subhash inamdar

subhash inamdar

Tuesday, March 25, 2014

शब्दरुपाने सुधीर मोघे आपल्यातच आहेत...

सुधीर मोघे यांना नेहमीच कवी म्हणून ओळखले गेले..त्यांचे देहाने जाणे झाले ते १५ मार्चला पुण्यात..

सोमवारी निवारा वृध्दाश्रमातल्या सभागृहात त्यांना श्रध्दांजली वाहताना..ते गेलेत असे समजू नका ते शब्दरुपाने आपल्यातच आहेत..एवढेच काय त्यांच्या ७५ अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजनही तसेच सुरु ठेवा...यातून त्यांच्या विषयीच्या आठवणी भरभरुन अनेक सुहृद सांगतील  आणि सुधीर मोघे यांचे खरेच मनस्वी व्यक्तिमत्व कसे होते.याचा उलगडा अनेकांच्या बोलण्यातून होईल..अनेक आठवणी सांगितल्या जातील .ते पुस्तकरुपाने लोकांसमोर मांडता येईल..नवीन पिढीला त्यांच्या कवीतांचे, साहित्याची आणि रंगरूपाची खरी ओळख पटेल...
`स्वरानंद`ने पुढाकार घेऊन योजलेल्या या सभेत..अनेकांनी सुधीर मोघे यांच्याविषयीचे आपले नाते काय होते..तो कसा इतरांपेक्षा कसा वेगळा होता याविषयीच्या भावना व्यक्त केल्या...यासभेला सुधीर मोघे यांचे मोठे बंधू आणि ज्येष्ठ अभनेते श्रीकांत मोघेही उपस्थित होते..
त्यांच्या भावना अशा होत्या...
आनंद माडगूळकर..
गदिमांच्या गावी जाताना सुधीर म्हणाला.होता...उद्या आपण गेल्यानंतर पुन्हा लोक आपली आठवण अशी काढतील का रे...तेव्हा मला त्या शब्दांची किंमत कळली नाही..पण आज कळते आहे....त्याचे मोठेपण आज तो नसताना जास्त जाणवतं आहे..गदिमाच्या आशीर्वादाने पहिले चैत्रबन साकार झाले..या चैत्रबनातले प्रतिभावंत त्याच्या जाण्याने संपले..


मानसी मागिकर..
कविता पानोपानी कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सुधीर मोघेंच्या मोठेपणाची अनुभूती जाणवली..कलेबद्दलची आणि कवीतेबद्दलची जाण त्यांच्याकडून कळत गेली...जे आपले आहे ते कधी ना कधी मिळतच. हा त्याचा सिध्दांत होता.
केतकी माटेगावकर..
आरोही चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचं गाणं जवळून अनुभवता आलं.रंगूनि रंगात माझ्या...याचे संगीत त्यांचच होते.. त्यांचं प्रोत्साहन..आणि गाण्यामधले स्वर हे काही विलक्षण होतं. ते आपल्यात नाहीत.पण ते गाण्यामधून कवीतेमधून अापल्यातच आहेत.
डॉ.वि.भा.देशपांडे..
पाय नेहमीच जमिनिवर असलेला कलावंत...म्हणूनच मैत्रीही घट्ट होती..आम्ही दोघे एकाच रुग्णालयात..मी ७ व्या तर ते दुस-या मजल्यावर..पण त्यांची भेट म्हणजे अनामीकाची ठरली..हे दुदैर्व..
रमण रणदिवे...
जीवनरसाना भरभरुन माणूस कसा असतो..ते सुधीर मोघे यांच्याकडे पाहता समजते.. संगीताचा कान ..स्मृतीतल्लख..आणि सह्दय माणूस तो होता..ज्याच्या गळ्यात पडून मनसोक्त रडावं असा माणूस...

अपर्णा संत..
पूर्वजन्मीतचे पूण्य म्हणून असा माणूस आयुष्यात मिळाला..
कळले ना..
जगणे गाणे आहे सारे
कोणीही गावो लागलेत तंबोरे
रे जगणे म्हणजे संथ स्वरांचा श्वास
अन् मरण,
जणू ही दोन स्वरातील आस...
ह्याच त्यांच्या ओळी आठवतात...

शशिकांत कुलकर्णी..
कवीता पानोपानी कार्यक्रमाचे व्यवस्थापनाच्या निमित्ताने त्यांची कर्तबगारी कळत गेली..मोठा कवी, मोठा माणूस..
डॉ. सलील कुलकर्णी..
प्रत्येक छोट्या गोष्टीत रसपूर्ण जगणे कसे असावा हे शिकविणारा कवी..खरा माणूस..मनस्वीपणे जगला..
शैला मुकूंद..
 गिरविणे हे त्यांच्या लेखी कधीच नव्हते..ते सतत नवे नवे लिहित गेले..देत गेले..उलगडत गेले..
श्रीनिवास भणगे..
निर्भिड आणि निष्पाप..माणूस..त्यांच्याकडून नाही म्हणायला शिकलो..
सुधीर गाडगीळ..
गद्य निवेदनाचा मूळपुरुष..भरभरून दाद देणारा कलावंत..
आनंद मोडक..
जुन्या गाण्यांचा चाहता..आचार्य अत्रे, पुल देशपांडे गदिमा या परंपरेला प्रतिभावंत हरपाला..तुकारामा इतकं सोपं..आणि तुकारामा इतक अवघड लिहिणारा कवी..
अरुणा ढेरे..
 संगीताची उत्तम जाण आणि शब्दाचं उत्तम ज्ञान असणारा कवी.. सतत ताजा असणारा आणि मराठी काव्यपरंपरेचे उत्तम ज्ञान असणारा कवी..
विजय कुवळेकर..
चांगल्या गुणांची पूजा करत सतत नवीन करत रहाणे हेच त्याचं उद्दिष्ट होतं. नेहमीच शब्दांशी, सुरांशी तो खेळत राहिला.

याशिवाय मृणाल कुलकर्णी (पत्राद्वारे), प्रदिप दिक्षित, श्रीकांत पारगावकर, वंदना खांडेकर, सिध्दार्थ बेंदें यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या...
अरुण नूलकरांनी प्रसंगोचित अशा आठवणी आणि सुधीर मोघे यांच्याबद्दलच्या गुणांचा उल्लेख आपल्या निवेदनात केला..