subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, July 18, 2012

शिवरायांचे आठवावे रुप -२२ जुलैला

नाट्य निर्मिती ही ज्यांची गरज नाही, एक हौस आहे...या भरत नाट्य संशोधन मंदिराने एका भव्य नाटकाची निर्मिती करण्याचा घाट घातला आहे...ते ही शिवधनुष्य ते पेलण्यासाठी पुण्यातले मान्यवर कलावंत दिपक रेगे यांना संस्थेचे सभासद करुन संजय डोळे यांच्या दिग्दर्शनाखाली नाटक सादर होत आहे...शिवरायांचे आठवावे रुप....


शिवाजी महारांच्या जिवनातले वेगवेगळे प्रसंग गुंफत लेखक ह्षीकेश परांजपे यांनी नाटक लिहले आहे..त्यात निवेदनासारखे प्रसंग पुढे नेणारे वेगवेगळे लोकसंगीताचे प्रकार येतात..त्यातले शाहिर, गोंधळी आणि इतर जण शिवरायांचे गुणगान करीत हा रंगमंचीय प्रयोग घडवत नेतात...हे शिवचरित्र सांगणारे नाटक नक्कीच नाही..असे लेखक आवर्जून सांगतात... हे नाटक म्हणजे इतिहास नव्हे..कर इतिहासातल्या घटनांची आदार घेऊन लिहलिल्या प्रसंगाची नाट्यमय गुंफण या नाटकात केली असल्याचे संस्थेच्या पत्रकात म्हटले आहे.


भव्य ऐतिहासिक नाटकाच्या निर्मितीतून संस्थेला पुन्हा एक नवे झळाळी येणार आहे. संस्थेचे कलाकार आणि काही इतर कलावंतांचा हा संच २२ जुलै २०१२ ला संध्याकाळी ५ वाजता भरत नाट्य मंदिरात या नाटकाच पहिला शुभारंभाचा खेळ करेल. त्यानंतर हे नाटक महाराष्ट्रभर सादर होईल, असे संस्थेचे अध्यक्ष विजय वांकर सांगतात. नाट्य मंदिर चालविणे हा एक संस्थेचा भाग आहे..तसेच नाटकांची निर्मिती करुन त्यांचे प्रयोग करणे हा ही संस्थेचा उद्देश आहे....

दिपक रेगे शिवाजी महारांजांच्या भुमिकेत असून त्याशिवाय मंजुषा जोशी, आशुतोष नेर्लेकर, विश्वास सहस्त्रबुध्दे, दादा पासलकर, संजय डोळे, आनंद पानसे आणि जिजाऊच्या भूमिकेत आहेत लिना गोगटे...
नाटकात मंदार परळीकर हे पोवाडे-गोंधळ सादर करुन त्यातून नाटक पुढे नेणार आहेत...एकूणच हा वेगळा नाटयमय खेळ काय आहे..याची उत्सुकता माझ्याबरोबरच तुम्हालाही असेल..तर ते २२ जुलैला स्पष्ट होईल... दरम्यान तालमी सुरु आहेत ..
प्रयोगाला शुभेच्छा!सुभाष इनामादार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276