subhash inamdar

subhash inamdar

Sunday, March 25, 2012

कशीदाकाम केलेली साडी मन मोहवून घेते..

एके काळी घराघरात कशीद्याने काढलेले हातरुमाल, पडदे, टेवलक्लॉथ, इतकेच काय उशावरचे अभ्रे असायचे...पण आज ह्या सा-या घरगुती कला फारशा दिसत नाहीत. सारे काही.. नव्या दिशेला धावणारो..रंग, कलाकुलर आणि संगणकीय कळीतून उमटलेली डिझाईन...


आपण नव्याने तयार केलेल्या साडीवरचे कशीदाकाम दाखवून त्याचे टाके कसे असतात ते सांगत आहेत,,,पुष्पाताई बाक्रे.

अर्थात घरात नित्यकाळ असणारी महिला मंडळी आता फारशी घरात राहातात कुठे..?
प्रत्येक जण नोकरीच्या . काहीतरी मिळविण्याच्या मागे. म्हणूनच कदाचित या सा-यांकडे तेवढे लक्ष जात नाही. उन्हाळ्यात करायची कामे. वाळवणे. पापड. कुरडया. गव्हाचा चिक सारेच आता बाजारातून रेडिमेड आणले जाते. त्यासाठीची मेहनतही आता होत नाही..खरे ना?

आज आमच्या स्नेही कलावंत सौ. शैला दातार यांचा फोन आला..की की पुष्पाताई बाक्रे यांनी तयार केलेल्या कशीदा कामाचे प्रदर्शन आहे. जरा येशील काय...आता माझा दैनंदिन पत्रकारितेशी फारसा संबंध नसल्याने थोडे आढेवेढे घेतले..मात्र आज रविवारी दुपारी चक्क फिल्म इन्स्टिट्यूटच्या दाराच्या पुढच्या राजकमल बंगल्यापुढच्या बाक्रे बंगल्यात दाखल झालो.

सौ. अनिता बेदरकर आणि पुष्पाताई बाक्रे आपल्या नविन साडीजवळ

सुमारे पंच्च्याहत्तरीच्या बाक्रे बाई आणि त्यांच्या दोन सहकारी भगिनी सौ. माधुरी घांगुर्डे, सौ. अनिता बेदरकर यांच्यासह उत्साहाने बंगल्यात लावलेल्या कशिदा कामाचे वर्णन सांगत फिरत होत्या. काही काळाने बेदरकरांशी शैला दातारांनी ओळक करुन दिली. ज्यासाठी हे प्रदर्शन भरविले ती खजुराहो मधील वैष्णवमंदीरातील दशावतारांचा कशिदा काढून तयार केलेली साडी.. दाखविली..पाहिली...`ती एकमेव आहे. तिच्यासारखी दुसरी तयार करायची नाही. ती जगातील एकमेव असेल. `...बाक्रेबाई सांगत होत्या.



रुमाल, मोठे कापड. पडदा, आणि साड्यांवर काढलेली विविध चित्राकृती कशीदांचे नमुने मन मोहरुन घेणारे होते. तिथली रंगसंगती आणि विणकामातले कौशल्य कलेची उंची सिध्द करणारे होते. नक्कीच...

आज नवी पीढीतल् महिल्या या कशिदा कामासाठी फारश्या उत्सुक नसल्याचेही त्या सांगतात.

आधी कागदावर डिझाईन काझून मग त्यानुसार नेट लावून जाळीदार हे काम केले जाते.

सारी कशीद्यातूल रुपे भारतीय संस्कृतिचे महान प्रतिकेच समोर आणतात. ही शेली विशेषतः कर्नाटकातून आली. त्यावर कै. अहिल्याबाई किर्लास्करांनी तीन पुस्तके लिहली आहेत. चौथे आणि पाचवे पुस्तक स्वतः पुष्पाताई बाक्रे यांनी लिहली आहेत.

बाक्रे यांच्या माहेरी शंभर वर्षापासून कर्नाटकी कशीदा काम त्यांच्या आजी काशीबाई किर्लोस्करांपासून केले जाते. आईकडून वारसा घेऊन त्या आज साड्यांवर कशीदा काढून त्यांचे वेगळेपण जपत आणि ते पुढे नेण्याचा यत्न करीत आहेत. या कलेच तोच तो पणा येऊ नये म्हणून त्यांनी देशी-परदेशी संग्रहालयातली नमुने पाहिले. त्यांच्या कारीव काम, जुनी चित्रे , शिल्पकला यांचा अभ्यास केला. त्यातले काही चांगले ते आपल्या हाती आणले आणि आता ते नवीन पीढीकडे सुपूर्द केले आहे.


वीरशैव पंथाच्या देवळांमधले वैशिष्ठ्य त्यांना एका साडीवर उतरवून ती साडी एका परिचितांसाठी तयार केली. त्यासाठी दोन वर्षांचा काळ लागला. हंपीतील विठठ्ल मंदिराच्या भिंतींचे स्केच बघुन त्याला कशीदात तयार केले ते फ्रेम स्वरुपात उतरविले आणि ते घरातल्या भिंतीवर दिमाखात उभे आहे.


अनेक ठिकाणी प्रदर्शने भरवून हे कशीदा काम दाखवावे..यातून कांहीना स्फूर्ती यावी. आणि ही भारतीय कला प्रगत देशात जावी आणि त्यासाठी अब्यासक्रम करावा त्यांचा विचार सुरु आहे.

त्यांची ही कला आज सौ. माधुरी घांगुर्डे, सौ. अनिता बेदरकर या दोन सहकारी जपत पुढे नेत आहेत. ती अशीच वाढत राहणार आहे याची त्यांना खात्री आहे....

हे नमुने पाहताना जुन्य़ा सुंदर देवळातील शिल्पे पाहण्याचे समाधान मिळाले..ते तुम्हीही जमेल तेव्हा अनभवून घ्यावे हेच वाटते.



सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


No comments:

Post a Comment