी पुरेपूर सार्थ केली...



विवेक परांजपे यांनी सा-या संगीत संयोजनाचा डोलारा आपल्य़ा खांद्यावर समर्थपणे सांभाळला..गीतातला स्वरमेळ आणि मधल्या सूरावटींच्या बोलक्या जागा अचूक जीवंत केल्या..त्यांना सिंथेसायझवर साथ केली ती केदार परांजपे यांनी..तर रिदम मशिनवर अभय इंगळे..आणि तबल्यावर थाप दिली ती अपूर्व द्रवीड यांनी..तर हार्मोनियमची संगत केली ती कुमार करंदीकर यांनी...एकूणच संगीत साथीदारांनी गाण्याची लय आणि गाण्याचा आवाका सारेच उत्तमपणे सादर करून रसिकांवर मोहनी पाडली..


स्वर-संवेदनाच्या या पहिल्या उपक्रमाला रसिकांचा प्रतिसाद पुढल्या कार्यक्रमाची वाट पहाणारा होता..गुरू शशिकला शिरगोपीकर, नंदा गोखले ( पं शरद गोखले यांच्या गायक पत्नी) आणि ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची उपस्थितीही कलावंतांना स्फूर्ती देऊन गेली.या निमित्ताने गौमत मुर्डेश्वर यांची अनेक दिवसांच्या तपस्येची..त्यांच्यातल्या सुरेल सादरीकरणातली भारदस्त तमन्ना पुरी झाली याचा विशेष आनंद वाटतो..




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276