स्वतःच्या कोषात दंग राहून विश्वात्मक शब्दसोहळा अनुभवणारा एक श्रेष्ठ कवी-माणूस . ग्रेस.
दोन महिन्यांपूर्वी जेव्हा पाहिले तेव्हा ते किंचीत सुकलेले आणि आपल्यावर अनेकांनी अन्याय केल्याचे मनात ठेऊन त्याची जाहीर खंत व्यक्त करणारे ...भरपूर बोलणारे एक व्यक्तिमत्व..अनुभवले.
ते बोलतात तेव्हा ते ऐकावेसे वाटते..पण ते कळून घेण्य़ाची ताकद सहजपणे येत नाही. त्यांची शब्दांची आणि विचारांची उड्डाणे सहज एखादा पक्षी एका झाडावरुन दुस-या झाडावर सहजपणे उडून जावा ना..अगदी तसे..विषय़ांचे विविध पैलू एका कवितेच्या रुपातून बाहेर येत असत.
आपल्यावर दुर्बाधतेची शिक्का मारला जातोय हे मात्र त्यांना सतत खटकत असे. ते मला पर्वा नाही म्हणत असले तर त्यांच्या त्याविषयीच्या भावनाही तीव्र शब्दातूनच प्रकट होताना अनेकांनी पाहिले आहे.
त्यांच्याजवळ जाण्याची आणि त्यांना जाणण्याची ताकद असणारे फार थोडे...
आमचा मित्र शिरीष रायरीकर हा ग्रेस आणि ह्दयनाथ मंगेशकांचा एकत्रित कार्य़क्रमाचा आयोजक असाय़चा..म्हणून मला थोडे पाहता आणि एकता आले..मात्र अनुभवता आले नाहीत.
त्यांचे ते विविध दाखल्यांनी भारलेले बोलणे ऐकले की हे समजण्याची योग्यता यावी म्हणून ...आपणही काही अभ्यास केला पाहिजे असी सतत मनात भावना येत होती..
आज ते एका दुर्घर रोगातून शरीराच्या रुपाने मुक्त झाले. त्यांची शुश्रशा करणा-या नर्सवरही ते ओरडत असत..त्यांना वेदना सहन होत नव्हत्या...तसे ते एकाकी पडले नव्हते..त्यांचे इंग्रजी भाषेवरचे आणि व्याकरणावरचे संस्कार . वाचन आणि..व्यक्त होण्यातली प्रामाणिकता....आता संपली...
त्यांचे विचार..कृती आणि उच्च्रार आता सारेच थांबले...एका कालप्रवाहाबरोबर ते वहात गेले...उरल्या त्या आठवणी आणि स्मृती...
मोठा माणूस आणि..स्त्रीविषयक अंतरीच्या वेदनांनी ग्रासलेला एक श्रेष्ठ साहित्यिक...
ती गेली तेव्हा.....ने सारा आसमंत धीरगंभीर करण्याचे सामर्थ्य आहे...तीच एकून त्यांचे स्मरण करुयात....
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
No comments:
Post a Comment